जगभरात आर्थिक मंदीची लाट आलेली असतानाही भारतातील अर्थव्यवस्था मात्र उत्तम कामगिरी करत आहे. देशांतगर्त वाढलेले उत्पादन आणि त्यानिमित्ताए वाढलेला रोजगार या सगळ्यांच्या एकत्रित परिणाम म्हणून भारताच्या दरडोई उत्पन्नात झपाट्याने वाढ होण्याची अपेक्षा आहे.
येत्या 7 वर्षात भारताचे दरडोई उत्पन्न 70 टक्क्यांनी वाढून 2450 ते 4000 डॉलरपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. स्टँडर्ड चार्टर्ड बँकेच्या (Standard Chartered Bank) एका संशोधन अहवालात हा दावा करण्यात आला आहे. देशातील एकूण आर्थिक परिस्थिती बघता देशाचे दरडोई उत्पन्न भरमसाठ वाढू शकते असे या अहवालात म्हटले आहे. असे झाल्यास भारताची अर्थव्यवस्था जागतिक स्तरावर महत्वाची भूमिका निभावू शकते.
2011 मध्ये भारताचे दरडोई उत्पन्न 460 डॉलर्सवरून 1,413 डॉलर्स पर्यंत वाढले आहे. यामुळे देशाची आर्थिक परिस्थिती सुधारली असून, नागरिकांची खरेदी क्षमता देखील वाढली आहे. एवढेच नाही तर भारतीय उत्पादनांची निर्यात देखील वाढली असून, त्यातून भारतीय उद्योगक्षेत्राला चांगला नफा मिळतो आहे. याचा परिणाम म्हणून येत्या 7 वर्षात, म्हणजेच 2030 पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था 2.1 ट्रिलियनपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.
‘ही’ राज्ये असतील आघाडीवर
येत्या सात वर्षात आणि या दशकाच्या अखेरीस भारताची अर्थव्यवस्था उत्तम स्थितीत राहणार असून या काळात काळात देशांतर्गत वापर झपाट्याने वाढेल, असे या अहवालात म्हटले आहे. 2030 पर्यंत तेलंगणा, दिल्ली, कर्नाटक, हरियाणा, गुजरात, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशचा देशाच्या एकूण जीडीपीपैकी 20 टक्के हिस्सा असेल, असे या अहवालात म्हटले गेले आहे. या राज्यांचे दरडोई उत्पन्न 6000 डॉलर्स पर्यंत असेल असा अंदाज वर्तवला गेला आहे.
सोबतच उत्तर प्रदेश, बिहार यांसारखी दाट लोकसंख्या असलेल्या राज्यांमध्ये आर्थिक सुधारणा धीम्या गतीने होईल असे यात म्हटले गेले आहे. या राज्यांमधील दरडोई उत्पन्न 6000 डॉलर्स पर्यंत असेल असा अंदाज वर्तवला गेला आहे.
गुजरात पहिल्या क्रमाकांवर असेल…
सर्वाधिक दरडोई उत्पन्न असलेले राज्य म्हणून आजघडीला तेलंगणा राज्य आघाडीवर आहे. तेलंगणाचे दरडोई उत्पन्न सध्या 3360 डॉलर्स इतके आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर कर्नाटक आणि तिसऱ्या क्रमांकावर आंध्र प्रदेश राज्य आहे. सध्या दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत आघाडीवर असलेली पहिली तीन राज्ये ही दक्षिण भारतातील आहेत. परंतु येत्या काळात यात बदल होऊ शकतो आणि एकंदरीत परिस्थिती बघता 2030 पर्यंत गुजरात दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत गुजरात राज्य आघाडीवर असू शकते असे या अहवालात म्हटले आहे. गुजरात खालोखाल महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक, हरियाणा, तेलंगणा, आंध्र प्रदेशचा क्रमांक राहील असा अंदाज या अहवालात वर्तवला गेला आहे.