मागील काही दिवसांपासून काही बँका कर्जावर व्याजदर आहेत. या व्याजदरवाढीच्या खेळात आपल्या खातेदारांना थोडाफार दिलासा देण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India SBI), एचडीएफसी (HDFC), आयडीबीआय बँक(IDBI Bank) आणि कोटक महिंद्रा बँक(Kotak Mahindra Bank) यांनी त्याच्या ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे.
एसबीआयचे व्याजदर
देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयने (SBI) त्याच्या किरकोळ किमतीच्या दरात (MCRL) 0.20 टक्के वाढ केली आहे. एसबीआयने (SBI) 2 कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवींवरील व्याजदरांत 20 बेसिस पॉइंट्स म्हणजेच 0.20 टक्क्यांनी वाढ केली आहे. तसेच SBI ने 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त असलेल्या निवडक मुदतीच्या देशांतर्गत मोठ्या मुदत ठेवींच्या (Domestic Bulk Term Deposit) व्याजदरात 75 बेसिस पॉइंट्स म्हणजेच 0.75 टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. तसेच देशांतर्गत मोठ्या मुदत ठेवी मुदतीपूर्वी पैसे काढल्यास 1 टक्के दंड आकारला जाईल.
एचडीएफसी, आयडीबीआय, कोटक बँकेचे व्याजदर
एचडीफसी बँकेने (HDFC Bank) 33 महिन्याच्या ठेवींवर 6.75 टक्के आणि 99 महिन्याच्या ठेवींवर 7.05 टक्के व्याज देण्याचे जाहीर केले आहे. कोटक महिंद्रा बँकेने (Kotak Mahindra Bank) बचत खात्यावरील व्याजदरात तसेच विविध कालावधीतील मुदत ठेवीच्या व्याजदरात वाढ केली आहे. बचत खात्यातील 50 लाख रुपयांवर 3.5 टक्क्यांवरून 4 टक्के वार्षिक दराने म्हणजेच 50 बेसिस पॉइंट्स जास्त व्याजदर मिळेल. तसेच मुदत ठेवींवरील व्याज हे 10 ते 25 बेसिस पॉइंट्सने वाढले आहे. १३ जून पासून बचत खात्यातील व्याजदरात वाढ लागू झाली आहे. आयडीबीआय बँकेने मंगळवारी (14 जून) 2 कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवींवरील व्याजदरात 25 बेसिस पॉइंट्स पर्यंत वाढ केली आहे. आजपासून (15 जून) हे सुधारित दर लागू झाले आहेत. बँक 5.75 टक्के एवढा व्याजदर देत आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांना 6.50 टक्के पर्यंत अतिरिक्त 75 बेसिस पॉइंट्स व्याजदर देत असल्याचे आयडीबीआय बँकेचे उपसंचालक सुरेश खतांहार यांनी सांगितले.
या व्याजदर वाढीने बँक खातेदारांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.