Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Visa: व्हिसा शिवाय तुम्ही जगातील या 6 देशांमध्ये फिरण्याचा आनंद घेऊ शकता

World Tour Without Visa

World Tour Without Visa: जर तुम्ही तुमच्या कुटुंबियांसोबत परदेशात फिरायला जायचा विचार करीत आहात, तर आम्ही आज तुम्हाला अशा काही देशांची नावे सांगणार आहोत. महत्त्वाचे म्हणजे या देशात फिरायला जाण्यासाठी व्हिसाची आवश्यक्ता नाही. केवळ भारतीय पासपोर्टच्या आधारावर तुम्ही तिथे फिरायला जाऊ शकता.

Six Countries Allow Indians Without Visa: हनिमून असो की उन्हाळ्याची सुट्टी, परदेशात फिरायला कोणाला जायचे नाही?, पण पैसा आणि नियोजनामुळे आपण नेहमीच मागे पडतो. आणखी एक अडचण आहे, ती म्हणजे व्हिसा, ज्यामुळे काही वेळा परदेशात जाण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही. व्हिसा ही एक अशी गोष्ट आहे, जे मिळण्यासाठी तुम्हाला पूर्ण महिना किंवा वर्षभरही लागेल. परंतु जगभरात असे अनेक देश आहेत, जिथे व्हिसा आवश्यक नाही. जर तुम्ही परदेशात जाण्याचा विचार करत असाल तर तुम्ही व्हिसाशिवाय त्या देशांमध्ये एन्जॉय करु शकता. तुम्हाला फक्त भारतीय पासपोर्टची आवश्यक्ता येथे आहे.

भारतीयांना या देशात व्हिसाची गरज नाही

जगभरात भारतीयांसाठी असे काही देश आहेत, जिथे जायला तुम्हाला व्हिसा घेण्याचीही गरज भासत नाही. या देशांमध्ये, तुम्ही फक्त तुमच्या पासपोर्टने एक महिना ते तीन महिने आरामात फिरू शकता. यामध्ये भूतान, फिजी, बार्बाडोस, त्रिनिदाद आणि टोबॅगो, नेपाळ आणि मॉरिशस या देशांचा समावेश आहे.

फिजी (Fiji)

फिजी येथे भारतीयांची संख्या खूप जास्त आहे आणि यामुळेच मोठ्या संख्येने भारतीय भेट देण्यासाठी फिजीला पोहोचतात. व्हिसाशिवाय भेट देण्यासाठी फिजी हे सर्वोत्तम ठिकाण आहे. हनिमूनकरीता कपल्सला आता फिजी देखील आवडू लागला आहे.  एका व्यक्तीच्या टूरिस्ट व्हिसा करीता फिजी येथे लागणारा खर्च 180 Fiji डॉलर आहे. त्यामुळे या देशात फिरायला जातांना तुमच्यासह तुमच्या कुटुंबियांचे पैसे बचत होईल.

त्रिनिदाद आणि टोबॅगो (Trinidad and Tobago)

उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये, तुम्ही सुंदर तसेच शांततेची ठिकाणे शोधत असतील. तर मग उशीर कसला, त्रिनिदाद हे ठिकाण हुबेहुब गोव्यासारखे दिसते आणि तुम्हाला भेट देण्यासाठी जास्त खर्च करावा लागणार नाही. त्रिनिदाद आणि टोबॅगो हे दोन्ही भारतीयांसाठी व्हिसा मुक्त देश आहे.

नेपाळ आणि मॉरिशस (Nepal and Mauritius)

नेपाळ मध्ये तुम्ही ठरवून दिलेल्या मर्यादेत भारतीय रुपयाने देखील खरेदी करु शकता. नेपाळला एकदा तरी भेट देणे हे अनेक भारतीयांचं स्वप्न असते. या देशात जायला भारतीयांना व्हिसाची गरज भासत नाही. नेपाळ येथील टूरिस्ट व्हिसा फि 12080 NRS एवढी आहे.

व्हिसाशिवाय प्रवास करू शकणार्‍या देशांमध्ये मॉरिशसचे नावही समाविष्ट आहे. मॉरिशस हे जोडप्यांचे सर्वात आवडते ठिकाण आहे, येथे तुम्ही बीच आणि जंगलांमध्ये फिरायला जाऊ शकता. या देशात फिरायला जाण्यासाठी भारतीयांना व्हिसा लागत नाही. व्हिसाशिवाय किमान 60 दिवस भारतीय येथे फिरु शकतात.

बार्बाडोस (Barbados)

अतिशय सुंदर कॅरिबियन देश बार्बाडोस उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी सर्वोत्तम आहे. तुम्ही तुमच्या पत्नीसोबत इथे फिरायला जाऊ शकता किंवा मुलांसोबत उन्हाळ्याच्या सुट्ट्या घालवण्यासाठी हे ठिकाण योग्य आहे. समुद्रकिनारे असलेली ठिकाणे फिरायला अनेकांना सर्वाधिक आवडते, त्यामुळे भारतीयांनी येथे एकदा अवश्य भेट द्यावी. बार्बाडोस हा देश सुध्दा भारतीयांसाठी व्हिसा मुक्त आहे. अन्यथा या देशात एका व्यक्तिच्या व्हिसा करीता 107 युएस डॉलर लागतात आणि त्याची वैधता केवळ तीन महिन्यांची असते.

भूतान (Bhutan)

भूतान हा एक अतिशय सुंदर देश आहे, जो त्याच्या सुंदर टेकड्या आणि मैदानांसाठी प्रसिद्ध आहे. आपण भारतीयच नाही तर परदेशी लोकही इथे येण्याचे स्वप्न पाहतात. भूतान हे नैसर्गिक सौंदर्य आणि प्रेक्षणीय ठिकाणांसाठी खूप प्रसिद्ध आहे. भारतीयांना काही अटींवर व्हिसाशिवाय येथे प्रवास करण्याची परवानगी आहे. एवढेच नाही तर शेजारी असल्याने भारतीय काही प्रमाणात येथे भारतीय रुपया वापरुन देखील खरेदी करु शकतात. त्यामुळे भारतीय नागरिकांचा या देशात फिरायचा भरपूर खर्च वाचतो.