Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

India-Canada Relation: खलिस्तानी मुद्द्यावरून भारत-कॅनडा संबंध बिघडले; व्यापारासह आर्थिक परिणाम काय होतील?

India Canada Trade

Image Source : www.twitter.com/Indian_Analyzer

खलिस्तानी मुद्द्यावरून भारत-कॅनडातील संबंध बिघडले आहेत. त्यामुळे दोन्ही देशातील व्यापारी संबंधही धोक्यात आले आहेत. फुटीरतावादी नेते हरदीपसिंग सिंग निज्जर यांच्या हत्येमागे भारतीय गुप्तचर यंत्रणा असल्याचा आरोप कॅनडाने केला आहे. दरम्यान, भारताने हा आरोप फेटाळला आहे.

India-Canada Relation: खलिस्तानी मुद्द्यावरून भारत-कॅनडातील संबंध तणावपूर्ण बनले आहेत. नुकतेच कॅनडामध्ये खलिस्तानी फुटीरतावादी चळवळीचे नेते हरदीप सिंग निज्जर यांची हत्या झाली. या हत्येमागे भारतीय गुप्तचर संघटनांचा हात असल्याचा आरोप कॅनडाने केला आहे. भारताने हा आरोप फेटाळून लावला आहे. दरम्यान, दोन्ही देशांतील व्यापारी संबंधही धोक्यात आले आहेत.

मुक्त व्यापार धोरण अडचणीत

भारत कॅनडामध्ये मुक्त व्यापार करारावर चर्चा सुरू होती. मात्र, खलिस्तानी प्रश्नामुळे ही चर्चा पुन्हा बारगळली आहे. दोन्ही देशांमध्ये Comprehensive Economic Partnership Agreement (CEPA) करार होणार होता. या करारामुळे अंदाजित 650 कोटी डॉलरचा व्यापार झाला असता. याचा फायदा दोन्ही देशांतील अर्थव्यवस्थांना होईल, मात्र, तूर्तास चर्चा थांबली आहे. 

संबंध बिघडण्यास तत्कालीन कारण काय?

हरदीप सिंग निज्जर हा Khalistan Tiger Force (KTF) या बंदी घालण्यात आलेल्या संघटनेचा प्रमुख होता. (India-Canada Khalistan issue) दोन बंदुकधारी व्यक्तींनी 18 जून रोजी निज्जर ची कॅनडात गोळ्या घालून हत्या केली. तेव्हापासून वातावरण तापले आहे. 

भारतीय गुप्तचर यंत्रणांचा हात या हत्येमागे असल्याचे कॅनडा सरकारने म्हटले आहे. कॅनडा सरकारने भारतीय उच्चायुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याला माघारी पाठवले आहे. पवन कुमार राय असे या भारतीय अधिकाऱ्याचे नाव आहे. दरम्यान, भारतानेही जशास तसे उत्तर देत कॅनडाच्या उच्चायुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याला मायदेशी धाडले. 

भारत कॅनडातील व्यापारी संबंध

2022 साली भारत-कॅनडामध्ये 800 कोटी डॉलरचा व्यापार झाला. यात भारताने कॅनडातून 400 कोटी डॉलरच्या वस्तू आयात केल्या तर तेवढ्याच किंमतीच्या वस्तू भारताने निर्यात केल्या. वीज निर्मितीसाठी लागणारा कोळसा, कोक, ब्रिक्वेट्स, खते या वस्तू भारत सर्वाधिक आयात करतो. 

तर कपडे, ऑटो पार्ट्स, विमानाचे पार्ट्स, इलेक्ट्रॉनिक आणि इंजिनिअरिंग वस्तू भारत निर्यात करतो. 2022 साली भारताने 100 कोटींच्या वीज निर्मितीसाठी लागणाऱ्या वस्तू कॅनडाकडून आयात केल्या. त्यानंतर खतांची सर्वाधिक आयात केली. खलिस्तान प्रकरणावरून दोन्ही देशांतील संबंध ताणले तर हा व्यापार खाली येऊ शकतो. 

कॅनडाची भारतात गुंतवणूक किती?

कॅनडा हा भारताचा 17 वा मोठा परदेशी गुंतवणूकदार आहे. 2000 सालापासून कॅनडातील गुंतवणूकदारांनी भारतात 350 कोटी डॉलर रुपये गुंतवले आहेत. कॅनडातील 600 पेक्षा जास्त कंपन्या भारतामध्ये व्यवसाय करतात. तर भारतातील शेकडो कंपन्या कॅनडामध्ये व्यवसाय करतात. टीसीएस, इन्फोसिस, विप्रोसह इतर काही बड्या कंपन्यांनी कॅनडात कोट्यवधींची गुंतवणूक केली आहे. 

कॅनडा पंजाबीयांचे फेवरेट डेस्टिनेशन

भारतातील पंजाब राज्यातील अनेक नागरिक कॅनडात स्थिरावले आहेत. त्यांचे नातेवाईक पंजाबमध्ये आहेत. (Khalistan moment in Canda) दरवर्षी कॅनडातून भारतातील कुटुंबियांना कोट्यवधींचा रेमिटन्स मनी पाठवला जातो. त्यावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कॅनडाच्या एकूण लोकसंख्येपैकी 2% पेक्षा जास्त शीख नागरिक आहेत. नोकरी आणि चांगल्या शिक्षणासाठी अनेक भारतीय कॅनडात स्थलांतरित होतात आणि तेथेच स्थिरावतात.