Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Indian Startup: भारतीय स्टार्टअपमध्ये गुंतवणूक रोडावली, गेल्या 4 वर्षातील सर्वात कमी गुंतवणुकीची नोंद

Indian Startup

गेल्या सहामाहीत झालेल्या गुंतवणुकीत जवळपास 57% गुंतवणूक ही नवोदित स्टार्टअप्समध्ये झाल्याचे देखील या अहवालात नमूद केले गेले आहे. जगभरात असलेल्या आर्थिक मंदीचे संकट यासाठी कारणीभूत असल्याचा अंदाज देखील व्यक्त करण्यात आला आहे. गुंतवणुकदार सध्या विचारपूर्वक आणि जगभरात सुरु असलेल्या घडामोडींवर लक्ष ठेवून आहे, त्यामुळे गुंतवणूक करताना ते भरपूर वेळ घेत असल्याचे देखील यात म्हटले आहे.

भारतात स्टार्टअप कंपन्या सुरु व्हाव्यात, युवा उद्योजकांना नवनवीन संधी मिळाव्यात आणि त्यानिमित्ताने देशभरात रोजगार निर्माण व्हावेत या हेतून भारत सरकार वेगवेगळ्या योजना राबवत आहे. गेल्या एकाही वर्षांपासून स्टार्टअप्सला चांगला प्रतिसाद असताना गेल्या सहामाहीत स्टार्टअप मधील गुंतवणूक कमी झाल्याचे दिसून आले आहे. भारतीय स्टार्टअप कंपन्यांमधील गुंतवणूक 2023 च्या पहिल्या सहामाहीत वार्षिक 36 टक्क्यांनी घसरून 3.8 अब्ज डॉलर इतकी नोंदवली गेली आहे. ही गेल्या चार वर्षांतील नीचांकी पातळी आहे. गेल्या सहा महिन्यात भारतीय स्टार्टअप्समध्ये 298 गुंतवणुकीचे करार झाले आहेत. मागील वर्षीची आकडेवारी बघता, गेल्या वर्षीच्या सहामाईत देशांतर्गत स्टार्टअपमध्ये 5.9 अब्ज डॉलर गुंतवले गेले होते.म्हणजेच मागील वर्षीपेक्षा 2.1 अब्ज डॉलरने गुंतवणूक घटली आहे.

Pricewater house Coopers या खासगी कंपनीने जाहीर केलेल्या एका अहवालात ही नोंद करण्यात आली आहे. गेल्या सहामाहीत झालेल्या गुंतवणुकीत जवळपास 57% गुंतवणूक ही नवोदित स्टार्टअप्समध्ये झाल्याचे देखील या अहवालात नमूद केले गेले आहे. जगभरात असलेल्या आर्थिक मंदीचे संकट यासाठी कारणीभूत असल्याचा अंदाज देखील व्यक्त करण्यात आला आहे. गुंतवणुकदार सध्या विचारपूर्वक आणि जगभरात सुरु असलेल्या घडामोडींवर लक्ष ठेवून आहे, त्यामुळे गुंतवणूक करताना ते भरपूर वेळ घेत असल्याचे देखील यात म्हटले आहे. या सर्व कारणांमुळे स्टार्टअप्समधील गुंतवणूक रोडावली आहे.

कॉस्मोपॉलिटिन सिटीला पसंती! 

बंगळुरू शहर हे स्टार्टअप्ससाठी अनुकूल असे शहर मानले जाते. देशातील सर्वाधिक स्टार्टअप्सची मुख्यालये ही बंगळुरू शहरात आहे. बंगळुरू, एनसीआर, आणि मुंबईत देशभरातील एकूण गुंतवणुकीच्या 83% गुंतवणूक झाली असल्याचे अहवालात म्हटले आहे. गेल्या सहामाहीत जगभरात आणि देशात आर्थिक परिस्थिती चढउताराची असतानाही या शहरांमधील स्टार्टअप्सला गुंतवणूकदारांनी पसंती दिली आहे.