भारतीय रेल्वेकडून कमी बजेटमध्ये अतिशय उत्तम दर्जाच्या टूर्स अरेंज केल्या जातात. याच टूर्स अंतर्गत आयरसीटीसीने ( IRCTC) गुजरात टूर पॅकेज लॉन्च केले आहे. या टूर पॅकेजचे नाव 'केवडिया विथ अहमदाबाद एक्स मुंबई' (Kevadia with Ahmedabad Ex Mumbai) असे ठेवले आहे. हे टूर पॅकेज चार दिवसांचे असून त्याची किंमत केवळ 15 हजार रुपये निश्चित करण्यात आली आहे. या टूर पॅकेजबाबत IRCTC ने ट्विट करून माहिती दिली आहे. हे पॅकेज कुठून सुरू होते? हा प्रवास साधारण किती दिवसांचा असेल? यामध्ये कोणकोणत्या ठिकाणांना भेट देता येईल, याबाबत माहिती जाणून घेऊयात.
किती दिवसांचे टूर पॅकेज आहे?
IRCTC ने लॉन्च केलेले गुजरात टूर पॅकेज 4 दिवस 3 रात्रींचे असणार आहे. या टूर पॅकेजमध्ये प्रवाशांना चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह चेअर कारमधून प्रवास करता येईल. हे टूर पॅकेज मुंबईहून सुरू होईल. महत्त्वाचं म्हणजे दर शुक्रवारी हे पॅकेज असलेली ट्रेन मुंबईवरून सुटणार आहे.
ठिकाणे आणि टूर पॅकेजची किंमत जाणून घ्या
IRCTC च्या या टूर पॅकेज अंतर्गत प्रवाशांना स्टॅच्यु ऑफ युनिटी (Statue of Unity), लक्ष्मी विलास पॅलेस वडोदरा (Lakshmi Vilas Palace Vadodara), अहमदाबाद (Ahmedabad), अक्षरधाम मंदिर (Akshardham Temple), साबरमती आश्रम (Sabarmati Ashram), कंकरिया लेक (Kankaria Lake) इ. ठिकाणांना भेट देता येणार आहे.
या टूर पॅकेजची किंमत ही 15,440 रुपायांपासून सुरु होणार आहे. मात्र ही किंमत ऑक्यूपेंसीच्या आधारावर बदलू शकते. यामध्ये प्रवाशांना सकाळचा नाश्ता, रात्रीचे जेवण आणि ऑनबोर्ड मिल उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
बुकिंग 'या' ठिकाणी करा
तुम्हाला देखील या टूर्सचे बुकिंग करायचे असेल, तर तुम्ही IRCTC च्या irctctourism.com या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता. तसेच आयआरसीटीसी फॅसिलिटेशन सेंटर (IRCTC Facilitation Center), झोनल ऑफिस (Zonal Office) आणि रिजनल ऑफिसमधूनही (Regional Office) थेट बुकिंग करू शकता.
Source: hindi.news18.com