Music Exports: अर्थव्यवस्था म्हणून भारताचा दर्जा सातत्याने वाढत आहे. सध्या जग मंदीच्या भीतीने त्रस्त असताना भारत हा जगासाठी आर्थिक ताकदीचा केंद्रबिंदू राहिला आहे. अमेरिका, युरोपसह इतर देशांमध्ये राहणाऱ्या भारतीय वंशाच्या लोकांचा यामध्ये मोठा वाटा आहे. इतर देशात राहणाऱ्या मजबूत अर्थव्यवस्थेसोबतच भारताने विकसित देशांमध्ये संगीताची निर्यातही सुरू केली आहे.
Table of contents [Show]
संगीताचा वापर वाढला
स्वीडिश ऑनलाइन म्युझिक स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म स्पॉटिफाईने संगीताचा वापर आणि निर्यात यावर मनोरंजक ट्रेंड नोंदवले आहेत. बिझनेस टुडेच्या एका वृत्तात, स्पॉटीफायने दक्षिण आशियामधून संगीत आयात करण्यात अमेरिका अव्वल असल्याचे सांगितले आहे. त्यानंतर ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि जर्मनी या देशांचा क्रमांक लागतो. UAE मध्ये दक्षिण आशियाई संगीताचा वापर झपाट्याने वाढत आहे आणि वार्षिक आधारावर 72 टक्क्यांनी वाढला आहे.
ही शहरे आघाडीवर
शहरांवर नजर टाकली तर दक्षिण आशियाई संगीत ऐकण्यात कॅनडा टोरंटो आघाडीवर आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियातील मेलबर्न आणि सिडनी, ब्रॅम्प्टन आणि दुबई या शहरांचा क्रमांक राहिला. स्पॉटिफाई इंडियाचे म्युझिक हेड राहुल बल्यान सांगतात की, दक्षिण आशियातील संगीत निर्यातीच्या ट्रेंडमध्ये भारताचे योगदान मोठे आहे.
केशरिया गाणे मागणीत अव्वल
Spotify च्या मते, यूएस, यूके, यूएई, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडामध्ये भारतीय वंशाच्या लोकांमुळे गेल्या एका वर्षात भारतीय संगीताचा खप वाढला आहे. यादरम्यान ब्रह्मास्त्र आणि पठाण या बॉलिवूड चित्रपटांची गाणी या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात ऐकू आली. ब्रह्मास्त्रचे केशरिया गाणे मागणीच्या बाबतीत अव्वल राहिले.
कॅनेडियात पंजाबीची मागणी
कॅनेडियन ग्राहकांमुळे पंजाबी संगीताच्या खपाला चालना मिळाली. गेल्या एका वर्षात कॅनेडियन मार्केटमध्ये टॉप-10 सर्वाधिक वापरल्या जाणार्या संगीतामध्ये बॉलीवूडमधून एकही प्रवेश झालेला नाही. या यादीत पंजाबी आणि हिप हॉप संगीताचा दबदबा आहे. सिद्धू मूसा वाला, करण औजला, एपी ढिल्लन, दिलजीत दोसांझ, अर्जन ढिल्लन आणि इक्की हे कॅनडात सर्वाधिक ऐकले गेले. तर इतर मार्केटमध्ये अरिजित सिंगचे वर्चस्व दिसून आले.