Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Gold Buying Rules: परदेशामधून सोने खरेदी करण्यास सरकारने केलेत 'हे' नियम लागू

Gold Buying Rules

Image Source : /www.moneycontrol.com

Gold Buying From Foreign Countries: भारतात सोन्याचा संबंध संस्कृती आणि धार्मिकतेशी जोडल्या गेला आहे. त्यामुळे सोने खरेदी करण्याला प्रचंड महत्व दिल्या जाते. भारतातील अनेक नागरिक परदेशातूनही सोन्याची खरेदी करतात. मात्र आता सरकारने काही दागिने आणि सोन्याच्या वस्तूंच्या आयातीवर बंदी घातली आहे. सोन्याची उत्पादने मिळवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांकडून योग्य परवाना आवश्यक असणार आहे.

Government Issued New Rules: भारतात सोने खरेदी करणे हे गुंतवणुकीसाठी शुभ आणि सुरक्षित मानले जाते. परंतु आता सोने खरेदीबाबत सरकारने नियम बदलले आहेत. केंद्र सरकारने सोन्याच्या आयात धोरणात बदल केले आहेत. सरकारने काही दागिने आणि सोन्याच्या वस्तूंच्या आयातीवर बंदी घातली आहे. केंद्र सरकारने अधिसूचनेद्वारे त्याची माहिती दिली आहे. DGFT (Directorate General of Foreign Trade) ने दागिने आणि सोन्याची उत्पादने मुक्त व्यापारापासून प्रतिबंधित व्यापारात ठेवली आहेत. याचा अर्थ असा की, ही सोन्याची उत्पादने मिळवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांकडून योग्य परवाना आवश्यक असणार आहे.

DGFT अधिसूचना काय आहे?

परकीय व्यापार महासंचालनालय (DGFT) अधिसूचनेत असे नमूद करण्यात आले की, भारत-UAE व्यापक आर्थिक भागीदारी करार (CEPA) अंतर्गत शुल्क दर कोट्याशिवाय अनस्टडड सोन्याची आयात यापुढे प्रतिबंधित राहणार नाही. भारत आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) यांच्यात मुक्त व्यापार करार आहे, ज्यामुळे तिथल्या स्लीपिंग आयातीवर कोणतेही बंधन नाही.

सोन्याचे दर

सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. 12 जुलै रोजी अनेक शहरांमध्ये भारतातील सोन्याचा किरकोळ भाव 60,000 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहे. 24K च्या 10 ग्रॅम सोन्याचा भाव दिल्लीत 60,150 रुपये आहे. 22 कॅरेट सोन्याची किंमत 55,150 रुपये आहे. तर चांदीचा भाव 73,600 रुपये प्रतिकिलो राहिला. अहमदाबाद, गुजरातमध्ये 22 के सोन्याची किरकोळ किंमत 55,050 रुपये आणि 24 के सोन्याची किंमत 60,050 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

सुरक्षित गुंतवणुकीचा प्रकार

सोने हे सुरक्षित गुंतवणुकीचे सर्वोत्तम माध्यम मानले जाते. जगात कोणत्याही प्रकारचे संकट आले की सोन्याची मागणी वाढते, त्यामुळे त्याचे भाव वाढतात. सामान्य स्थितीत सोन्याचे भाव अचानक वाढत नसते.