India is 3rd Largest Auto Market in World: मागील वर्ष भारतासाठी गाडी विक्रीत सुपरडुपर ठरले आहे. 2022 या वर्षात भारताने सर्वाधिक गाडी विक्रीचा नवीन रेकाॅर्ड केला आहे. यामध्ये भारताने जपान व जर्मनीलादेखील मागे टाकत जगात तिसरे स्थान मिळविले आहे. याबाबत सविस्तर पाहूयात.
जगभरात किती वाहनांची विक्री केली?
भारताने 2022 मध्ये साधारण 4.4 मिलियन युनिट्स वाहनांची विक्री केली आहे. या विक्रीमध्ये 23.40 टक्क्यांची वाढ झाली आहे. या विक्रीसह भारताने अमेरिका व जपानला मागे टाकले आहे. जगभरातील टॉप 5 देशांपैकी सर्वाधिक गाडयांची विक्री करण्याचा रेकाॅर्ड भारताने नोंदवला आहे. जगात सर्वाधिक वाहनांच्या विक्रीमध्ये चीन पहिल्या नंबरवर असून, अमेरिका दुसऱ्या नंबरवर आहे. मागील वर्षी चीनमध्ये 24.8 मिलियन कार्सची विक्री केली होती. यामध्ये चीनने 3.60 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. अमेरिकेत 13.8 मिलियन कार्सची विक्री करण्यात आली होती. अमेरिकेने 8.30 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. जपानमध्ये 4.2 मिलियन कार्सची विक्री करण्यात आली असल्याची माहिती मिळाली.
विक्रीत घट
जपानच्या एकूण विक्रीत 2021 तुलनेत वार्षिक 4.40 टक्क्यांनी घट झाली असल्याचे दिसत आहे, तर जर्मनी 2.8 मिलियन युनिट्सच्या विक्रीसह पाचव्या नंबरवर आहे. जर्मनीत वाहनांच्या विक्रीत 2.90 टक्के घट झाली असल्याचे पाहायला मिळत आहे.
भारताची झेप
भारताने 2022 मध्ये पहिल्यांदाच एकूण उत्पादनामध्ये 5 मिलियन युनिट्सचा टप्पा पार केला. त्यामुळे भारत जगात चौथ्या नंबरवरील हलक्या वाहनांचा निर्माता बनला असून, अलिकडच्या काळात या सेगमेंटमध्ये किआ, एमजी, आणि सिट्रॉन या तीन परदेशी कंपन्यां भारतात दाखल झाल्यानंतर, स्पर्धा मोठया प्रमाणात वाढली आहे. तर फोर्ड, जनरल मोटर्स आणि डॅट्सन या कंपन्या मात्र मागे पडल्या असल्याचे चित्र दिसत आहे.