शासन आपल्या शेतकऱ्यांसाठी किंवा गरीब जनतेसाठी गावपातळीवर अनेक योजना राबवत असते. पण गावात राहणाऱ्या नागरिकांना किंवा शेतकऱ्यांना याची माहिती नसते. किंवा जर माहिती मिळालीच तर काही वेळेला योजना संपल्याचे सांगितले जाते. असे होऊ नये म्हणून शासनाने एक संकेतस्थळ सुरु केले आहे. या संकेतस्थळावर गेल्यानंतर आपल्या गावातील ग्रामपंचायतिच्या योजनांचे लाभार्थी कोण आहेत. योजना कोणकोणत्या आहेत. याची माहिती मिळू शकते. आणि त्या योजनांचा शेतकरी किंवा स्थानिक नागरिक लाभ घेऊ शकतात. हि माहिती कशी मिळवायची ते पाहूया.
ऑनलाईन पद्धतीने मनरेगा योजनांची यादी अशी पहा-
1) सर्वात पहिल्यांदा मनरेगाच्या अधिकृत संकेतस्थळावर जा
२) पुढे ग्रामपंचायत वर सिलेक्ट करा. पुढे यादी पाहण्यासाठी जनरेट रिपोर्ट वरती क्लिक करा.
३) पुढे पेज ओपन झाल्यावर राज्य निवडा.
४) कोणत्या वर्षाची योजना आहे ते पहा आणि वरच निवडा
5) जिल्ह्याची यादी दिलेली असेल. त्यातील जिल्हा, तालुका, गाव निवडा.
६) ग्रामपंचायत dashboard दाखवला जाईल. कोणती योजना पाहायची निवडा. किंवा ऑलला सिलेक्ट करून सर्व योजना पाहू शकता.
5) पुढे वर्ष २०२१-२२ निवडा, पुढे त्या गावासाठी असलेल्या योजनांची यादी ओपन होईल. कामाचा प्रकार काम कशाप्रकारे चालूय त्याची सध्याची स्थिति वर्ष आणि कुठल्या विभागाच्या अंतर्गत हे काम दिले, याची माहिती याठिकाणी असेल. गाय गोठा असेल , सिंचन विहिरी असतील, फलबाग लागवड असेल अशा सर्व योजनांची लिस्ट मिळेल.
आपल्याला हवी असलेली माहिती मिळाली कि तुम्ही संबंधित सरकारी विभागातून योजनेचा लाभ घेऊ शकता.
image source - https://shetkariyojana.com/gp-yojana-labharthi-yadi/