केंद्र सरकारची वित्तीय तूट 9.78 लाख कोटींवर पोचली आहे. या संपूर्ण चालू वित्त वर्षांसाठी सरकारने निर्धारित केलेल्या अंदाजाच्या तुलनेत हे प्रमाण 58.9 टक्के इतके आहे.
महसुली उत्पन्न आणि खर्च यातील हा फरक आहे. देशाची वित्तीय तूट एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यांच्या कालावधीत 9.78 लाख कोटी रुपयांवर पोहोचलेली आहे. संपूर्ण चालू वित्त वर्षांसाठी सरकारने निर्धारित केलेल्या अंदाजाच्या तुलनेत हे प्रमाण 58.9 टक्के इतके असल्याचे दिसून येत आहे.
वर्षभरापूर्वी याच कालावधीत ही तूट किती होती ते बघणे आवश्यक आहे. या कालावधीत आर्थिक वर्षांच्या पहिल्या आठ महिन्यांमध्ये वित्तीय तुटीचे प्रमाण तत्कालीन अंदाजाच्या तुलनेत 46.2 टक्के इतके राहिले होते. एप्रिल ते नोव्हेंबर 2022 या पहिल्या आठ महिन्यांत सरकारला मिळालेले महसुली उत्पन्न वार्षिक तुलनेत 14.64 लाख कोटी रुपये असे अर्थसंकल्पातील अंदाजाच्या प्रमाणात 64.1 टक्के इतके राहिले आहे. गेल्या वर्षी या कालावधीत संकलित महसुलाने अर्थसंकल्पीय अंदाजाच्या 69.8 टक्के असे उद्दिष्ट पूर्ण केले होते. तर नोव्हेंबपर्यंत आठ महिन्यांत सरकारचा खर्च 24.42 लाख कोटी रुपये इतका झाला आहे. हा संपूर्ण आर्थिक वर्षांसाठी अंदाजाच्या तुलनेत 61.9 टक्के इतका आहे. गेल्या वर्षी याच काळातील खर्च यापेक्षा कमी म्हणजे एकूण अंदाजाच्या 59.6 टक्के इतका राहिला होता.
निव्वळ कराच्या माध्यमातून 12.25 लाख कोटींचा महसूल
निव्वळ कराच्या माध्यमातून केंद्र सरकारला 12.25 लाख कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. नोव्हेंबरअखेपर्यंतची ही आकडेवारी आहे.
हे अर्थसंकल्पात स्पष्ट केलेल्या लक्ष्याच्या तुलनेत 63.3 टक्क्यांवर पोहोचले आहे. गेल्या वर्षी या काळात कर महसुलाने 73.5 टक्क्यांचे उद्दिष्ट पूर्ण केले होते. तर एप्रिल ते नोव्हेंबर या काळात केंद्र सरकारचा भांडवली खर्च 4.47 लाख कोटी रुपये झाला आहे. जो संपूर्ण वर्षांच्या उद्दिष्टाच्या तुलनेत 59.6 टक्के इतका आहे.