शेअर बाजारात (Share market) सातत्यानं तेजी पाहायला मिळत आहे. शेअर बाजारानं नुकताच 66000चा टप्पा ओलांडला. अनेक कंपन्यांच्या शेअर्समध्येदेखील तेजी पाहायला मिळत आहे. गुंतवणूकदारांना (Investors) चांगला नफा मिळत आहे. आता गुंतवणूकदारांना श्रीमंत बनवणारी अशीच एक कंपनी म्हणजे अॅपटेक लिमिटेड. 1986मध्ये कंपनीची स्थापना झाली. 800 केंद्रांसह कंपनी अॅपटेक आयटी रशिक्षण, मीडिया आणि मनोरंजन, रिटेल यांसारख्या अनेक क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे. अॅपटेक लिमिटेडनं 2:5च्या प्रमाणात बोनस जारी केला आहे. याचा अर्थ भागधारकांकडे असलेल्या प्रत्येक 5 शेअर्समागे त्यांना अतिरिक्त 2 बोनस शेअर्स मिळतील. त्याची रेकॉर्ड डेट शुक्रवार, 14 जुलै 2023 ही निश्चित करण्यात आली आहे.
Table of contents [Show]
तीन वर्षातला आढावा
कंपनीनं गेल्या वर्षात 134 टक्क्यांचा बंपर परतावा दिला आहे. गेल्या 3 वर्षात गुंतवणूकदारांना 375 टक्के परतावा मिळाला आहे. कंपनीचा आरओसीई 34.8 टक्के आणि आरओई 29 टक्के आहे. याशिवाय कंपनीनं गेल्या 3 वर्षात तिची विक्री 43 टक्के (CAGR) आणि त्याच कालावधीत नफा 71 टक्क्यानं (CAGR) वाढवला आहे.
शेअर्समध्ये 7.6 टक्क्यांपेक्षा जास्त उसळी
आजही कंपनीच्या शेअर्समध्ये 7.6 टक्क्यांपेक्षा जास्त उसळी पाहायला मिळत आहे. तो 387.35 रुपयांच्या इंट्राडे उच्चांकावर पोहोचला आहे. शिवाय शेअर्सचं प्रमाण 2.94 पटीनं वाढलं. नफा मिळविण्यासाठी गुंतवणूकदार हा स्टॉक त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट करू शकतात.
आतापर्यंत 40 टक्क्यांची झेप
बुधवारी (12 जुलै) एनएसईवर शेअर्स जवळपास 3.09 टक्क्यांनी घसरून 478.90 रुपयांवर होते. या वर्षी आतापर्यंत त्यांनी 40 टक्के झेप घेतली आहे. बोनस इश्यू व्यतिरिक्त, कंपनीनं आर्थिक वर्ष 2023साठी प्रति शेअर 6 रुपये अंतरिम लाभांशदेखील जाहीर केला आहे. हा लाभांश पेमेंट एजीएममधल्या भागधारकांच्या मान्यतेच्या अधीन असणार आहे.
मल्टीबॅगर परतावा
अॅपटेक संगणक प्रशिक्षण आणि मल्टीमीडिया सेवा प्रदान करणारी कंपनी आहे. मालकीसह कंपनीच्या भारत आणि परदेशात आयटी प्रशिक्षण सेंटर्सची फ्रेंचायझी आहे. कंपनीच्या समभागांनी गेल्या एक वर्षाच्या कालावधीत 109 टक्के वाढून गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर असा परतावा दिला आहे. गेल्या वर्षी 12 जुलै रोजी शेअरचा व्यवहार 218 रुपयांच्या आसपास झाला होता.