भारतीय टीमचा पूर्व कॅप्टन महेंद्र सिंह धोनी हा आपला आयपीएलचा शेवटचा सामना खेळण्यासाठी चेन्नई येथे पोहोचला आहे. या ठिकाणी ढोल-ताशांच्या आवाजात व फुलांचा वर्षाव करून माहीचे स्वागत करण्यात आले आहे. हा भारताचा स्टार क्रिकेटर महेंद्र सिंह धोनी किती संपत्तीचा मालक आहे, माहिती का?
Mahendra Singh Dhoni: महेंद्र सिंह धोनीने खुप पूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केले आहे. आता धोनी आपला आयपीएल (IPL)चा शेवटचा सामना खेळण्यास सज्ज झाला आहे. आपला हा आयपीएलचा शेवटचा सामना अविस्मरणीय बनविण्यासाठी त्याने एक महिन्यापूर्वीपासूनच सराव सुरू केला. पण त्याच्या संपूर्ण क्रिकेट कारकीर्दीत त्याने संघर्ष व मेहनतीने आज मोठे नाव कमविले आहे. अशा या स्टार क्रिकटरचे किती नेटवर्थ आहे, हे पाहुयात.
श्रीमंत क्रिकेटपटूंच्या यादीत तिसऱ्या स्थानावर धोनी
http://www.telegraphindia.com/
रिपोर्टनुसार, भारताचा स्टार क्रिकेटर महेंद्र सिंह धोनी यांच्या नावावर सध्या 870 कोटी रुपयांची संपत्ती असून धोनी हा श्रीमंत क्रिकेटरच्या यादीत तिसऱ्या क्रमाकांवर आहे. मागील पाच वर्षात धोनीच्या नेथवर्टमध्ये जबरदस्त वाढ झाली आहे. धोनीपूर्वी श्रीमंत क्रिकटरच्या यादीत सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar) हा पहिल्या नंबरवर तर विराट कोहली (Virat Kohli) हा दुसऱ्या नंबरवर आहे. सचिन तेंडूलकरकडे साधारण 1,100 कोटींची संपत्ती आहे. तर विराट कोहलीच्या नावावर तब्बल 950 कोटी रूपयांची संपत्ती आहे.
आयपीएलच्या माध्यमातून सर्वाधिक कमाई करणारा क्रिकेटपटू
http://www.aajtak.in.com/
महेंद्रसिंग धोनी हा इंडियन प्रिमियर लीगच्या माध्यमातून 150 करोड रूपये कमविणारा पहिला खेळाडू ठरला आहे. धोनीने पहिल्या तीन सीझनमध्ये 18 करोड रूपयांची कमाई केली होती. त्यानंतर झालेल्या आयपीएलच्या तीन सामन्याच्या माध्यमातून धोनीने 25 करोड रूपये इतकी तगडी रक्कम कमविली होती. तेथून पुढील चार सीझनमध्ये माहीने 50 करोड तर मागील पाच सीझनमध्ये 72 करोड रूपये कमविले होते. आतापर्यंत महेंद्र सिंह धोनीने जवळपास 165 करोड रूपयांची जबरदस्त कमाई केली आहे.
जाहीरातीच्या माध्यमातून कमवितो 4 ते 6 करोड रूपये
http://www.youtube.com/
महेंद्र सिंह धोनीची अधिक कमाई ही जाहिरातीच्या माध्यमातून होते. टी.व्हीवर तो अनेक ब्रॅंडच्या जाहिरातीमधून दिसून येतो. रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, माही जाहिरातीच्या शुटिंगसाठी एक दिवसाचे चार ते सहा करोड रूपये इतके मानधन घेतो. आतापर्यंत धोनी 30 पेक्षा अधिक ब्रॅंडचा अॅबेसेडर बनला आहे. भविष्यात ही धोनी अधिक जाहिरातीच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे.
