Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Independence Day 2023 Sale: 'या' टाॅप 7 गॅजेट्स'वर मिळतोय तगडा डिस्काउंट, लगेच डिटेल्स पाहा

Independence Day 2023 Sale: 'या' टाॅप 7 गॅजेट्स'वर मिळतोय तगडा डिस्काउंट, लगेच डिटेल्स पाहा

Image Source : www.vijaysales.com

Independence Day 2023 Sale: स्वातंत्र्यदिनानिमत्त विजय सेल्समध्ये (Vijay Sales) भन्नाट ऑफर्स सुरू आहेत. तुम्हाला तुमच्या जवळच्या व्यक्तीला किंवा मित्राला काही गिफ्ट द्यायचे असल्यास, या ऑफर्स चुकवू नका. कारण टाॅप 7 गॅजेट्सचा यात समावेश आहे. तुम्हाला मोठ्या डिस्काउंटसह ते घेता येणार आहेत. चला तर मग डिटेलमध्ये जाणून घेऊया.

आजचा स्वातंत्र्यदिन एखाद्याच्या कायम लक्षात राहावा यासाठी तुम्ही काहीतरी गिफ्ट देण्याचा प्लॅन करू शकता. कारण विजय सेल्समधील या 7 गॅजेट्सवर तुम्हाला तगडा डिस्काउंट मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही हा स्वातंत्र्यदिन एखाद्याला गिफ्ट देऊन खास बनवू शकता. तो बनवण्यासाठी यापेक्षा चांगली संधी तुम्हाला कधीच मिळणार नाही. चला तर मग त्या गॅजेट्सविषयी जाणून घेऊया.

सॅमसंग गॅलेक्सी A14 5G

विजय सेल्समध्ये तुम्हाला सॅमसंग गॅलेक्सी A14 5G फक्त ₹15,498 रुपयांमध्ये उपलब्ध होणार आहे. तसेच ग्राहकाने HDFC बॅंकेच्या क्रेडिट आणि डेबिट कार्ड EMI चा व्यवहार केल्यास, 3000 रुपये ते 7.5 टक्क्यांपर्यंत इन्स्टंट डिस्काउंट मिळणार आहे. तसेच, ग्राहकांना 4 GB रॅम, 64 GB रोम एवढा स्टोअरेज  मिळणार आहे. हा स्मार्टफोन वन UI सह अँड्रॉइड 13 वर चालतो आणि याचा 6.6' एलसीडी डिस्प्ले आहे. फोनमध्ये 50 एमपी + 2 एमपी + 2 एमपी ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, तर 13 एमपी सेल्फी कॅमेरा आहे. याचबरोबर 5000 mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.

सोनी X75L 4K Ultra HD स्मार्ट LED TV

हा सोनीचा स्मार्ट TV विजय सेल्सवर 63,160 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. तसेच ग्राहकाने HDFC बॅंकेच्या क्रेडिट आणि डेबिट कार्ड EMI चा व्यवहार केल्यास, 3000 रुपये ते 7.5 टक्क्यांपर्यंत त्यांना इन्स्टंट डिस्काउंटचा लाभ घेता येणार आहे. या डिव्हाईसमध्ये 55 इंचांचा डिस्प्ले, ब्लूटूथ, वाय-फाय, चाईल्ड लाॅक, पॅरंटल कंट्रोल, Google TV आणि Dolby ऑडिओसारख्या बेस्ट फीचर्सचा समावेश आहे.

लेनोव्हो टॅब M10 HD 2nd Gen

लेनोव्होच्या या टॅब्लेट व्हेरियंटची किंमत 14499 रुपये आहे. तसेच 4GB रॅम, 64GB रोम याची स्टोअरेज आहे. याच्या फीचर्समध्ये 10.1 इंचांचा एचडी डिस्प्ले, मीडियाटेक हेलिओ P22T चिपसेट आणि याला 8 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सेन्सर आहे. तसेच, हे Dolby Atmos साउंडला सपोर्ट करते.  

असुस Vivo book 15

असुस Vivo book 15 ची किंमत 38,990 रुपये आहे. तसेच ग्राहकाने HDFC बॅंकेच्या क्रेडिट आणि डेबिट कार्ड EMI चा व्यवहार केल्यास, 3000 रुपये ते 7.5 टक्क्यांपर्यंत त्यांना इन्स्टंट डिस्काउंटचा लाभ घेता येणार आहे. हा 12 वा जनरेशन असून i3 प्रोसेसर आहे. इतरही बऱ्याच नवीन फिचरचा यामध्ये समावेश आहे. तसेच याची स्क्रीन 15.6 इंचांची आहे. त्यामुळे Vivo book लपटाॅपचे चाहते खरेदी करून डिस्काउंटचा लाभ घेऊ शकतात.

नॉईस Color Fit Ultra 3

या ब्लूटूथ कॉलिंग स्मार्टवॉचची किंमत 4,499 रुपये आहे. या वाॅचचा 1.96 इंचांचा AMOLED डिस्प्ले आहे, हार्ट बिटवर लक्ष ठेवणे आणि इतरही फीचर्सचा यामध्ये समावेश आहे. तसेच, ही वाॅच एकदा चार्ज केल्यावर 7 दिवस आरामात चालू शकते.

बोट Rockerz 551 वायरलेस हेडफोन

या नॉईस कॅन्सलिंग वायरलेस हेडफोनची किंमत 3,499 रुपये आहे. यात 40 एमएम ड्रायव्हर आहेत आणि एकदा चार्ज केल्यावर 100 तासांपर्यंत त्याचा वापर करता येतो. त्यामुळे एकदा चार्ज केल्यावर परत चार्ज करायचे टेन्शन राहणार नाही.

बोट एअरपाॅड 148 RTL

हे TWS इयरबड्स विजय सेल्समध्ये 1049 रुपयांना उपलब्ध आहे. याच्या फीचर्समध्ये 8mm ड्रायव्हर्स, ब्लूटूथ 5.0 आणि एअरपाॅडला वॉटर रेझिस्टन्ससाठी IPX4 रेटिंगचे प्रमाणपत्र देण्यात आले आहे. ही सर्व गॅजेट्स पाहिल्यावर, तुम्ही यातील एक गिफ्ट देण्यासाठी किंवा स्वत: साठी खरेदी करून स्वातंत्र्यदिनाचा आनंद घेऊ शकता.