Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

IPL Final 2023 Prize Money: चेन्नई सुपरकिंग्जच्या गळयात पाचव्यांदा विजयीमाला, IPL मध्ये किती बक्षिस मिळाले जाणून घ्या

IPL Final 2023 Prize Money

Image Source : www.indianexpress.com

IPL Final 2023 Prize Money: सलग पाचव्यांदा आयपीएलची विजयमाला चेन्नई सुपरकिंग्जच्या (Chennai Super Kings) गळ्यात पडली आहे. आयपीएलची ट्रॉफी आणि 20 कोटी रकमेचा चेक या संघाला मिळाला आहे. या सीजनमध्ये सर्वोत्तम कामगिरी केलेल्या खेळाडूंना देखील पुरस्कार आणि बक्षीस रक्कम देण्यात आली आहे. या निमित्ताने त्याबद्दल जाणून घेऊयात.

ज्या क्षणाची क्रिकेट फॅन्स आतुरतेने वाट पाहात होते, तो क्षण शेवटी आलाच. सोमवारी 29 मे 2023 रोजी चेन्नई सुपरकिंग्ज (Chennai Super Kings)आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans) या दोन संघांमध्ये आयपीएलचा अंतिम सामना पार पडला. आयपीएल 2023 च्या ट्रॉफीवर चेन्नई सुपरकिंग्जने पाचव्यांदा स्वतःचे नाव कोरत घवघवीत यश मिळवले. हा सामना पावसामुळे अधिक गाजला असं म्हणायला हरकत नाही.

चॅम्पियनशिप जिंकल्यानंतर खेळाडूंच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला. विजेत्या संघाला आयपीएल 2023 ची ट्रॉफी आणि 20 कोटी रुपयांची रक्कम बक्षीस म्हणून देण्यात आली. पराभूत झाल्यावरही गुजरात संघाला मोठी रक्कम बक्षीस स्वरूपात मिळाली आहे. तसेच या सीजनमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना देखील बक्षीस देण्यात आले आहे. या निमित्ताने कोणत्या खेळाडूला किती बक्षीस रक्कम मिळाली, जाणून घेऊयात.

कोणत्या संघाला किती बक्षीस रक्कम मिळाली?

  • धोनीच्या नेतृत्त्वाखाली खेळलेल्या चेन्नई सुपरकिंग्ज (Chennai Super Kings) संघाला विजेता म्हणून घोषित करण्यात आले. या संघाला आयपीएल 2023 ची ट्रॉफी आणि 20 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम देण्यात आली. 
  • तर अंतिम फेरीमध्ये पराभूत झालेल्या गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाला 13 कोटी रुपये मिळाले. 
  • तिसऱ्या स्थानावर असलेल्या मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाला 7 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम मिळाली. 
  • लखनऊ सुपर जायंट्सने (Lucknow Supergiants) आयपीएल 2023 च्या सीजनमध्ये चौथ्या क्रमांकाचे स्थान मिळवून 6.5 कोटींची  रक्कम जिंकली.

'या' खेळाडूंना मिळाली इतकी बक्षीस रक्कम

आयपीएल 2023 चा सीजन चांगलाच चर्चेत राहिला. 2008 मध्ये सुरू झालेल्या या पर्वाला वर्षानुवर्षे प्रेक्षकांची जास्तीत जास्त पसंती पाहायला मिळत आहे. या सीजनमध्ये अनेक खेळाडूंनी चांगली कामगिरी केली.

मोस्ट व्हॅल्यूएबल प्लेअर (Most Valuable Player) म्हणून शुभमन गिलला (Shubman Gill) गौरवण्यात आले. ऑरेंज कॅप विनर (Orange Cap winner) म्हणून शुभमनला 10 लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले. सर्वाधिक चौकार ठोकणार खेळाडू, गेम चेंजर अवॉर्डसाठीही (Game Changer Award) शुभमनची निवड करण्यात आली. त्याला प्रत्येक अवॉर्डसोबत 10 लाख रुपये बक्षीस रक्कम देण्यात आली.

पर्पल कॅप विनर (Purple Cap winner) म्हणून मोहम्मद शमीची (Mohammed Shami) निवड करण्यात आली. त्याला 10 लाख रुपये बक्षीस रक्कम देण्यात आली. तर कॅच ऑफ द सीजनसाठी (Catch of the Season) एकमेव राशीद खानला (Rashid Khan) गौरवण्यात आले. त्याला बक्षीस रक्कम म्हणून 10 लाख रुपये दिले.

सुपर स्ट्राईकर ऑफ द सीजन (Super Striker of the Season award) या पुरस्कारासाठी ग्लेन मॅक्सवेलची (Glenn Maxwell) निवड करण्यात आली. त्याला 10 लाखांची बक्षीस रक्कम देण्यात आली. सर्वात जास्त षटकार लावणारा खेळाडू म्हणून फाफ डुल्पेसीला (Faf Duplessi) 10 लाखांचे बक्षीस देण्यात आले.

तर यशस्वी जयस्वालला (Yashasvi Jaiswal) इमर्जिंग प्लेअर (emerging player) म्हणून 10 लाखांचे बक्षीस देण्यात आले. ऍक्टिव्ह कॅच ऑफ द मॅचसाठी एम. एस. धोनीची (MS Dhoni) निवड करण्यात आली. या सर्व पुरस्कार आणि बक्षीस रकमेमध्ये फेअर प्ले अवॉर्ड हा दिल्ली संघाला देण्यात आला.

Source : jagran.com