Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Dairy products : देशाला करावी लागू शकते डेअरी प्रॉडक्ट्सची आयात, काय आहे दुग्धव्यवसायाची स्थिती?

Dairy products : देशाला करावी लागू शकते डेअरी प्रॉडक्ट्सची आयात, काय आहे दुग्धव्यवसायाची स्थिती?

Dairy products import situation : देशात डेअरी प्रॉडक्ट्सची कमतरता भासत असून विविध उत्पादन आयात करावी लागू शकतात, अशी स्थिती निर्माण झालीय. अलिकडेच गुरांमधला लम्पी आजार याला प्रामुख्यानं कारणीभूत ठरला. पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय सचिव राजेश कुमार सिंह यांनी याबाबतची सविस्तर माहिती दिलीय.

दुग्ध उत्पादनात (Dairy products) देश अग्रेसर असला तरीही मागच्या काही काळापासून दुग्ध व्यवसायाला विविध संकटांचा सामना करावा लागतोय. मागच्या पूर्ण वर्षभरात दुग्ध उत्पादन ठप्पच राहिल्यासारखं झालं होतं. गुरांमधला त्वचेचा आजार ज्याला लम्पी (Lumpy) म्हटलं जातं, त्यानं थैमान घातलं होतं. याच कालावधीत देशांतर्गत मागणीत 8-10 टक्क्यांनी वाढही झाली. त्यामुळे आर्थिक वर्ष 2022-23 दुग्ध उत्पादनासाठी फारसं चांगलं राहिलं नाही, असं राजेश कुमार सिंह म्हणाले. दरम्यान, शरद पवार यांनी यासंबंधी टाइम्स ऑफ इंडियाचं कात्रण जोडत एक ट्विट केलंय. तर छगन भुजबळ यांनी शरद पवारांचं ट्विट रिट्विट केलंय.

दक्षिणेकडच्या राज्यांमध्ये फ्लशिंग

गेल्या आर्थिक वर्षात दुधाचं उत्पादन स्थिर राहिल्यामुळे अशा वस्तूंच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण झाले. त्यामुळे गरज भासली तर लोणी आणि तूप यासारख्या दुग्धजन्य पदार्थांची भारत आयात करू शकतो, अशी माहिती त्यांनी दिली. दक्षिणेकडच्या राज्यांमध्ये फ्लशिंग म्हणजेच चांगल्या प्रकारच्या उत्पादनाचा हंगाम सुरू झालाय. त्याठिकाणी दुधाच्या साठ्याचं मूल्यांकन केलं जाईल. त्यानंतर आवश्यकता भासली तर दुग्धजन्य पदार्थ त्यातही लोणी आणि तूप अशा पदार्थांची आयात करण्यासाठी सरकार प्रयत्न करेल, अशी माहिती त्यांनी दिली.

मागणी आणि पुरवठ्यात तफावत

आर्थिक वर्ष 2021-22मध्ये भारतातलं दुधाचं उत्पादन 221 दशलक्ष टन होते. मागील वर्षीच्या 208 दशलक्ष टन उत्पादनाच्या तुलनेत हे प्रमाण 6.25 टक्क्यांनी वाढलं. मात्र त्या तुलनेत मागणीदेखील वाढली. त्यामुळे मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण झाली. म्हणजेच उत्पादन स्थिर आणि मागणी जवळपास 8 ते 10 टक्क्यांनी वाढली. त्या सर्वांचा परिणाम एकूण दुग्ध व्यवसायावर झाल्याचं राजेश कुमार सिंह म्हणाले.

दुधाच्या पुरवठ्यात अडचण नाही

देशात सध्या दुधाच्या पुरवठ्यात कोणतीही अडचण जाणवत नाही. स्किम्ड मिल्क पावडरचा (Skimmed milk powder) साठाही पुरेशा प्रमाणात आहे. मात्र दुग्धजन्य पदार्थ, विशेषत: लोणी आणि तूप इत्यादी पदार्थांचा साठा मागच्या वर्षाच्या तुलनेत कमी आहे. अलिकडच्या काही महिन्यांत आंतरराष्ट्रीय किंमती स्थिर असल्यानं यावेळी आयात फायदेशीर ठरू शकत नाही, अशी माहितीदेखील त्यांनी दिली.

उत्तर भारतात अधिक गरज

जागतिक किंमती उच्च राहिल्या तर सरकार देशातल्या विविध भागातल्या विशेषत: दक्षिणेकडच्या राज्यातल्या फ्लश सीझनचं मूल्यांकन करेल आणि त्यानंतर संबंधित उत्पादनं आयात करायची का, याचा निर्णय सरकार घेणार आहे. सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशाच्या उत्तर भागातच्या दुग्ध व्यवसायाची स्थिती फारशी चांगली नाही. मागच्या काही महिन्यांत झालेला अवकाळी पाऊ, तापमानात थंडी आणि आर्द्र वातावरण यामुळे एकूणच प्रतिकूल परिणाम झाला.

2011मध्ये केली होती शेवटची आयात

या सर्व कारणांसोबतच चाऱ्याचीही कमतरता देशात निर्माण झाली. तेही एक महत्त्वाचं कारण ठरतंय. चाऱ्याच्या किंमती वाढल्यानं त्याचा परिणाम थेट दुग्ध उत्पादनावर झाला. दूध आणि दुधाचे पदार्थ यामुळे महागले. मागच्या चार वर्षांत चारा पिकाचं क्षेत्र स्थिर राहिलं. त्यामुळे चाऱ्याच्या पुरवठ्यात अडचणी निर्माण झाल्या. याउलट दुग्धव्यवसायाची वाढ वार्षिक 6 टक्क्यांनी होत आहे. याआधी 2011मध्ये भारतानं शेवटची डेअरी उत्पादनं आयात केली होती. आता पुन्हा विविध अडचणींमुळे दुग्ध उत्पादनं आयात करण्याची स्थिती निर्माण झालीय.