Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

New Nuclear Plant: वाढती ऊर्जेची गरज भागवण्यासाठी केंद्र सरकार उभारणार 5 नवे अणूऊर्जा प्रकल्प

Nuclear Plant

New Nuclear Plant: देशामध्ये 5 नवीन अणू ऊर्जा प्रकल्प उभारण्यास केंद्र सरकारने मंजूरी दिली आहे. 'क्लिन एनर्जी' निर्मितीचा प्रयत्न म्हणून सरकारने हा निर्णय घेतला आहे. देशामध्ये सध्या सुमारे 32 आण्विक ऊर्जा प्रकल्प कार्यरत आहेत. त्यामध्ये आता वाढ होणार आहे. यातील काही प्रकल्प सरकार गरजेनुसार आणि ऊर्जेच्या मागणीनुसार चालू बंद करते.

देशामध्ये 5 नवीन अणू ऊर्जा प्रकल्प उभारण्यास केंद्र सरकारने मंजूरी दिली आहे. 'क्लिन एनर्जी' निर्मितीचा प्रयत्न म्हणून सरकारने हा निर्णय घेतला आहे. देशामध्ये सध्या सुमारे 32 आण्विक ऊर्जा प्रकल्प कार्यरत आहेत. त्यामध्ये आता वाढ होणार आहे. यातील काही प्रकल्प सरकार गरजेनुसार आणि ऊर्जेच्या मागणीनुसार चालू बंद करते.  

हेवी वॉटर रिअॅक्टर निर्मितीसही मंजूरी (Heavy water reactor)

नवीन 5 आण्विक ऊर्जा प्रकल्प कोठे उभारण्यात येतील याबाबत माहिती अद्याप दिली नाही. यासोबतच सरकारने 700 मेगावॅट क्षमतेचे 10 हेवी वॉटर रिअॅक्टर निर्मितीस परवानगी दिली आहे. औष्णिक ऊर्जा निर्मिती प्रकल्पातून प्रदूषण मोठ्या प्रमाणात होते. त्याला पर्याय म्हणून वाढती ऊर्जेची गरज भागवण्यासाठी सरकारने नव्या प्रकल्पांना मंजूरी दिली आहे.

वाढती ऊर्जेची मागणी (High energy demand)

देशाची ऊर्जेची गरज दिवसेंदिवस वाढत आहे. दरवर्षी 7.2% ऊर्जेची मागणी वाढणार असल्याचा अंदाज ऊर्जा मंत्रालयाने वर्तवला आहे. 2027 पर्यंत ऊर्जेची वार्षिक गरज 1 हजार 874 अब्ज युनिट होऊ शकते. 2027 पर्यंत ऊर्जेच्या क्षमतेत 165.3 गिगावॅट वाढ करण्याचे नियोजन मंत्रालयाने केले आहे. यातील काही प्रमाणातील ऊर्जा नवीकरणीय ऊर्जा स्रोतातून निर्मिती करण्यात येणार आहे.

आशियातील पहिली अणूभट्टी (Asia's first nuclear reactor)

कोळसा, वायू, पवन ऊर्जा आणि जलविद्युत यानंतर भारतात वीजनिर्मिती करणारा अणुऊर्जा हा पाचवा सर्वात मोठा स्रोत आहे. भारताकडे आशियातील पहिली आण्विक अणुभट्टी आहे, ती म्हणजे अप्सरा संशोधन अणुभट्टी (Nuclear Power Plant in India) मुंबई येथे आहे. सध्या भारताकडे सुमारे 6,780 मेगावॅट क्षमतेचे 32 कार्यरत अणुभट्ट्या आहेत, त्यापैकी 18 अणुभट्ट्या प्रेशराइज्ड हेवी वॉटर रिअँक्टर्स (Pressurised Heavy Water Reactors – PHWR) आणि इतर हलक्या पाण्याच्या अणुभट्ट्या ( Light Water Reactors – LWR) आहेत.

देशभरात 106 औष्णिक ऊर्जा प्रकल्प

देशामध्ये एकूण 106 औष्णिक ऊर्जा प्रकल्प कार्यरत आहेत. या प्रकल्पाची क्षमता सुमारे 2 लाख 21 हजार MW एवढी आहे. या सोबतच अपारंपरिक ऊर्जा निर्मितीचा प्रयत्नही सरकारकडून करण्यात येत आहे. समुद्रकिनारी वीज निर्मितीचे लक्ष्य 2022 पर्यंत 5 गिगावॅट आणि 2030 पर्यंत 30 गिगावॅटने वाढवण्यात आले आहे. पवन ऊर्जा क्षेत्राचाही चांगला विस्तार झाला आहे, उत्पादन क्षेत्रातही क्षमता वाढली आहे.