LIC Jeevan Umang Policy: एलआयसीने एक अशी पॉलिसी आणली आहे; जी पॉलिसीधारकाचे लाईफ सिक्युर्ड तर करतेच पण त्याचबरोबर पाॉलिसीधारकाच्या पश्चात त्याच्या कुटुंबियांना आर्थिक सुरक्षितता मिळवून देण्यास मदत करते. पॉलिसीचा प्रीमिअम भरण्याची मुदत संपल्यापासून ती मॅच्युअर्ड होईपर्यंत ही पॉलिसी लाभ देते. त्याशिवाय पॉलिसीधारकाचा मॅच्युरिटीपूर्वीच किंवा त्यादरम्यान मृत्यू झाल्यास कुटुंबियांना एकरकमी रक्कम मिळते. या पॉलिसीचे नाव आहे एलआयसी जीवन उमंग पॉलिसी.
प्रथामिक दर्शनी या पॉलिसीचे दोन महत्त्वाचे फायदे आहेत. त्यातील पहिला फायदा म्हणजे पैशांची मदत आणि आणि दुसरा म्हणजे इन्शुरन्स कव्हर. जो पॉलिसीधारकाच्या पश्चात त्याच्या कुटुंबियांना मिळते. आपत्कालीन परिस्थितीत खात्रीलायक मिळणारे फायदे खूप आधार देणारे ठरतात. त्यामध्ये जीवन उमंग पॉलिसीचा समावेश होऊ शकतो.
Table of contents [Show]
एलआयसी जीवन उमंग पॉलिसीची निवड का करावी?
- पॉलिसी मॅच्युअर्ड झाल्यानंतर त्यावर टॅक्स लागत नाही
- डेथ बेनिफिट लागू
- वयाच्या 100 व्या वर्षापर्यत इन्शुरन्स कव्हर लागू
- वयाच्या 30 वर्षापर्यंत खात्रीशीर उत्पन्न
एलआयसी जीवन उमंग पॉलिसीसाठी पात्रता काय?
- किमान 90 दिवसापासून आणि कमाल वयाच्या 55 व्या वर्षापर्यंत
- वयाच्या 100 व्या वर्षापर्यंत इन्शुरन्स कव्हर लागू
- किमान 2 लाखापर्यंत विम्याची रक्कम मिळू शकते
- कमाल रकमेसाठी मर्यादा नाही.
एलआयसी जीवन उमंग पॉलिसीचे फायदे
जीवन उमंग पॉलिसी अंतर्गत पॉलिसीधारकाला वयाच्या 100 व्या वर्षापर्यंत लाभ मिळतो. त्याचबरोबर अपघाती मृत्यू, अपंगत्व आल्यास त्याची आर्थिक नुकसान भरपाई मिळते. त्याचबरोबर अंतिम अतिरिक्त बोनसही पॉलिसीधारकाला मिळतो. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पॉलिसीधारकाचे वय 100 वर्षे होऊपर्यंत किंवा त्याचा मृत्यू होईपर्यंत त्याला दरवर्षी मूळ इन्शुरन्सच्या रकमेच्या 8 टक्के रक्कम मिळत राहते.
एलआयसी जीवन उमंग पॉलिसी कॅल्क्युलेटर
जर एका 30 वर्षाच्या तरुणाने या पॉलिसीत प्रत्येक महिन्याला 5,000 रुपये किंवा तीन महिन्याने 15,000 रुपये किंवा वर्षाला 50,000 रुपये गुंतवले. तर त्याला किमान इन्शुरन्स म्हणून 2 लाख रुपये तर मिळतील आणि त्याने जर सलग 20 वर्षे प्रीमिअम भरला तर त्याला वयाच्या 70 वर्षापर्यंत पॉलिसीची फायदा घेता येईल आणि त्याची कमाल इन्शुरन्स रक्कम असेल 10 लाख रुपये. अशाप्रकारे एलआयसीच्या जीवन उमंग पॉलिसीद्वारे 10 रुपये मिळवता येऊ शकतात.