Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Instagram की Twitter : एलॉन मस्क यांनी ग्राहकांना हा प्रश्न का विचारला?    

Elon Musk

Image Source : www.ndtv.com

Instagram or Twitter : Elon Musk यांनी आता ग्राहकांना आता आवाहन केलंय की, त्यांनी ट्विटर आणि इन्स्टाग्राम पैकी योग्य पर्याय विचारपूर्वक निवडावा! असं मस्क का म्हणतात आणि त्यांनी या दोन माध्यमांमध्ये तुलना का केली?

ट्विटर (Twitter Inc) ही सोशल मीडिया साईट (Social Media Site) ताब्यात घेतल्यानंतर एलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटरमध्ये अनेक बदल आणले आहेत. त्यांनी ब्लूट्विटरमध्ये (Twitter Blue) बदल केले आणि ब्लू टिक (Blue Tick) सेवेसाठी पैसे आकारायला सुरुवात केली, महत्त्वाचं म्हणजे अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप (Donald Trump) यांचं ट्विटर अकाऊंट पुन्हा सुरू केलं तर काही पत्रकारांनी एकत्रितपणे बंद केली.    

शेवटचा गमतीचा भाग सोडला तर मस्क ऑक्टोबरमध्ये ट्विटर ताब्यात घेतल्यानंतर ट्विटरवर स्वत: मेहनत घेताना दिसतायत. आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरही ते पहिल्यापेक्षा जास्त सक्रिय असतात. कंपनीच्या काही निर्णयांवर ते ग्राहकांची मतंही घेतात. यावेळी त्यांनी आपल्या ट्विटर ग्राहकांना एक प्रश्न विचारलाय आणि एक सल्लाही दिलाय.    

त्यांचा प्रश्न असा आहे - ‘ट्विटर की इन्स्टाग्राम? तुम्हाला कुठे बरं वाटतं?’ आणि हा प्रश्न विचारतानाच त्यांनी लगेच पुढे सल्लाही दिलाय. ‘इन्स्टाग्राममुळे खिन्नता येते, ट्विटरवर राग येतो? तेव्हा तुमचा पर्याय तुम्ही विचारपूर्वक निवडा.’  

एक प्रकारे मस्क यांनी ट्विटरची तुलना इन्स्टाग्रामशी केलीय. आणि दोघांमध्ये स्पर्धाही लावून दिलीय. वर ट्विटर हे माध्यम इन्स्टाग्रामपेक्षा उपयुक्त असल्याचंही अप्रत्यक्षपणे म्हटलंय. त्यांच्या या ट्विटला आतापर्यंत साडे पाच लाखांहून जास्त लाईक्स मिळालेत. आणि अनेकांनी आपल्या प्रतिक्रियाही दिल्या.    

एका तरुणाने लिहिलंय, ‘ट्विटरचा मला कधीही राग येत नाही. उलट मी दिवसभर हसत असतो. फक्त राजकारणी आणि मीडिया प्रतिनिधी यांना मी अनफॉलो केलंय.’   

तर आणखी एका वाचकाने लिहिलंय, ‘ट्विटरमुळे मला अजिबात राग येत नाही. उलट मला माहिती मिळते. आणि इन्स्टाग्रामवर अशा लोकांचे फोटो बघावे लागतात ज्यांचा माझ्याशी काहीही संबंध नाही.’   

थोडक्यात, मस्क यांच्या या ट्विटमुळे कट्टर ग्राहक नक्कीच जागे झालेत. आणि ट्विटरची चर्चाही सुरू झालीय.