Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Announced Stock Split: 450 टक्के परतावा देणाऱ्या या कंपनीने, स्टॉक स्प्लिट करण्याची घोषणा केली!

Announced Stock Split

Multibagger stock's board declares stock split: इन्फ्रा कंपनी IRB Infrastructure Developers कंपनीच्या शेअर्सने गेल्या तीन वर्षांत गुंतवणूकदारांच्या भांडवलात 498 टक्क्यांनी वाढ केली आहे. आता कंपनीने एका शेअरचे दहा शेअर्समध्ये विभाजन करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीची योजना काय आहे आणि ही प्रक्रिया कधीपर्यंत पूर्ण होऊ शकते हे जाणून घ्या.

IRB Infrastructure Developers board approves share split: आयआरबी (IRB) इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेडच्या बोर्डाने कंपनीच्या शेअर्सचे विभाजन करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. यामुळे, 10 रुपये दर्शनी मूल्याचा प्रत्येक स्टॉक प्रत्येकी 1 रुपये दर्शनी मूल्याच्या 10 शेअर्समध्ये विभागला जाईल. आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर हा मल्टीबॅगर स्टॉक आहे ज्याने गेल्या तीन वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 450 टक्क्यांहूम अधिक परतावा दिला आहे. कंपनीने सांगितले की ते आता शेअर होल्डर्स आणि नियामकांकडून स्टॉक स्प्लिटसाठी मंजुरी घेणार आहेत. त्यानंतरच शेअर्सचे विभाजनचा चांगला प्रभाव स्टॉक एक्स्चेंजच्या व्यवहारात दिसून येईल.

आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर कंपनीचे स्टॉक हे मल्टीबॅगर मानले जातात, कारण हे स्टॉक  गुंतवणूकदारांना 100 टक्क्यांहून पेक्षा जास्त परतावा देत आहेत. आयआरबी (IRB) इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्सनेच्या बोर्डाने प्रत्येकी 10 रुपये दर्शनी मूल्याचे शेअर्स प्रत्येकी 1 रुपयाच्या दर्शनी मूल्याच्या 10 शेअर्समध्ये विभाजित करण्याच्या प्रस्तावावर विचार केला आहे, ज्यासाठी कंपनीच्या शेअरधारकांची वैधानिक मान्यता आणि मंजुरी आवश्यक असू शकते. भांडवली बाजारातील तरलता  (Liquidity) वाढवण्यासाठी, शेअरधारकांचा ओढा वाढवण्यासाठी आणि छोट्या गुंतवणूकदारांना कंपनीचे शेअर्स अधिक परवडणारे बनवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे, असे कंपनीने अधिकृतरित्या माध्यमांना सांगितले आहे. कॉर्पोरेटस्तरीय कार्ये 28 फेब्रुवारी 2023 पर्यंत पूर्ण केली जातील, असेही आयआरबी (IRB) इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक वीरेंद्र डी. म्हैसकर म्हणाले की, कंपनीच्या स्थापनेला 25 वर्षे पूर्ण झाल्याचा आणि भारतीय स्टॉक एक्सचेंजवर शेअर्सची 15 वर्षे पूर्ण झाल्याचा शुभ मुहूर्त जवळ आला आहे. याच निमित्ताने कंपनीचे बोर्ड या स्टॉक स्प्लिटची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्सच्या शेअर्सची स्थिती (IRB Infrastructure Developers Shares Status)-

या घडामोडीनंतर गुरुवारी दिनांक 5 जानेवारी रोजी कंपनीच्या शेअरमध्ये घसरण झाली. एनएसई (NSE) गुरुवारी सकाळी 10:48 वाजता 3.66 टक्क्यांच्या घसरणीसह 307.80 रुपयांवर व्यवहार करत होता. मागील सत्रात शेअरची किंमत 319.50 रुपये होती. गेल्या पाच दिवसांत स्टॉक 6.15 टक्क्यांनी वधारला आहे. गेल्या एका महिन्यात त्यात 11.54 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या सहा महिन्यांत या समभागात 58 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. गेल्या एका वर्षात स्टॉक 38.27 टक्क्यांनी वाढला आहे. गेल्या तीन वर्षांत या समभागात 450 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.