Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Indian Economy: आशियाई देशांच्या तुलनेत भारताची अर्थव्यवस्था आणि पत चांगली

Indian Economy

2023 वर्षामध्ये भारताची आर्थिक स्थिती आणि पत क्षमता इतर आशियाई देशांपेक्षा चांगली असेल, असे अमेरिकन इनव्हेस्टर सर्व्हिसेस कंपनी मू़डीजने म्हटले आहे. कर्जाचे व्यवहार करण्याची क्षमता, अर्थव्यस्थेतील स्थिरता तुलनात्मक दृष्या इतर देशांपेक्षा चांगली असेल, असे कंपनीने म्हटले आहे.

रशिया युक्रेन युद्ध, जागतिक मंदी, महागाईचा आगडोंब यामध्ये संपूर्ण जग होरपळून निघत आहे. कोरोना महामारीतून जग सावरत असतानाच पुन्हा कोरोनाचा जगभर प्रसार होतोय की काय? अशी भीती वाटत आहे. जगभरात अस्थिरतेचे वातावरण असताना भारतासाठी जागतिक स्तरावरून एक सकारात्मक बातमी आहे. एशिया-पॅसिफिक क्षेत्रातील इतर देशांपेक्षा भारताची अर्थव्यवस्था स्थिर असून पतही (credit worthiness) चांगली आहे, असे प्रसिद्ध अमेरिकन इनव्हेस्टर सर्व्हिसेस कंपनी मू़डीजने म्हटले आहे.    

2023 वर्षामध्ये भारताची आर्थिक स्थिती आणि पत क्षमता इतर आशियाई देशांपेक्षा सकारात्मक असेल. इतर देशांची आर्थिक स्थिती चांगली नसल्याचेही मूडीजने नमूद केले आहे. कर्ज व्यवहार करण्याची क्षमता, अर्थव्यवस्थेतील स्थिरता तुलनात्मक दृष्या इतर देशांपेक्षा चांगली आहे, असे कंपनीने म्हटले आहे.

जागतिक अर्थव्यवस्थेची घडी ढासळत आहे. तसेच महागाई वाढत असताना इतर देशांच्या तुलनेत भारताचा विकास चांगला होईल, राष्ट्रीय उत्पन्नही स्थिर राहील, असे म्हटले आहे. कोरोना साथीनंतर भारतीय अर्थव्यवस्था सुधारत आहे. मात्र, साथपूर्व काळ आणि आताच्या उत्पन्नात तफावत राहील. भारत आणि बांगलादेशमध्ये येत्या काही काळात सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत, त्यामुळे सरकारी पातळीवरून अनुदानातील खर्च जास्त राहण्याची शक्यता मूडीजने वर्तवली आहे.

एशिया पॅसिफिक प्रदेशातील बहुतेक सरकारांसाठी वित्तीय तूट त्यांच्या कर्जाच्या समतुल्य किंवा जवळपास असण्याची शक्यता आहे. भारत आणि मलेशियासारख्या देशांमध्ये कर्जाचा बोजा वाढतच जाईल किंवा उच्च पातळीवर स्थिर होईल, असे मूडीजने म्हटले आहे. चीनची अर्थव्यवस्था दीर्घकाळ कमजोर राहिली तर आणखी स्थिती बिघडू शकते. यामुळे काही देशांना कर्ज मिळणे अवघड होऊन बसेल तसेच चलनाचे मूल्यही ढासळू शकते. यामध्ये स्थानिक आणि जागतिक घडामोडींचाही परिणाम होऊ शकतो.