Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Mutual Fund Investment: भारतीय गुंतवणूकदारांचे पॅसिव्ह फंडांना प्राधान्य, आतापर्यंत 7 लाख कोटींची एकूण गुंतवणूक

Mutual Fund

Image Source : www.business-standard.com

Mutual Fund Investment: पॅसिव्ह फंड अमेरिकेत मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहेत आणि त्यांचा बाजारातील हिस्सा 50% पेक्षा जास्त आहे.गेल्या काही वर्षांत भारतातही असाच ट्रेंड दिसू लागला आहे. जवळपास 17% मार्केट शेअरसह पॅसिव्हफंडात गुंतवणूक आहे.

मोतीलाल ओसवाल अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनी (MOAMC) च्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, गेल्या काही वर्षांत पॅसिव्ह फंड्ज भारतीय गुंतवणूकदारांसाठी पहिली पसंत ठरत आहेत. पॅसिव्ह फंडांची 2015 मधील AUM 1.4% वरुन आज थेट 17% पेक्षा जास्त वाढली आहे. MOAMC भारतामध्ये 30 इंडेक्स फंड, ETF आणि FOF मध्ये, AUM मध्ये 17000 कोटीपेक्षा जास्त असलेल्या पॅसिव्ह फडाचीची विस्तृत श्रेणी आहे.

देशभरातील 2,000 हून अधिक गुंतवणूकदारांनी भाग घेतलेल्या या सर्वेक्षणात भारतातील पॅसिव्ह फंडच्या वापराबद्दल आणि गुंतवणूकदारांच्या वृत्तीबद्दल  निष्कर्ष काढण्यात आला. मोतीलाल ओसवाल अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडचे एमडी आणि सीईओ नवीन अग्रवाल म्हणाले,“गेल्या काही वर्षांत पॅसिव्ह गुंतवणुकीची मागणी झपाट्याने वाढली आहे, जी 54% च्या CAGR वर गेल्या 5 वर्षांत 8.5x ची AUM वाढ दर्शवते.इनोव्हेशन आणि शिक्षणाप्रती आमची वचनबद्धता भारतातील पॅसिव्हफंडच्या भविष्याला पाठिंबा देत राहील.”  

सर्वेक्षणाच्या निष्कर्षांनुसार 61% गुंतवणूकदारांनी किमान 1 पॅसिव्ह फंडात गुंतवणूक केली आहे. जे भारतात पॅसिव्ह फंडांचा वेगाने वाढता स्वीकार अधोरेखित करते. गुंतवणूकदारांनी पॅसिव्ह फंडात गुंतवणूक करण्याचे कारण उघड केले,सर्वेक्षणाचे निष्कर्ष असे दर्शवितात की 57% गुंतवणूकदारांच्या मते कमी खर्चाच्या स्वभावामुळे या फंडांना प्राधान्य देतात हे सर्वात मोठे कारण आहे. त्यापाठोपाठ 56% गुंतवणूकदारांना असे वाटते की या फंडांचा साधेपणाच त्यांना त्यात गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करतो. 54% पेक्षा जास्त गुंतवणूकदारांना वाटते की पॅसिव्ह फंड चांगला परतावा देतात.

पॅसिव्ह फंडांच्या AUM वाढ

म्युच्युअल फंड उद्योगात गेल्या पाच वर्षांत पॅसिव्ह फंडांकडे मोठा बदल झाला आहे.आर्थिक वर्ष 2018 च्या अखेरीस सर्व पॅसिव्ह फंडांचा एकत्रित AUM सुमारे 83,000 कोटी रुपये होता.मार्च-2023 पर्यंत ती वाढून 7,00,000 कोटी रुपयांपेक्षा झाली आहे, जी केवळ 5 वर्षांत 54% CAGR 8.5 पटीने वाढली आहे.

पॅसिव्ह फंडात गुंतवणूक करणाऱ्यांपैकी निम्मे लोक आपल्या पोर्टफोलिओतील 10 ते 30 % रक्कम पॅसिव्ह फंडांना देतात, असे सर्वेक्षणातून समोर आले आहे.सुमारे 15% गुंतवणूकदारांनी सांगितले की त्यांनी पॅसिव्ह फंडांमध्ये 31-50% वाटप केले आहे, तर 12% म्हणाले की त्यांनी त्यांच्या पोर्टफोलिओचा 50% पेक्षा जास्त भाग पॅसिव्ह फंडांमध्ये वाटप केला आहे.दुसरीकडे, 28% गुंतवणूकदारांचे पॅसिव्ह फंडांमध्ये 10% पेक्षा कमी वाटप आहे.

प्रमुख ठळक मुद्दे

  • 61% प्रतिसादकर्ते म्हणतात की त्यांनी किमान 1 पॅसिव्हफंडात गुंतवणूक केली आहे.
  • पॅसिव्हफंडांमध्ये गुंतवणूक करण्याची शीर्ष 3 कारणे कमी खर्च, साधेपणा आणि बाजारातील परतावा ही आहेत.
  • 53% प्रतिसादकर्त्यांचे म्हणणे आहे की त्यांनी गेल्या 12 महिन्यांत पॅसिव्हफंडसाठी त्यांचे वाटप वाढवले ​​आहे
  • 4 पैकी  3 प्रतिसादकर्त्यांनी म्हटले आहे की ते एसआयपी मध्ये गुंतवणूक  करणे  पंसत करत आहेत. 
  • दीर्घकालीन संपत्ती निर्मितीसाठी गुंतवणुकीच्या शिस्तीचे महत्त्व अधोरेखित केले आहे.
  • सुमारे 60% प्रतिसादकर्त्यांनी सांगितले की ते बाजार आणि गुंतवणुकीच्या माहितीसाठी सोशल मीडियावर अवलंबून असतात
  • 80% पेक्षा जास्त प्रतिसादकर्ते म्हणतात की त्यांची गुंतवणूक 3 वर्षांपेक्षा जास्त काळ ठेवण्याची त्यांची योजना आहे.
  • गुंतवणूकदारांचा इंडेक्स फंड आणि ETFs मध्ये प्राधान्य असल्याचे दिसून येते