ऑक्टोबरपासून आयपीओंच्या (Initial Public Offering-IPO) संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. मागील आठवड्यात 5 कंपन्यांचे आयपीओ आले होते. आता या आठवड्यात 4 कंपन्या आयपीओ आणत आहेत. या 4 कंपन्यांमध्ये फाईव्ह स्टार बिझनेस फायनान्स, आर्कियन केमिकल, केयन्स टेक्नॉलॉजी इंडिया आणि आयनॉक्स ग्रीन एनर्जी सर्व्हिसेस यांचा समावेश आहे. या कंपन्यांचे आयपीओ अनुक्रमे 9, 10 आणि 11 नोव्हेंबरला ओपन होणार आहेत.
Table of contents [Show]
आर्कियन केमिकल (Archean Chemicals)
विशेष रासायनिक उत्पादक आर्कियन केमिकल इंडस्ट्रिज लिमिटेडचा इश्यू 9 ते 11 नोव्हेंबर या कालावधीत सब्सक्रिप्शनसाठी खुला असणार आहे. कंपनीने आपल्या सुरुवातीच्या शेअर्स विक्रीसाठी प्रति शेअर 386-407 रुपये प्राईस बॅण्ड निश्चित केला आहे. या इश्यूमध्ये 805 कोटी रुपयांचे नवीन इक्विटी शेअर्स जारी करण्याबरोबरच विद्यमान प्रवर्तक आणि भागदारकांकडून 1,61,500 पर्यंतच्या इक्विटी शेअर्सची ऑफर फॉर सेल दिली जाणार आहे.
फाईव्ह स्टार बिझनेस फायनान्स (Five Star Business Finance)
फाईव्ह स्टार बिझनेस फायनान्सचा 1,960 कोटी रुपयांचा इश्यू 9 ते 11 नोव्हेंबर 2022 या कालावधीत खुला राहणार आहे. कंपनीने प्रति शेअरची किंमत 450 ते 474 रूपये अशी निश्चित केली.
केयन्स टेक्नॉलॉजी इंडिया (Kaynes Technology)
केयन्स टेक्नॉलॉजी इंडियाची प्रारंभिक भागविक्री 10 नोव्हेंबर 2022 रोजी सुरु होऊन 14 नोव्हेंबर 2022 रोजी बंद होणार आहे. कंपनीने प्रतिशेअर 559 ते 587 रुपये किमतीचा बॅण्ड निश्चित केला आहे. विद्यमान भागधारक आणि प्रवर्तक ऑफर फॉर सेलद्वारे 55,84,664 इक्विटी शेअर्सची विक्री करणार आहेत.
आयनॉक्स ग्रीन एनर्जी सर्व्हिसेस (Inox Green Energy Services)
आयनॉक्स ग्रीन एनर्जी सर्व्हिसेस कंपनीचा आयपीओ 11 ते 15 नोव्हेंबर या दरम्यान खुला असणार आहे. कंपनी आयपीओच्या माध्यमातून 740 रूपये उभारणार आहे. या इश्यूमध्ये 370 कोटी रुपयांचे नवे इश्यू आणि 370 कोटी रुपयांपर्यंतच्या ऑफर फॉर सेलचा (ओएफएस) समावेश असणार आहे.