Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Small Cap Funds: महिन्याला 10 हजार रुपये गुंतवा आणि 47 लाख रुपये मिळवा, कसे ते जाणून घ्या

Mutual Fund Investment in Small Cap

Image Source : www.economictimes.indiatimes.com

Small Cap Funds: म्युच्युअल फंडमध्ये एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जुलै महिन्यात स्मॉल कॅप कॅटेगरीमध्ये जवळपास 4,171 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. यातील आपण निवडक 3 स्मॉल कॅप म्युच्युअल फंडच्या कामगिरीबद्दल जाणून घेऊ.

Small Cap Funds: म्युच्युअल फंडमध्ये स्मॉल कॅप, मिड कॅप आणि लार्ज कॅप असे प्रकारच्या कॅपचे फंड आहेत. त्यातील स्मॉल कॅप फंडमध्ये मोठ्या प्रमाणात अस्थिरता असते. पण या अस्थिरतेमुळेच मागील 10 वर्षात काही स्मॉल कॅप फंडांनी गुंतवणूकदारांना भरघोस परतावा दिला आहे. हा परतावा जवळपास वार्षिक 20 ते 25 टक्के असल्याचे दिसून येते. यातील आपण निवडक 3 स्मॉल कॅप म्युच्युअल फंडबद्दल सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

म्युच्युअल फंडमध्ये एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात वेगवेगळ्या कॅपमध्ये गुंतवणूक करणारे गुंतवणूकदारही आहेत. जुलै महिन्यात स्मॉल कॅप कॅटेगरीमध्ये जवळपास 4,171 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती. स्मॉल कॅपमधील गुंतवणुकीवर गुंतवणूकदार इतका विश्वास का दाखवत आहेत. हे सुद्धा आपण समजून घेणार आहोत.

स्मॉल कॅप कंपन्यांवर गुंतवणूकदारांचा विश्वास

शेअर मार्केटमधील तज्ज्ञांच्या मते गुंतवणूकदारांना स्मॉल कॅपमध्ये खूप सारे पर्याय मिळत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदार स्मॉल कॅपमध्ये गुंतवणूक करण्यास पसंती देत ही गुंतवणूक दीर्घकाळासाठी करत आहेत. त्यात भारताची अर्थव्यवस्था टप्प्याटप्प्याने वरचा टप्पा गाठत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनाही त्याचा लाभ होत आहे.

स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चढ-उतार होत असतात. या चढ-उतारामुळे या स्मॉल कॅप कंपन्या मिड कॅप बनण्याची क्षमता निर्माण होते. परिणामी दीर्घकाळात या कंपन्यांमधील ग्रोथ झपाट्याने होत असल्याचे दिसून येते.

Small Cap SIP Calculator

मासिक गुंतवणूक
अपेक्षित परतावा दर
%
कालावधी
Yr
गुंतवणूक केलेली रक्कम
अंदाजे परतावा
एकूण मूल्य

एसबीआय स्मॉल कॅप फंड (SBI Small Cap Fund)

एसबीआय स्मॉल कॅप फंडाने मागील 10 वर्षात एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना 24.01 टक्के परतावा दिला आहे. ज्या गुंतवणूकदारांनी या फंडमध्ये गेल्या 10 वर्षात प्रत्येक महिन्याला 10 हजार रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्यांचे आजचे मूल्य 42.73 लाख रुपये झाले आहे. एसआयपीच्या माध्यमातून या फंडमध्ये किमान 1 हजार रुपये तर एकत्रितरीत्या (Lumpsum) किमान 5 हजार रुपयांपासून गुंतवणूक करता येते.

निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप (Nippon India Small Cap Fund)

निप्पॉन इंडियाच्या स्मॉल कॅप फंडने गेल्या 10 वर्षात गुंतवणूकादारांना 25.86 टक्के परतावा दिला आहे. निप्पॉन इंडिया स्मॉल कॅपमध्ये एसआयपीद्वारे किमान 1 हजार आणि Lumpsum मधून किमान 5 हजार रुपयांची गुंतवणूक करता येते. ज्या गुंतवणूकदारांनी या फंडमध्ये प्रत्येक महिन्याला 10 हजारांची एसआयपी केली असेल त्याचे आजचे मूल्य 47.23 लाख रुपये असेल.

क्वांट स्मॉल कॅप फंड (Quant Small Cap Fund)

क्वांट स्मॉल कॅप फंडाने मागील 10 वर्षात एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करणाऱ्यांना 23.55 टक्के रिटर्न दिले आहेत. 10 हजारांची SIP करणाऱ्या गुंतवणूकदारांचे मूल्य आज 41.68 लाख रुपये झाले असेल. यामध्ये किमान 1 हजार आणि 5 हजार रुपयांची गुंतवणूक अनुक्रमे एसआयपी आणि एकत्रितरीत्या करता येते.

(डिसक्लेमर : म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. 'महामनी' म्युच्युअल फंड खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)