Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

सर्वात मोठा उत्पादक असलेल्या भारताला साखर आयात करावी लागणार? काय आहे कारण? जाणून घ्या

Sugar Export Ban

Image Source : https://www.freepik.com/

केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी साखरेच्या निर्यातीवरील बंदी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला होता. सरकारने हा निर्णय का घेतला होता व याचे काय परिणाम होणार? याबाबत जाणून घ्या.

केंद्र सरकारने ऑक्टोबरमध्ये साखरेच्या निर्यातीवरील बंदी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला होता. याशिवाय, ऊसाच्या रसापासून केल्या जाणाऱ्या इथेनॉलच्या निर्मितीवर देखील सरकारने बंदी घातली होती. मात्र, काही दिवसातच हा निर्णय मागे घेतला. उत्पादनात घट झाल्याने भारतावर वर्ष 2025 अखेर साखर आयात करावी लागण्याची शक्यता आहे. 

सरकारने साखरेच्या निर्यातीवर का बंदी घातली आहे ? याचा इतर देशांवर काय परिणाम होऊ शकतो ? भारताला खरचं साखर आयात करावी लागणार का ? या प्रश्नांची उत्तरे या लेखातून जाणून घेऊयात.

भारताने सारखेच्या निर्यातीवर बंदी का घातली?

याआधी सरकारने मे 2022 मध्ये देखील साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली होती. आता हीच बंदी पुढे कायम ठेवण्यात आली आहे. मागील 6 वर्षात पहिल्यांदाच हा निर्णय घेण्यात आला आहे. निर्यातीवरील बंदी मागचे प्रमुख कारण हे साखरेच्या उत्पादनात झालेली घट हे आहे.

भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये सणांच्या काळात साखरेची प्रचंड मागणी असते. त्यामुळे देशात साखरेचा पुरेसा साठा उपलब्ध असावा व किंमत नियंत्रणात राहावी, यासाठी निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे. 

दुष्काळ व काही भागात सरासरीपेक्षा कमी पावसामुळे ऊसाच्या उत्पादनात प्रचंड घट झाली आहे. याशिवाय, शेतकरी ऊससोडून इतर पिकांचे उत्पादन घेत आहे. देशात साखरेचा पुरेसा साठा उपलब्ध असावा, यासाठी इथेनॉल निर्मितीवर देखील बंदी घालण्यात आली होती. 

वर्ष 2022-23 मध्ये भारतात साखरेच्या 32.8 कोटी टन उत्पादन झाले होते. तर इथेनॉल निर्मितासाठी 4.2 कोटी टन साखरेचा वापर करण्यात आला. या वर्षात 6.1 कोटी टन साखरेची निर्यात करण्यात आली होती. तसेच, 2023-24 वर्षात साखरेचे 31.7 लाख टन उत्पादन होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच, आधीचा साठा 5.5 कोटी टन एवढा आहे.

भारताच्या निर्णयाचा इतर देशांवर परिणाम

भारत जगातील सर्वात सर्वात मोठा साखर उत्पादक देश आहे. तर साखर निर्यातीच्याबाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे भारताने घातलेल्या साखर निर्यातीचा परिणाम इतर देशांवर देखील पाहायला मिळत आहे. 

भारताने साखर निर्यातीवर बंदी घातली असली तरीही यूरोपियन यूनियन व अमेरिकेसाठी हा निर्णय लागू नाही. सीएक्स आणि टेरिफ रेट कोटांतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे. भारताच्या निर्णयाचा सर्वाधिक फटका हा अरब देशांना बसणार आहे. या देशांकडून मोठ्या प्रमाणात भारतातील साखर आयात केली जाते. सरकारच्या निर्णयामुळे या देशात साखरेचे भाव प्रचंड वाढले आहेत.

इथेनॉल निर्मितीच्या बंदीवर यु-टर्न

केंद्र सरकारने साखरेच्या उत्पादनातील घट लक्षात घेऊन ऊसाच्या रसापासून इथेनॉल निर्मितीवर देखील बंदी घातली होती. साखर नियंत्रण कायदा 1966 अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, सरकारने हा निर्णय मागे घेत जवळपास 17 लाख टन ऊसाचा वापर इथेनॉल निर्मितासाठी करण्यास परवानगी दिली आहे.

भारताला साखर आयात करावी लागणार?

महाराष्ट्र, कर्नाटक व उत्तर प्रदेश ही साखर उत्पादन करणारी सर्वात मोठी राज्य आहेत. भारतात जवळपास 5 कोटी शेतकरी ऊसाची लागवड करतात. मात्र, सरासरी कमी पावसामुळे या भागातील साखरेचे उत्पादन घटले आहे. याशिवाय, ग्राहकांची संख्या देखील मोठी आहे. उत्पादनात घट झाल्याने देशांतर्गत साठा कमी पडण्याची देखील शक्यता आहे. रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, साखर उत्पादनात सातत्याने घट होत असल्याने भारताला वर्ष 2025 अखेर साखर आयात करावी लागण्याची शक्यता आहे.