अमेरिकन मोबाईल कंपनी अॅपलने निर्मितीचे काम पूर्ण क्षमतेने भारातातून सुरू केले आहे. चीनमधून अॅपल कंपनीचे निर्मितीचे काम हळूहळू बंद करून भारतास प्राधान्य दिले आहे.. मागील वर्षात एप्रिल ते डिसेंबर या फक्त 9 महिन्यांच्या काळात कंपनीने तब्बल अडीचशे कोटी अॅपल फोन भारतातून निर्यात केले. अॅपल ही अमेरिकेची बलाढ्य टेक कंपनी असून चीनपेक्षा भारताला निर्मितीसाठी प्राधान्य देत आहे. कर्नाटकातील बंगळुरु शहराजवळ अॅपल मोबाईल निर्मिती प्रकल्प आहे.
फॉक्सकॉन टेक्नॉलॉजी ग्रूप आणि विस्ट्रॉन कार्पोरेशनला मोबाइल निर्मितीचे काम अॅपल कंपनीने दिलेले आहे. हे दोन्ही प्रकल्प भारतामध्ये आहेत. या दोन्ही कंपन्यांनी मागील वर्षात प्रत्येकी शंभर कोटींपेक्षा जास्त मोबाईलची निर्मिती करून निर्यात केली. तर पेगाट्रॉन ही कंपनी सुमारे ५० कोटी अॅपलचे गॅझेट निर्मिती करत असून याचीही निर्यात परदेशात होईल. अॅपलच्या उत्पादनाच्या आकडेवारीवरून स्पष्ट दिसते की, कंपनीने चीनमधून होणारी निर्मिती कमी केली असून भारतामधून मोठ्या प्रमाणात निर्मिती प्रकल्पाला सुरुवात केली आहे.
आयफोन कंपनीने मागील वर्षापासून भारतामध्ये आपल्या लेटेस्ट आयफोन्सची अॅसेंबलिंग सुरू केली. सुरुवातीला हे काम चिनी कंपन्यांकडून केले जात असे. मात्र, आता भारताला यासाठी प्राधान्य देण्यात येत आहे. मेक इन इंडिया प्रकल्पाअंतर्गत भारताकडून देशांतर्गत निर्मितीला प्राधान्य देण्यात येत आहे. निर्मिती प्रकल्पांसाठी चीनला एक सक्षम पर्याय म्हणून भारत पुढे येत आहे.
चीनमधील फॉक्सकॉनच्या प्रकल्पात हिंसाचार
काही दिवसांपूर्वी चीनमधील झेंगझाऊ शहरामधील अॅपल मोबाईलची निर्मिती करणाऱ्या फॉक्सकॉन प्रकल्पात हिंसाचाराची घटना घडली होती. तसेच चीनमध्ये कोरोना विरोधात झिरो कोविड पॉलिसी राबवण्यात आली. त्याचा परिणाम उत्पादन आणि निर्यातीवर झाला. त्यामुळे मोबाईल आणि अॅपलची इतर उत्पादने निर्मितीसाठी फक्त चीनवर विसंबून राहू शकत नाही, याची जाणीव अॅपलला झाली. त्यामुळे त्यांनी चीन मधून गुंतवणूक काढून घेण्यास सुरुवात केली आहे.