Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

EV Car India: इलेक्ट्रिक कार खरेदीसाठी जास्त पैसे मोजायला भारतीय तयार

EV Car India

इलेक्ट्रिक वाहन निर्मिती क्षेत्र भारतामध्ये अद्याप बाल्यावस्थेत आहे. मात्र, अनेक आघाडीच्या कारनिर्मिती कंपन्या EV क्षेत्रात उतरल्या आहेत. प्रिमियम इव्ही गाड्या खरेदी करण्यास भारतीय नागरिक तयार असल्याचे डेलॉइट ग्लोबल ऑटो कम्झ्युमर सर्व्हे (GACS) 2023 मधून ही बाब समोर आली आहे.

इलेक्ट्रिक कार निर्मिती कंपन्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय ग्राहक EV कार घेण्यासाठी जास्त पैसे खर्च करण्यास तयार असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. येत्या काळात भारतात इव्ही कारसाठी अच्छे दिन येणार असल्याचे संकेत यातून मिळत आहेत. पारंपरिक भारतीय ग्राहक गाडीची किंमत आणि मायलेजला महत्त्व देत आला आहे. या दोन गोष्टी प्राधान्याने कार खरेदी करताना विचारात घेतल्या जात होत्या. मात्र, ग्राहकांची ही मानसिकता बदल असून जास्त पैसे खर्च करून (EV price India) आपली आवडती इव्ही कार घरी आणण्यास नागरिक तयार आहेत.

इलेक्ट्रिक वाहन निर्मिती क्षेत्र भारतामध्ये अद्याप बाल्यावस्थेत आहे. मात्र, अनेक आघाडीच्या कारनिर्मिती कंपन्या EV क्षेत्रात उतरल्या आहेत. प्रिमियम इव्ही गाड्या खरेदी करण्यास भारतीय नागरिक तयार असल्याचे डेलॉइट ग्लोबल ऑटो कम्झ्युमर सर्व्हे (GACS) 2023 मधून ही बाब समोर आली आहे. किया मोटर्स, टाटा, एमजी कार्स, बीवायडी चिनी कंपनी आणि इतरही अनेक देशी आणि परदेशी कंपन्या भारतीय बाजारावर लक्ष ठेवून आहेत. नवनवीन इव्ही मॉडेल भारतीय बाजारात लाँच करण्यात येत आहेत.

प्रिमियम इव्ही कार विक्री (Premium EV care sale India)

25 ते 50 लाख किंमतीमधील EV कार खरेदीचे प्रमाण भारतामध्ये दिवसेंदिवस वाढत आहे. 2023 वर्ष नुकतेच सुरू झाले असून या वर्षी एकूण  EV गाड्यांपैकी प्रिमियम गाड्यांची विक्री 16% होईल असा अंदाज आहे. 2022 मध्ये हे प्रमाण 15% होते. तर 2021 मध्ये 9 टक्के होते. तर 2020 मध्ये हे प्रमाण फक्त 6 टक्क होते.

15 ते 25 लाखांमधील कारला सर्वाधिक पसंती (Indian buyer preference for EV car)

भारतामध्ये EV गाड्या लाँच झाल्या तेव्हा प्रिमियम श्रेणीतील गाड्यांची किंमत 25 लाखांपर्यंत होती. मात्र, आता 15 ते 25 लाख रुपयांमध्ये अनेक प्रिमियम गाड्या आल्या आहेत. या रेंजमधील गाड्यांना ग्राहकांकडून सर्वाधिक पसंती दिली जात आहे. Kia’s EV6 ही गाडी भारतामध्ये मागील वर्षी जून महिन्यात लाँच झाली. मात्र, काही दिवसांतच 100 गाड्या विकल्या गेल्या. या गाडीची किंमत 60 लाखांच्या घरात होती. त्यानंतर कंपनीने आणखी 500 गाड्या विकल्या. त्यामुळे कंपनीने आणखी इव्ही गाड्या भारतीयत बाजारात लाँच करण्याचे नियोजन आखले आहे.

BYD ही बलाढ्य चिनी इलेक्ट्रिक कारनिर्मिती कंपनी आहे. या चिनी कंपनीने भारतामध्ये कार विक्रीचे आक्रमक धोरण आखले आहे. 2030 पर्यंत प्रत्येक 3 विक्री झालेल्या गाड्यांमधील एक गाडी BYD कंपनीची असेल, अशी निर्धार कंपनीने व्यक्त केला आहे. सध्या कंपनी भारतामध्ये E6 ही इव्ही कार विक्री करते. तर येत्या काही दिवसांमध्ये Atto 3 ही कार भारतात लाँच करणार आहे.