Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Senco Gold IPO: 4 जुलैला सेन्को गोल्ड कंपनीचा आयपीओ ओपन होणार; अधिक माहितीसाठी सविस्तर वाचा

Senco Gold IPO

Senco Gold IPO: नामांकित सेन्को गोल्ड कंपनी 4 जुलैला आपला आयपीओ बाजारात घेऊन येणार आहे. या आयपीओतून कंपनी एकूण 405 कोटी रुपये उभारणार आहे. तुम्हाला देखील आयपीओमध्ये गुंतवणूक करायची असेल, तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी असणार आहे.

नामांकित ज्वेलरी कंपनी ‘Senco gold’ च्या आयपीओचे सबस्क्रिप्शन पुढील आठवड्यात 4 जुलैला ओपन होणार आहे. तुम्हाला देखील आयपीओमध्ये गुंतवणूक करायची असेल, तर तुम्ही 6 जुलै पर्यंत या आयपीओमध्ये गुंतवणूक करू शकता.  या आयपीओसाठी कंपनीने 301-317 रुपये प्राईस बँड निश्चित केली आहे. ज्याच्या माध्यमातून कंपनी 405 कोटी रुपये उभारण्याची तयारी करत आहे.या पैशांच्या उभारणीनंतर Senco Gold चे एकूण मूल्यांकन 2460 कोटी रुपयांपर्यंत जाईल. या आयपीओ संदर्भातील अधिक माहिती जाणून घेऊयात.

आयपीओ संदर्भातील माहिती जाणून घ्या

‘Senco Gold’ कंपनी बाजारात 405 कोटी रुपयांचा आयपीओ घेऊन येणार आहे. मात्र ही रक्कम कंपनीने दोन भागात विभागली आहे. या इश्यू अंतर्गत कंपनी 270 कोटी रुपयांचे फ्रेश इक्विटी शेअर्स जारी करणार आहे. तर उर्वरित 135 कोटी रुपयांच्या शेअर्सची ऑफर फॉर सेल (OFS) अंतर्गत विक्री करण्यात येणार आहे. ऑफर फॉर सेल अंतर्गत कंपनी SAIF पार्टनर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडद्वारा शेअर्सची विक्री करणार आहे. या कंपनीजवळ Senco Gold ची 19.23 टक्के भागीदारी आहे.

गुंतवणुकीतील जोखीम जाणून घ्या

‘Senco Gold’ कंपनीवर 2022 साली आयकर विभागाने सर्च अभियान चालवले होते. या अभियाना अंतर्गत कंपनीच्या प्रमोटरवर टॅक्सेशनवर आधारित कारवाई करण्यात आली होती. कंपनीला कारणे दाखवा नोटीशी सोबत कोलकत्ता येथील केंद्रीय गुप्तचर महासंचालनालयानेही सेन्कोच्या दुकानाचा तपास केला होता. ज्यामुळे कायदेशीर कारवाई आणि न्यायालयीन खटल्यांना सामोरे जावे लागले होते.

कंपनीचा महसूल मोठ्या प्रमाणावर सोन्याच्या दागिन्यांच्या विक्रीवर अवलंबून आहे. सोन्याच्या खरेदीवर किंवा सोन्याच्या दागिन्यांच्या विक्रीवर प्रतिकूल परिणाम करणाऱ्या कोणत्याही घटकाचा कंपनीच्या व्यवसायावर आणि आर्थिक स्थितीवर विपरीत परिणाम होऊ शकतो.

तसेच कंपनी प्रामुख्याने आरबीआयच्या नियमांच्या अधीन राहून कर्जाच्या आधारावर सराफा बँकांकडून सोने खरेदी करते. त्यामुळे कर्जाच्या आधारावर सोन्याशी संबंधित नियमांमध्ये कोणताही बदल केल्यास धोका निर्माण होऊ शकतो. सेन्को गोल्डला भारतीय दागिन्यांच्या बाजारपेठेत तीव्र स्पर्धेचा सामना करावा लागत आहे. कंपनीला बाजारातील मोठा हिस्सा गमावण्याचा धोका आहे. कंपनीने टायटन कंपनी लिमिटेड आणि कल्याण ज्वेलर्स इंडियाला लिस्टेड पिअर्स म्हणून निवडले आहे.

तज्ज्ञांचे मत जाणून घ्या

SMIFS Ltd च्या तज्ज्ञांचे असे मत आहे की, Senco Gold आयपीओची किंमत आकर्षक आहे. महत्त्वाचं म्हणजे कंपनी गेल्या पाच दशकांहून अधिक काम करत असून तिचे बाजारपेठेत नाव आहे. यामुळे, ज्वेलरी उद्योगातील वाढीचा लाभ घेण्यासाठी ते योग्य स्थितीत आहे.याशिवाय अनऑर्गेनाइज्ड सेक्टरला ऑर्गेनाइज्ड केल्यानंतर कंपनीला फायदा होईल.

आयपीओतून मिळालेल्या पैशांचे काय करणार?

Senco Gold कंपनी आयपीओतून उभारलेल्या पैशाने व्यवसायाच्या भांडवली गरजा पूर्ण करणार आहे. याशिवाय कंपनी उत्तर भारतात स्वतःचा व्यवसाय विस्तारण्यासाठी या पैशाचा वापर करणार आहे. ज्यामुळे व्यवसाय वृद्धीसाठी फायदा होईल.

ही कंपनी मुख्यतः सोने, हिरे, चांदी, प्लॅटिनम यासारख्या धातूंचे दागिने घडवते. ज्वेलरी व्यवसायातील मोठ्या कंपन्यांमध्ये Senco Gold चा समावेश केला जातो. या कंपनीचा व्यवसाय 13 राज्यात आणि केंद्र शासनाच्या 96 शहरांमध्ये विस्तारला आहे. कंपनी या शहरात 75 स्टोअर्स आणि 61 स्टोअर फ्रेंचायजीच्या माध्यमातून काम करत आहे. कंपनीचे सर्वाधिक काम हे पश्चिम बंगालमध्ये चालते.

Source: hindi.moneycontrol.com