Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Mother's Day 2023 : मातृदिनी आपल्या आईसाठी 'विमा पॉलिसी' ठरेल सर्वोत्तम भेट!

Mother's Day 2023 : मातृदिनी आपल्या आईसाठी 'विमा पॉलिसी' ठरेल सर्वोत्तम भेट!

Mother's Day 2023 : जागतिक मातृदिनानिमित्त आपल्या आईला भेट द्यायची असेल तर विमा पॉलिसी हीच सर्वोत्तम भेट ठरेल. आरोग्य आणि भविष्यकाळ या दोन्ही गोष्टी सुरक्षित करायच्या असतील तर आईसाठी याहून अधिक चांगलं गिफ्ट काय असेल? चला जाणून घेऊ...

यंदाचा मदर्स डे 14 मेला साजरा होतोय. प्रत्येकजण आपल्या आईला छानसं गिफ्ट (Gift) देण्याचं नियोजन करत असेल. कुणी कोणती भेटवस्तू देऊत, कुणी पुष्पगुच्छ तर कोणी आपल्या आईला आवडत्या वस्तूची भेट देईल. मात्र आम्ही तुम्हाला सर्वोत्तम गिफ्ट सांगत आहोत, ते म्हणजे विमा पॉलिसी (Insurance policy) होय. आई हा कुटुंबातला एक महत्त्वाचा घटक आहे. तेव्हा तिचा भविष्यकाळ चांगला असावा त्याचप्रमाणं तो आरोग्यदायीदेखील असावा, यासाठी नियोजन (Planning) करावं लागेत. यात विमा पॉलिसी नक्कीच हातभार लावणार आहे. भविष्यातल्या प्रत्येक आर्थिक बाबीचं नियोजन या माध्यमातून केलं जाणार आहे.

विम्याबद्दल शिक्षित करण्यावर हवा भर

आपल्या आईला कोणतं गिफ्ट द्यावं किंवा समजा विमा पॉलिसीच का गिफ्ट करावी या संभ्रमात तुम्ही असाल तर थोडा अधिक विचार करा. आईला इतरांप्रमाणे आरोग्यासंबंधी समस्या निर्माण होऊ शकतात. ती आजारी पडली किंवा एखाद्या दुर्धर आजाराचं निदान झालं तर ऐनवेळी तुम्ही काय करणार? समजा तुम्ही कौटुंबिक विमा (हेल्थ इन्शूरन्स) काढलेला असेल तर तो वैद्यकीय खर्चासाठी पुरेसा आहे का, या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधा. त्यानंतर तुम्हाला आपल्या आईसाठी विमा पॉलिसी किती गरजेची आहे, याचा अंदाज येईल. मातांना त्यांचं भविष्य सुरक्षित करायचं असेल तर विमा हा एक अत्यंत आवश्यक असा पर्याय आहे. मात्र दुर्दैवानं मातांना त्यांच्या विम्याच्या गरजेबद्दल शिक्षित करण्यावर जास्त भर दिला जात नाही.

का करावी आरोग्य विम्याची निवड?

वैद्यकीय खर्च ही अलिकडच्या काळातही एक आव्हानात्मक बाब झालीय. उपचार करणं महाग होत आहे. एखादा गंभीर आजार झाल्यास त्यावरचा खर्च केल्यानं आयुष्यभराची कमाईदेखील एका झटक्यात संपून जाऊ शकते. गंभीर आजारांच्या कव्हरेजचा समावेश असलेल्या मुदतीच्या योजनांमध्ये गुंतवणूक करायला हवी. त्यात फायदा आहे. कोणत्याही वैद्यकीय कारणानं त्रस्त असेल, विकारानं ग्रस्त असल्यास या माध्यमातून मातांना एकरकमी पैसे मिळू शकतात. कव्हरेज रक्कम उपचार सुरू असताना बिलांचं नियोजन करण्यास मदत करते.

सुरक्षा जाळं

पुष्पगुच्छ , भेटवस्तू या सर्व गोष्टी आता जुन्या झाल्या आहेत. या मदर्स डेला आईसाठी विविध पर्यायांमधली सर्वोत्तम अशी जीवन विमा पॉलिसी खरेदी करा. प्रत्येक आईकडे जीवन विमा पॉलिसी असणं आताच्या काळात गरजेची आहे. मात्र अनेकांकडे ती नाही. जीवनातल्या अनपेक्षित घटनांपासून संरक्षण करण्याच्या हेतूने सुरक्षा जाळं म्हणून जीवन विमा घेणं आवश्यक आहे. याशिवाय हे एखाद्याला त्यांच्या मुलांसाठी मागे काहीतरी सोडण्याचं समाधानही देते. त्यांना त्यांच्या जीवनात पुढे जाण्यासाठी आवश्यक असलेली आर्थिक सुरक्षा देण्यासही मदत करते.

कर बचतीबद्दल हवी पुरेशी माहिती

तुमच्या आईला कर बचतीबद्दल योग्य आणि पुरेशी माहिती आहे का? आर्थिक सुरक्षा तर मिळतेच. त्याशिवाय जीवन विमा पॉलिसी विकत घेणं जी ईईई (Exempt-Exempt-Exempt - EEE) फायदा करून देणारी, करबचत वाढवण्यास, आर्थिक उद्दिष्टं पूर्ण करण्यास मदत करते. हा एक गुंतवणुकीचा सर्वोत्तम मार्ग ठरतो. लाइफ इन्शुरन्स पॉलिसीधारकांना ईईई (EEE) स्थितीचा फायदा होतो.

कोणत्या बाबी आवश्यक?

लाइफ इन्शुरन्स पॉलिसी निवडताना काही बाबी ध्यानात ठेवायला हव्या. कोणतीही पॉलिसी घेताना ती तुमच्या संपूर्ण कुटुंबाला पुरेशा प्रमाणात कव्हर करते की नाही हे तपासा. योग्य विमा संरक्षण निवडणं गरजेचं आहे. त्यानंतर उत्पन्नाचे स्रोत, अवलंबून सदस्य, कर्ज आणि दायित्वं यासह इतर पॅरामीटर्स तपासावेत. तुम्हाला तिच्यासाठी कोणती आरोग्य विमा पॉलिसी किंवा गंभीर आजार विमा पॉलिसी घ्यायची आहे ते ठरवा. तिला कोणती पॉलिसी सर्वात योग्य आहे हे समजण्यापूर्वी काही आजारांबद्दलची तिची असुरक्षा, विद्यमान कव्हर रक्कम आणि इतर घटक जाणून घ्या. या मुद्द्यांचा विचार करून पॉलिसी घेतली तर भविष्यकाळ आर्थिकदृष्ट्या नक्कीच अनुकूल होईल.