बिझनेससोबत शेती ही करतो
http://www.amarujala.com/
क्रिकेट व जाहिराती व्यतिरिक्त महेंद्र सिंह धोनी एक बिझनेसमॅनदेखील आहे. माहीने 2016 मध्ये सेव्हन (Seven) नावाने एक लाइफस्टाइल ब्रॅंड लाॅन्च केला होता. या व्यतिरिक्त माहीने 2019 मध्ये Cars24 मध्येदेखील पैसे लावले होते. या क्रिकेटरने नुकतेच आपले प्राॅडक्शन हाउसदेखील लाॅन्च केले आहे. तसेच त्याची एक हाॅकी टीमदेखील आहे. हा स्टार क्रिकेटर आता शेतीदेखील करताना दिसतो.
लग्झरी गाडयांचा शौकीन
http://www.deshibiker.com/
भारतीय क्रिकेटचा सुपरस्टार असलेल्या महेंद्रसिंग धोनीकडे अनेक लक्झरी कार्स व बाईक आहेत. यामध्ये रेंज रोवर, ऑडी, बीएमडब्ल्यू, मर्सिडीज़, टोयोटा, हमार और महिंद्रासारख्या अनेक लग्झरी कार्सचे कलेक्शन त्याच्याकडे आहे. ज्याची किंमत लाखापासून ते करोडो रूपयांपर्यंत आहे. तर बाइकमध्ये बुलेट, हायाबूसा, कावासाकी निंजा, यामाहा R1, यामाहा थंडरकैट व डुकाटी 1098 सारख्या गाडयांचा समावेश आहे. या बाइकची किंमत तब्बल लाखात आहे.
शानदार बंगला
http://www.houseey.com/
एम.एस. धोनीचा रांचीमध्ये एक आलिशान बंगला आहे. या बंगल्यामध्ये तो पत्नी साक्षी व मुलगी जीवासोबत राहतो. त्याच्या या लग्झरी बंगल्याचे नाव कैलाशपती असे आहे. त्याचा हा बंगला 7 एकर परिसरात उभा आहे. या बंगल्यामध्ये अनेक सुख-सुविधा आहेत. ज्यामध्ये स्विमिंग पूल, जिम, पार्क व इंडोर गेम खेळण्यासाठीदेखील जागा आहे. या बंगल्याचे इंटेरियर अधिक सुंदर व आकर्षक आहे. त्याच्या बंगल्याची किंमत साधारण करोडो रूपयांमध्ये असल्याचे सांगतिले जाते. त्याच्या या बंगल्याला उभारण्यासाठी साधारण तीन वर्षाचा कालावधी लागला आहे. तसेच माहीचे पुणे व मुंबई येथेदेखील शानदार घरे आहेत.
हवीहवीशी वाटणारी वर्क फ्रॉम होम (Work from home) ही संकल्पना हळूहळू मागे पडत चालली आहे. आम्हाल वर्क फ्रॉम होमच हवं, असा आग्रह करणारे आणि अक्षरश: भांडणारे आता ऑफीस वर्कच्या प्रेमात पडले आहेत. वर्क फ्रॉम होमची संकल्पना खऱ्या अर्थानं सुरू झाली ती कोरोना महामारीनंतर (Corona pandamic). मात्र आता कर्मचाऱ्यांना ऑफीस खुणावू लागलं आहे. पाहूया, काय सांगतोय अहवाल!
Top 5 Books on Personal Finance: तुम्हालाही दैनंदिन आयुष्यात पैशाचे योग्य नियोजन, गुंतवणूक आणि पैशाचे योग्य व्यवस्थापन करायचे असेल, तर काही पुस्तके नक्की वाचली पाहिजेत. यातून तुम्ही अर्थसाक्षर तर व्हालच सोबत श्रीमंतीचा मंत्रही तुम्हाला मिळेल.
Government Schemes : सरकारकडून अशा अनेक योजना राबवल्या जात आहेत, ज्यांची बहुतांश लोकांना माहिती नाही. समानतेचा अधिकार देण्यासाठी आणि देशातील भेदभाव दूर करण्यासाठी सरकार अशीच योजना राबवत आहे, जी लोकांना सामाजिक सुरक्षा देण्याबरोबरच आर्थिक मदतही करते. 'आंतरजातीय विवाह योजना' योजना एक आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देणारी योजना आहे, जी विवाहित लोकांना लाखो रुपयांपर्यंत रक्कम देते.