अनेक कंपन्या गेल्या काही दिवसांपासून बाजापेठेत आपले आयपीओ घेऊन येत आहेत. ज्या माध्यमातून त्या उद्योगासाठी पैशांची उभारणी करत आहेत. तुम्हीही या आयपीओच्या माध्यमातून गुंतवणूक करु शकता. या आठवड्यात सेन्को गोल्ड आणि अल्फालॉजिक इंडस्ट्रीज या कंपन्यांचे आयपीओ बाजारात येणार आहेत. त्यामुळे येणार आठवडा आयपीओ गुंतवणूकदारांससाठी फायद्याचा ठरणार आहे. अनेक कंपन्या या आठवड्यात त्यांचे SME आयपीओ आणणार आहेत. ग्लोबल पेट इंडस्ट्रीज, त्रिध्या टेक आणि सिनोप्टीक्स टेक्नॉलॉजीचे आयपीओ आधीच सबस्क्रिप्शनसाठी उघडले आहेत आणि या आठवड्यात ते बंद होणार आहेत. चला तर याबद्दल माहिती जाणून घेऊयात.
Table of contents [Show]
अल्फालॉजिक इंडस्ट्रीज आयपीओ (Alphalogic Industries IPO)
अल्फालॉजिक इंडस्ट्रीजचा आयपीओ 3 जुलै रोजी सबस्क्रिप्शनसाठी ओपन होणार आहे. ज्यामध्ये गुंतवणूकदार 6 जुलैपर्यंत गुंतवणूक करू शकतात. या आयपीओमध्ये एकूण 13.41 लाख फ्रेश इक्विटी शेअर्स इश्यू करण्यात येतील, ज्याची एकूण रक्कम 12.87 कोटी रुपये असणार आहे. त्यासाठी कंपनी 96 रुपये प्राइस बँड निश्चित करणार आहे. गुंतवणूकदार 1 लॉटमध्ये 1200 शेअर्ससाठी बोली लावू शकतात. या आयपीओमधील 50 टक्के ऑफर रिटेल गुंतवणूकदारांसाठी आणि उर्वरित 50 टक्के इतर गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आली आहे.
सेन्को गोल्ड आयपीओ (Senco Gold IPO)
नामांकित ज्वेलरी कंपनी ‘Senco gold’ च्या आयपीओचे सबस्क्रिप्शन 4 जुलैला ओपन होणार आहे. तुम्हाला देखील आयपीओमध्ये गुंतवणूक करायची असेल, तर तुम्ही 6 जुलै पर्यंत या आयपीओमध्ये गुंतवणूक करू शकता. या आयपीओसाठी कंपनीने 301-317 रुपये प्राईस बँड निश्चित केली आहे.
‘Senco Gold’ कंपनी बाजारात 405 कोटी रुपयांचा आयपीओ घेऊन येणार आहे. मात्र ही रक्कम कंपनीने दोन भागात विभागली आहे. या इश्यू अंतर्गत कंपनी 270 कोटी रुपयांचे फ्रेश इक्विटी शेअर्स जारी करणार आहे. तर उर्वरित 135 कोटी रुपयांच्या शेअर्सची ऑफर फॉर सेल (OFS) अंतर्गत विक्री करण्यात येणार आहे. ऑफर फॉर सेल अंतर्गत कंपनी SAIF पार्टनर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडद्वारा शेअर्सची विक्री करणार आहे. या कंपनीजवळ Senco Gold ची 19.23 टक्के भागीदारी आहे.
ग्लोबल पेट इंडस्ट्रीज आयपीओ (Global Pet Industries IPO)
ग्लोबल पेट इंडस्ट्रीजचा आयपीओ 28 जून रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडला आहे. या आयपीओमध्ये गुंतवणूकदारांना 3 जुलैपर्यंत गुंतवणूक करता येणार आहे. या आयपीओची प्राईस बँड 49 रुपये प्रति शेअर आहे. 27 लाख शेअर्स इश्यू करून कंपनी अंदाजे यातून 13 कोटी रुपये उभारणार आहे.
सिनोप्टीक्स टेक्नॉलॉजी आयपीओ (Synoptics Technology IPO)
सिनोप्टीक्स टेक्नॉलॉजी कंपनीचा आयपीओ 30 जून रोजी ओपन करण्यात आला आहे. या आयपीओमध्ये गुंतवणूकदार 5 जुलैपर्यंत गुंतवणूक करू शकतात. Synoptics Tech ही एक आयटी सेवा देणारी कंपनी आहे. कंपनीने प्रति शेअरसाठी 237 रुपये प्राईस बँड निश्चित केली आहे, ज्यातून सुमारे 54 कोटी रुपये कंपनी उभारणार आहे.
त्रिध्या टेक आयपीओ (Tridhya Tech IPO)
त्रिध्या टेक कंपनीने त्यांचा आयपीओ 30 जून रोजी ओपन केला आहे. ज्या अंतर्गत ग्राहक 5 जुलै पर्यंत गुंतवणूक करू शकतात. त्रिध्या टेक ही कंपनी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये काम करते. ज्या अंतर्गत ती आयटी सेवा पुरवते. ही कंपनी 35-42 रुपयांच्या प्राईस बँडसह 26.4 कोटी रुपये उभारणार आहे.
Source: hindi.moneycontrol.com