Flipkart's Sale For iPhone 13: अनेक लोक इलेक्ट्रॉनिक्स वस्तु आणि मोबाईल फोन खरेदी करण्यासाठी बिग बिलियन डेज, ई-कॉमर्स साइट्सची वार्षिक विक्री आणि ऑफरर्सची प्रतिक्षा करीत असतात. आजच्या परिस्थितीत विक्रेते स्मार्टफोनच्या कमी विक्रीमुळे चिंतेत आहेत. त्यामुळे ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टने समर ऑफर सुरु केल्या आहेत. मोठ्या सणासुदीच्या काळात ज्याप्रमाणे ऑफर दिल्या जातात, त्याप्रमाणे स्मार्टफोन आणि आयफोनवर मोठ्या सवलती दिल्या जात आहे.
5000 रुपयांची बचत
तु्म्हाला जर का iPhone 13 घ्यायचा असेल, तर फ्लिपकार्टने नुकतीच आयफोन 13 ची विक्री सुरु केली आहे. फ्लिपकार्टने iPhone 13 ची किंमत 57,999 रुपये ठेवली आहे. तर इतर ई-कॉमर्स वेबसाइटवर आयफोन 13 ची किंमत 62,999 रुपये आहे. यावरुन अंदाज लावल्यास तुम्ही फ्लिपकार्टच्या समर सीझन सेलमधून आयफोनच्या खरेदीवर 5000 रुपये वाचवू शकता.
कार्डने पेमेंट केल्यास सवलत
Flipkart वर Axis Bank Card वरुन iPhone 13 खरेदी केल्यास 57,999 रुपयांवर पाच टक्के सूट दिली जाते. ज्यामुळे तुमचे 2900 रुपये वाचते. एकंदर तुमचे एमआरपी रेट पेक्षा 8000 रुपये बचत होते. त्यामुळे जर तुम्हाला ई-कॉमर्स कंपन्यांच्या वार्षिक विक्रीची वाट पाहायची नसेल, तर आता iPhone 13 खरेदी करा.
इतर पर्याय
आणखी एक पर्याय म्हणजे जर तुमचा कोणी मित्र Apple स्टोअर मध्ये काम करीत असेल तर, त्याला iPhone खरेदीवर 25 टक्के सूट मिळेल. कारण Apple दर 2 वर्षांनी आपल्या कर्मचाऱ्यांना 500 डॉलर क्रेडीट देत असते. त्यामुळे तुमचा जर कोणी मित्र Apple मध्ये काम करीत असेल, तर तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकता.