आता जवळपास सर्वच लोक एटीएम कार्ड वापरतात. परंतु तुमच्याकडे असलेल्या ATM कार्डसोबत तुम्हाला कोणकोणत्या सुविधा दिल्या जातात हे तुम्हाला माहिती आहे का? अनेकांना हे माहिती नसते की त्यांच्या एटीएम कार्डवर त्यांना विमा देखील दिला जातो. या लेखात आपण ATM कार्ड पुरविणाऱ्या कार्ड कंपन्या किती विमा देतात आणि काय सुविधा देतात ते पाहणार आहोत.
बँकेच्या एटीएम कार्डवर मोफत विमा
तुम्ही कोणत्याही बँकेचे एटीएम कार्ड 45 दिवसांपेक्षा जास्त काळ वापरत असाल तर तुमच्या ATM कार्डवर तुम्हांला विमा सुविधा पुरवली जाते, म्हणजेच तुम्ही विमा क्लेम करण्यासाठी पात्र आहात. यामध्ये अपघात विमा आणि जीवन विमा हे दोन विमा प्रामुख्याने दिला जातो. अनेक कार्ड युजर्सला याची माहिती नसते कारण कार्ड घेताना बँकेने दिलेले डॉक्युमेंट त्यांनी वाचलेली नसते. त्यामुळे तुम्ही देखील तुमच्या ATM कार्डसोबत बँकेने दिलेले कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा.
कार्डच्या श्रेणीनुसार विम्याची रक्कम निश्चित करण्यात आली आहे. क्लासिक कार्डवर रु. 1 लाखांपर्यंत, प्लॅटिनम कार्डवर रु. 2 लाखांपर्यंत, मास्टर कार्डवर रु. 5 लाखांपर्यंत, व्हिसा कार्डवर रु. 1.5 ते 2 लाखांपर्यंत आणि सामान्य मास्टर कार्डवर रु. 50,000 पर्यंत विमा रक्कम दिली जाते.
प्रधानमंत्री जन-धन योजनेअंतर्गत मोफत विमा
प्रधानमंत्री जन धन योजना खातेधारकांना बँकेच्या एटीएम कार्डवर विशेष मोफत विमा पॉलिसी दिली जाते. या विमा योजनेअंतर्गत,खातेधारकांना सुमारे 1 ते 2 लाखांचा मोफत विमा दिला जातो. एवढेच नाही तर अपघात झाल्यास 5 लाख रुपये आणि कोणत्याही कारणाने अपंगत्व आल्यास 50 हजार रुपये क्लेम करता येतील. याशिवाय दोन्ही पाय किंवा हात पूर्णपणे अपंग झाल्यास 1 लाख रुपयांपर्यंत आणि मृत्यू झाल्यास 1-5 लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण दिले जाते.
विमा क्लेम कसा कराल?
बँकेच्या एटीएम कार्डवर दिल्या गेलेल्या मोफत विम्याचा दावा करण्याची प्रक्रिया अतिशय सोपी आहे. यासाठी, सर्व प्रथम खातेधारक नॉमिनीची माहिती मिळवा. तुम्ही रुग्णालयातील उपचार खर्च, प्रमाणपत्र, पोलिस एफआयआरची प्रत यासह विम्याचा दावा करू शकता. याशिवाय खातेदाराचा मृत्यू झाल्यास, अशा स्थितीत नॉमिनी सदर व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र सादर करू शकतो.