Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

IRCTC e-wallet च्या मदतीने तत्काळ बुक होईल रेल्वेचे तिकीट, जाणून घ्या रजिस्ट्रेशन-पैसे जमा करण्याची प्रोसेस

IRCTC

Image Source : https://hindi.economictimes.com/

रेल्वे तिकीट बुकिंगसाठी तुम्ही IRCTC e-wallet चा वापर करू शकता.IRCTC ई-वॉलेट रजिस्ट्रेशन आणि यात पैसे जमा करण्याची प्रोसेस खूपच सोपी आहे.

कामानिमित्त अथवा फिरण्यासाठी इतर शहरांमध्ये जायचे असल्यास प्रवासाचे उत्तम साधन म्हणून अनेकजण रेल्वेला पसंती देतात. परंतु, रेल्वेने प्रवास करायचा असल्यास सर्वात मोठी समस्या असते ती म्हणजे तिकीट बुकिंग. अनेकदा प्रयत्न करूनही वेळेवर तिकीट मिळत नाही. प्रवाशांच्या सुविधेसाठी IRCTC अ‍ॅप आणि वेबसाइट देखील उपलब्ध आहे. तुम्ही जर IRCTC अ‍ॅपमध्ये प्रवाशांची संपूर्ण माहिती सेव्ह करून ठेवल्यास तिकीट बुकिंगसाठी मदत मिळू शकते. यासाठी तिकीटांच्या पेमेंटसाठी IRCTC e-wallet चा देखील वापर करू शकता. IRCTC e-wallet मध्ये रजिस्ट्रेशन करण्याची प्रोसेस खूपच सोपी आहे.

आयआरसीटीसी ई-वॉलेटमध्ये असे करा रजिस्ट्रेशन

irctc-wallet-12.jpg
Source-IRCTC
  • सर्वात प्रथम तुम्हाला IRCTC च्या प्लॅटफॉर्मवर यूजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करावे लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला Plan my travel या पर्यायावर जायचे आहे. आता IRCTC eWallet चा पर्यायावर गेल्यानंतर IRCTC eWallet Registration वर क्लिक करा.
irctc-wallet-123.jpg
Source-IRCTC
  • आता पॅन अथवा आधार क्रमांक, तुम्ही माहिती भरा. 
  • पुढे तुम्हाला वन टाइम रजिस्ट्रेशन शुल्क म्हणून 50 रुपये द्यावे लागतील.
  • रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्ही ई-वॉलेटमध्ये बुकिंगसाठी आवश्यक असलेली रक्कम जमा करू शकता. भविष्यात आयआरसीटीसीच्या माध्यमातून तिकीट बुक करण्यासाठी तुम्ही ई-वॉलेटमध्ये पैशांचा वापर करू शकता.

आयआरसीटीसी ई -वॉलेटमध्ये असे जमा करा पैसे

  • आयआरसीटीसी ई –वॉलेटमध्ये पैसे जमा करण्याची प्रोसेस खूपच सोपी आहे. यासाठी तुम्हाला यूजर नेम व पासवर्ड टाकून लॉग इन करावे लागेल.
irctc-wallet-1234.jpg
Source-IRCTC
  • त्यानंतर IRCTC E-wallet DEPOSIT या पर्यायावर क्लिक करून तुम्हाला हवी ती रक्कम टाका. तुम्ही ई-वॉलेटमध्ये कमीत कमी 100 रुपये आणि जास्तीत जास्त 10 हजार रुपये जमा करू शकता.
  • रक्कम टाकल्यानंतर दिलेल्या पेमेंट पर्यायापैकी एकाची निवड करून पैसे जमा करा. लक्षात घ्या की यात जमा केलेली रक्कम रिफंडेबल असते. 
  • विशेष म्हणजे तुम्ही Deposit History आणि Transactions History देखील पाहू शकता.

आयआरसीटीसी ई-वॉलेटचे फायदे

  • आयआरसीटीसी ई-वॉलेटच्या माध्यमातून तिकीट बुकिंग कोणत्याही अडथळ्याशिवाय व पूर्णपणे सुरक्षित पद्धतीने करता येते.
    यामुळे प्रति तिकीट पेमेंट गेटवे शुल्कात देखील बचत होते.
  • तुम्ही ऑनलाइन पद्धतीने तुमचे अकाउंट हाताळू शकते. तसेच, अगदी सहज ई-वॉलेटमध्ये पैसे जमा करू शकता. ज्याचा फायदा तिकीट बुकिंगसाठी करता येते.
  • विशेष म्हणजे कोणत्याही कारणाने तिकीट रद्द झाल्यास त्वरित दुसऱ्या दिवशी पैसे ई-वॉलेटमध्ये जमा होतात. 
  • तुम्हाला ई-वॉलेटच्या माध्यमातून आतापर्यंत बुक केलेल्या रेल्वे तिकीटांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होते.