ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रधानमंत्री वय वंदना योजना (PMVVY 2023) चे सदस्यत्व घेण्यासाठी फक्त दोन महिने शिल्लक आहेत. LIC द्वारे प्रशासित, PMVVY ही 60 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारी अनुदानित पेन्शन योजना आहे. ही योजना ज्येष्ठ नागरिकांना 15 लाख रुपयांपर्यंत एकरकमी भरून लगेच मासिक, तिमाही, अर्धवार्षिक किंवा वार्षिक पेन्शन देणारी योजना आहे. तेच पती-पत्नी दोघेही ज्येष्ठ नागरिक असल्यास दोघांसाठी प्रत्येकी 15 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक केल्यास दोघांचे मिळून 24,000 रुपये पेन्शनच्या स्वरूपात प्राप्त होऊ शकतात.
Table of contents [Show]
31 मार्च, 2023 पर्यंत घेता येणार योजनेचा लाभ
LIC ची प्रधानमंत्री वय वंदना योजना (प्लॅन क्र. 856) खरेदी करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2023 आहे. म्हणजेच PMVVY 31 मार्च 2023 पर्यंत विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. PMVVY विक्री संपायला फक्त दोन महिने शिल्लक असताना, या योजनेचे सदस्यत्व घेतल्याने ज्येष्ठ नागरिकांना लाभ, पात्रता आणि किती पेन्शन मिळू शकते यावर एक नजर टाकूया.
PMVVY पात्रता काय आहे?
एलआयसीच्या वेबसाइटनुसार, वयाची 60 वर्षे (पूर्ण) आणि त्याहून अधिक वयाचे, भारतातील ज्येष्ठ नागरिक PMVVY योजना खरेदी करू शकतात. आणि महत्वाचे म्हणजे, ही योजना खरेदी करण्यासाठी कोणतीही उच्च वयोमर्यादा नाही.
PMVVY पॉलिसी टर्म आणि पेन्शन पेमेंट मोड
ज्येष्ठ नागरिकांसाठी या योजनेची मुदत 10 वर्षे आहे. PMVVY अंतर्गत खरेदीदाराने निवडलेल्या पेन्शन पेमेंट मोडनुसार मासिक पेन्शन, तिमाही पेन्शन, अर्धवार्षिक पेन्शन किंवा वार्षिक पेन्शन दिले जाऊ शकते.
PMVVY अंतर्गत पेन्शनचा पहिला हप्ता योजनेच्या खरेदीच्या तारखेपासून 1 वर्ष, 6 महिने, 3 महिने किंवा 1 महिन्यानंतर सुरू होतो. उदाहरणार्थ - जर तुम्ही पेन्शन पेमेंटचा मासिक मोड निवडला असेल, तर तुम्ही योजना आत्ता खरेदी केल्यास तुमचे पेन्शन 1 महिन्यानंतर सुरू होईल.
PMVVY फायदे काय आहेत?
- PMVVY पेन्शन, मृत्यू लाभ (डेथ-बेनिफिट्स) आणि परिपक्वता लाभ (मॅच्युरिटी बेनिफिट्स) प्रदान करते.
- ग्राहकाने निवडलेल्या पेन्शन मोडवर अवलंबून, PMVVY 10 वर्षांच्या पॉलिसी मुदतीसाठी पेन्शन प्रदान केली जाते.
- पॉलिसीची खरेदी किंमत 10 वर्षांच्या पॉलिसी मुदतीत पेन्शनधारकाच्या मृत्यूनंतर लाभार्थींना परत केली जाते.
- तसेच ग्राहक 10 वर्षांची पॉलिसी टर्म यशस्वीपणे पूर्ण केली, तर पॉलिसी खरेदीची संपूर्ण रक्कम शेवटच्या हप्त्यासह परत केली जाते.
PMVVY 2023 योजनेंतर्गत व्याज दर काय आहे?
31-03-2023 पर्यंत खरेदी केलेल्या पॉलिसींसाठी, योजनेला लागू होणारा व्याज-दर म्हणजे दरमहा 8% वार्षिक देय असणार आहे. म्हणजे पॉलिसीधारकाने मासिक पेन्शन मोड निवडला असल्यास त्याला 8% दराने पेन्शन मिळणार आहे, तर पॉलिसीधारकाने वर्षांमधून एकदाच पेन्शन मिळण्याचा ऑप्शन निवडला असल्यास 8.3% दराने पेन्शन लागू होणार आहे. 31 मार्च 2023 पर्यंत खरेदी केलेल्या सर्व पॉलिसींसाठी 10 वर्षांच्या संपूर्ण पॉलिसी टर्मसाठी हा खात्रीशीर व्याजदर देय असेल.
PMVVY योजनेंतर्गत किती पेन्शन मिळेल?
PMVVY अंतर्गत किमान निवृत्तीवेतन 1000 रुपये प्रति महिना आहे. तर कमाल निवृत्तीवेतन 12 हजार रुपये प्रति महिना आहे.
PMVVY किती रिटर्न्स देते?
ज्येष्ठ नागरिकाने 10 वर्षांसाठी 15 लाख रुपयांची पॉलिसी खरेदी केल्यास जास्तीत जास्त 10,000 रुपये मासिक पेन्शन बसू शकेल. तर कमीत कमी गुंतवणुकीचा पर्याय म्हणजे 1.50 लाख रुपयांची गुंतवणूक करण्याचा पर्याय निवडल्यास ही योजना 10 वर्षांसाठी किमान 1000 रुपये प्रति महिना पेन्शन मिळेल. याव्यतिरिक्त ज्येष्ठ नागरिकांनी 10 वर्षांची पॉलिसी टर्म यशस्वीपणे पूर्ण केल्यास सुरूवातीला भरलेले मूळ 15 लाख रुपये परत केले जातील.
PMVVY साठी कागदपत्रे काय लागतात?
आधार कार्ड, पॅन कार्ड, वयाचा दाखल, उत्पन्नाचा दाखल, रहिवासाचे प्रमाणपत्र, बँकेचे पासबुक, मोबाईल नंबर आणि पासपोर्ट आकाराचा फोटो
PMVVY योजनेचा लाभ कसा घ्यायचा?
ही योजना ऑनलाईन खरेदी करण्यासाठी LIC च्या ऑफिशिअल वेबसाईटला व्हिजिट करू शकता आणि ऑफलाईन खरेदी करण्यासाठी जवळच्या LIC शाखेला देखील भेट देऊ शकता.