Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

iPhone 14 Discount Offer: 'या' ठिकाणी iPhone 14 वर मिळतोय बक्कळ डिस्काउंट!

iPhone 14 Discount Offer

Image Source : www.apple.com

iPhone 14 Discount Offer: तुम्हाला देखील iPhone 14 खरेदी करायचा आहे? जर उत्तर हो असेल, तर जास्तीत जास्त डिस्काउंट कुठे मिळतोय ते जाणून घ्या.

भारतीय बाजारपेठेत आयफोन 15 लॉन्च न झाल्याने सध्या आयफोन 14 (iPhone 14) चीच चलती आहे. भारतातील दिल्ली आणि मुंबई शहरांमध्ये अ‍ॅपल स्टोअर (Apple stores) सुरु झाले आहे. या स्टोअरमधून ग्राहकांना अ‍ॅपलचे थेट प्रोडक्ट खरेदी करता येणार आहे. सोबतच वेगवेगळ्या सेवांचा लाभ देखील घेता येणार आहे. पण अ‍ॅपलच्या प्रोडक्टची किंमत ही सर्वसामान्यांना परवडणारी नसल्याने तो खरेदी करणे प्रत्येकालाच शक्य होत नाही. पण हाच iPhone 14 तुम्हाला मूळ किमतीपेक्षा कमी किमतीत खरेदी करता आला, तर? होय हे शक्य आहे. आज आम्ही तुम्हाला अशी माहिती देणार आहोत, जिथून तुम्ही कमी किमतीत iPhone 14 खरेदी करू शकता.

अ‍ॅपल स्टोअर (Apple Store)

सध्या देशात मुंबई आणि दिल्ली या दोन शहरांमध्ये अ‍ॅपल स्टोअर (Apple Store) उभारण्यात आले आहेत. या ठिकाणाहून ग्राहक थेट iPhone 14 ची खरेदी करू शकतात. अ‍ॅपल स्टोअरमध्ये ग्राहकांना iPhone 14 साठी 79,990 रुपये मोजावे लागणार आहेत. जर ग्राहकांकडे HDFC बँकेचे क्रेडीट कार्ड असेल, आणि त्यांनी त्यावर खरेदी केली तर त्यांना 5,000 रुपयांचा डिस्काउंट दिला जाणार आहे. याशिवाय जुना आयफोन एक्सचेंज करून ग्राहक आणखी डिस्काउंट मिळवू शकतात.

विजय सेल्स (Vijay Sales)

भारतातील नामांकित दुकान विजय सेल्समध्ये तुम्ही अनेक इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी करू शकता. iPhone 14 ची खरेदी देखील ग्राहकांना येथून करता येणार आहे. विजय सेल्समध्ये iPhone 14 ग्राहकांना 70,990 रुपयांना खरेदी करता येणार आहे. विशेष म्हणजे जर तुमच्याकडे HDFC क्रेडीट बँकेचे कार्ड असेल, तर तुम्हाला त्यावर 4,000 रुपयांचा कॅशबॅक (Cashback) मिळणार आहे. ज्यानंतर या फोनची किंमत 66,990 रुपये इतकी होईल.

क्रोमा (Croma)

भारतातील अनेक शहरांमध्ये सध्या क्रोमा शॉप (Croma Shop) उपलब्ध आहे. या ठिकाणी iPhone 14 साठी ग्राहकांना 71,999 रुपये मोजावे लागणार आहेत. मात्र HDFC क्रेडीट कार्डचा वापर करून ग्राहकांना 4,000 रुपयांचा डिस्काउंट (Discount) देण्यात येणार आहे. या डिस्काउंटनंतर या फोनची किंमत 67,999 रुपये होईल.

अ‍ॅमेझॉन (Amazon)

ऑनलाईन रिटेल वेबसाईट अ‍ॅमेझॉनवर या फोनची किंमत 71,799 रुपये निश्चित करण्यात आली आहे. ग्राहक अ‍ॅमेझॉनवर जुने आयफोन एक्सचेंज करू शकतात. सध्या अ‍ॅमेझॉनवर आयफोन एक्सचेंज (iPhone Exchange Offer) अंतर्गत 22,700 रुपयांचा एक्सचेंज डिस्काउंट दिला जात आहे. सोबतच एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डवरून (HDFC Credit Card Offer) हा फोन खरेदी केल्यास ग्राहकांना 4,000 रुपयांचा डिस्काउंट दिला जाणार आहे. हा डिस्काउंट अधिक 22,700 रुपयांचा एक्सचेंज डिस्काउंट पकडून ग्राहकांना एकूण 26,700 रुपयांचा डिस्काउंट मिळणार आहे. त्यामुळे अ‍ॅमेझॉनवर ग्राहकांना iPhone 14 हा 45,299 रुपयांपर्यंत खरेदी करता येणार आहे.

फ्लिपकार्ट (Flipkart)

शॉपिंग वेबसाईट फ्लिपकार्टवर iPhone 14 ची किंमत 71,799 रुपये निश्चित करण्यात आली आहे. तसेच खरेदीदार या वेबसाईटवर जुना आयफोन देखील एक्सचेंज करू शकतात. सध्या फ्लिपकार्टवर ग्राहकांना आयफोन एक्सचेंज अंतर्गत 29,250 रुपयांचा एक्सचेंज डिस्काउंट दिला जात आहे. यासोबतच ग्राहकांनी एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डवरून (HDFC Credit Card Offer) हा फोन खरेदी केल्यास ग्राहकांना 4,000 रुपयांचा डिस्काउंट त्वरित देण्यात येईल. हे दोन्ही डिस्काउंट मिळून ग्राहकांना 33,250 रुपयांचा डिस्काउंट मिळणार आहे. हा डिस्काउंट मिळाल्यानंतर ग्राहकांना iPhone 14, हा फक्त 38,749 रुपयांना खरेदी करता येणार आहे. 

Source: hindi.moneycontrol.com