आपल्या प्रत्येकाची वेगवेगळी स्वप्न असतात. मात्र या वेगवेगळ्या स्वप्नांपैकी एक स्वप्न कॉमन असते, ते म्हणजे परदेशात फिरायला जाण्याचे. मात्र परदेशात फिरायला जाणे वाटते तितके सोपे नाही. त्यासाठी लागतो तो मुबलक पैसा आणि त्या देशाचा व्हिसा. आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या डोक्यात हा विचार असतो की, परदेशात फिरायला जाताना मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च करावा लागतो. या मागचे कारण म्हणजे भारत आणि विदेशातील देशांच्या चलनातील फरक. काही देशांचे चलन हे भारतीय रुपयांपेक्षा जास्त आहे. तर काही देशांचे चलन भारतीय रुपयांपेक्षा कमी आहे.
आज आपण अशाच देशांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या देशांमध्ये भारतीय चलनाला सर्वाधिक किंमत आहे. या देशात जाऊन तुम्ही फिरण्याचा आणि भरपूर शॉपिंग करण्याचा आनंद लुटू शकता. यामुळे तुमचा आर्थिक खर्चही वाढणार नाही आणि बजेटमध्ये परदेश दौरा देखील करता येईल. कोणत्या देशांमध्ये भारतीय रुपयांचे मूल्य सर्वाधिक आहे जाणून घेऊयात.
Table of contents [Show]
भारताच्या शेजारील देश म्हणून श्रीलंकेला (Sri Lanka) ओळखले जाते. याच देशात अनेक प्रसिद्ध पर्यटन ठिकाणे आहेत. ज्यामुळे येथे पर्यटनाला प्रचंड महत्त्व आहे. या देशात एका भारतीय रुपयाचे मूल्य 3.80 श्रीलंकन रुपया इतके आहे. त्यामुळे या देशात फिरायला जाऊन तुम्ही आरामात शॉपिंग करू शकता आणि वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देऊ शकता. भारतीय पौराणिक कथांमध्ये देखील श्रीलंकेचा आणि भारताचा फार जवळचा संबंध असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे या देशात ऐतिहासिक पर्यटनाला देखील प्रचंड स्कोप आहे.
जपान (Japan)
जगातील सर्वात विकसित देशांपैकी एक देश म्हणजे जपान. जपान अनेक बाबतीत भारताच्याही पुढे आहे. तंत्रज्ञान क्षेत्रात जपानने प्रचंड मोठी प्रगती केली आहे. मात्र जपानचे चलन मूल्य भारतीय रुपयापेक्षा कमी आहे. भारतीय रुपयाप्रमाणे जपानी चलन हे येन या प्रकारात मोडते. एक भारतीय रुपया हा 1.69 जपानी येन एकसमान आहे. त्यामुळे या देशात तुम्ही फिरण्यासाठी जाऊ शकता.
इंडोनेशिया (Indonesia)
दक्षिण पूर्व देशांपैकी एक देश म्हणजे इंडोनेशिया. या देशांमध्येही लोक पर्यटनासाठी किंवा फिरण्यासाठी जातात. या देशाचे चलन मूल्य भारतीय रुपयापेक्षा कमी आहे. भारताचा एक रुपया हा 183.26 इंडोनेशियन रुपयाच्या एकसमान आहे. या देशात फिरायला जाऊन तुम्ही वेगवेगळी ठिकाणे पाहू शकता आणि बजेट फ्रेंडली परदेश दौरा करू शकता.
व्हिएतनाम (Vietnam)
आपण इंटरनेटवर अनेकदा व्हिएतनामचे भव्य समुद्रकिनारे पाहिले असतील. वर्षाला कित्येक लोक व्हिएतनामला केवळ सुंदर समुद्रकिनारे पाहण्यासाठी जातात. जर तुम्हालाही व्हिएतनामला फिरायला जायचे असेल, तर तुम्ही स्वस्तात फिरून येऊ शकता. व्हिएतनामचे चलन हे भारतीय रुपयापेक्षा कमी आहे. एक भारतीय रुपया हा 287.67 व्हिएतनामी डोंग च्या एकसमान आहे. या ठिकाणी अनेक वस्तू स्वस्तात खरेदी करता येतात. त्यामुळे बहुसंख्य लोक परदेश दौऱ्यासाठी किंवा परदेश सहलींसाठी व्हिएतनामची निवड करतात. या देशाला सर्वात मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे.
कंबोडिया (Cambodia)
तुम्हालाही कमी बजेटमध्ये परदेश सहलीचे नियोजन करायचे असेल, तर कंबोडिया देश हा एक उत्तम पर्याय आहे. या देशात अनेक हिंदू मंदिरे आपल्याला पाहायला मिळतात. या मंदिरांना पाहण्यासाठी कित्येक लोक वर्षाला कंबोडियाला भेट देतात. या ठिकाणी अनेक पर्यटन स्थळे देखील पाहायला मिळतात. या देशाचे चलन मूल्य भारतीय रुपयापेक्षा फारच कमी आहे. एक भारतीय रुपया हा 50.11 कंबोडियन रिएलच्या बरोबरीचा आहे. बुद्धिस्ट प्रकारातील मंदिरे येथे पाहायला मिळतील.
source : hindi.news18.com