Facilities From IRCTC: रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून प्रवाशांना विशेष परिस्थितीत विशेष सुविधा दिल्या जातात. तर काही सुविधा मोफत देखील दिल्या जातात. अशीच काही माहीती देताना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वेत प्रवाशांना मोफत जेवण दिले जाणार असल्याचे सांगितले आहे. परंतु, ही सुविधा काही नियम आणि अटीं अंतर्गत लागू होणार आहे. जाणून घेऊया कोणत्या प्रवाशांना ही सुविधा मिळणार आहे ते.
Table of contents [Show]
IRCTC चे नियम काय सांगतात
IRCTC च्या नियमानुसार प्रवाशांना मोफत जेवणाची सुविधा दिली जाते. होय, जेव्हा तुमची ट्रेन गंतव्यस्थानी पोहोचण्यासाठी 2 तास किंवा त्याहून अधिक उशीर होणार असते, तेव्हा ही सुविधा प्रवाशांना दिली जाते. परंतु, या सुविधेचा लाभ फक्त एक्स्प्रेस ट्रेनमधील प्रवासीच घेऊ शकतात. शताब्दी, राजधानी आणि दुरांतो एक्स्प्रेस या गाड्यांमधून प्रवास करणारे प्रवासीच या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. तेव्हा तुम्हालाही या एक्सप्रेस मध्ये असतांना प्रवासात उशीर झाला, तर या सुविधेचा लाभ घेण्याचा प्रयत्न करु शकता.
ट्रेन चुकल्यास रिफंड
कोणत्याही कारणाने तुमची ट्रेन चुकली तरीही तुम्हाला नियमानुसार रिफंडही मिळू शकतो. यासाठी, तुम्हाला TDR फॉर्म भरावा लागेल आणि ट्रेन स्टेशनवरून सुटल्यानंतर एक तासाच्या आत तिकीट काउंटरवर सबमिट करावा लागेल. रेल्वेच्या नियमानुसार ऑनलाइन तिकीट बुक करणाऱ्या प्रवाशांनाही ही सुविधा मिळते
अल्प पैशांमध्ये विमा सुविधा
भारतीय रेल्वेकडून ऑनलाइन तिकिट खरेदी करताना ठराविक अत्यंत कमी शुल्क भरल्यास तुम्हाला प्रवासात इन्श्युरन्सची सुविधा (Indian Railways Rules) मिळते. याअंतर्गत रेल्वे अपघातात मृत्यु किंवा अपंगत्व आल्यास 10 लाख रुपये भरपाई त्या प्रवाशास दिली जाते. तसेच, अंशता अपंगत्व आल्यास 7.5 लाख रूपये मिळतात. तर उपचारासाठी 2 लाख मिळतात. यासाठी केवळ 75 पैसे इन्श्युरन्सचे भरावे लागतात.
वेटिंग रूमची सुविधा
ट्रेन उशीरा येणार असेल तर, तुम्हाला वेटिंग रूमध्ये तिकिटाच्या क्लासच्या आधारावर आराम करता येतो. ज्या क्लासचे तुमचे तिकिट असेल, त्या क्लासच्या या वेटिंग रुम सुविधा असतात.
क्लॉक रूमची सुविधा
रेल्वेकडून प्रवाशांना क्लॉक रूमची सुविधा दिली जाते. तुमच्याकडील ट्रेनच्या व्हॅलिड तिकिटावर तुम्ही स्टेशनवरील क्लॉक रूमचा वापर करू शकता. सामान जमा करून ट्रेन येईपर्यंत कुठेही जाऊन येऊ शकता.
इतरही सुविधा
ट्रेन प्रवासात तब्येत बिघडल्यास तुम्ही टीटीईकडून फर्स्ट ऐड बॉक्स मागू शकता आणि उपचार करु शकता. काही रेल्वे स्टेशनवर मोफत वायफाय सुविधा सुद्धा दिल्या जाते. तसेच विद्यार्थी आणि मुलाखतीला जाणाऱ्या बेरोजगार तरुणांना स्लीपर क्लासच्या तिकिटांमध्ये 50 टक्के आणि द्वितीय श्रेणीच्या तिकिटांमध्ये 100 टक्के सवलत दिल्या जाते.