टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) आपल्या सर्वांच्याच परिचयाचा आहे. विराटने त्याच्या आजपर्यंतच्या वाटचालीत अनेक नवे विक्रम रचले आहेत. त्याच्या हटके स्टाईलमुळे तो सतत चर्चेत असतो. नुकताच स्टॉक ग्रो (Stock Grow) नामक कंपनीने त्याच्या संपत्तीबद्दल माहिती दिली आहे. या माहितीनुसार विराटच्या एकूण संपत्तीमध्ये वाढ झाली असून त्याची एकूण संपत्ती 1050 कोटींवर पोहचली आहे. तो कोणत्या गोष्टीतून किती पैसे कमावतो, जाणून घेऊयात.
Table of contents [Show]
सोशल मीडियातून करतो कोट्यावधींची कमाई
विराट कोहलीचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. त्याचे इंस्टाग्रामवर 252 मिलियन फॉलोवर्स आहेत. तर ट्विटरवर 56.4 मिलियन फॉलोवर्स सक्रिय आहेत. याच सोशल माध्यमांच्या मदतीने तो कोट्यावधींची कमाई करतो. इंस्टाग्रामवर एक पोस्ट टाकण्यासाठी तो 8.9 कोटी रुपये चार्ज करतो. तर ट्विटरवरील पोस्टसाठी तो 2.5 कोटी रुपये चार्ज करतो.
BCCI कडून मिळते वार्षिक 'इतकी' रक्कम
34 वर्षीय भारतीय क्रिकेटर विराट कोहली टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि फलंदाज आहे. विराट ए प्लस (A+) श्रेणीतील खेळाडू असून क्रिकेट बोर्डाकडून (Cricket Board) त्याला वार्षिक 7 कोटी रुपये दिले जातात. प्रत्येक मॅचनुसार त्याला वेगवेगळे मानधन मिळते. टेस्ट मॅचसाठी त्याला 15 लाखांचे मानधन, वन डे मॅचसाठी 6 लाख रुपये, तर टी 20 साठी त्याला जवळपास 3 लाख रुपये देण्यात येतात. याशिवाय आयपीएलच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर कडून खेळत असल्याने त्याला वार्षिक 15 कोटी रुपये देण्यात येतात.
ब्रँड प्रमोशनमधून कमावतो ‘इतके’ पैसे
विराट कोहली आपल्याला सतत वेगवेगळ्या ब्रँड्सचे प्रमोशन करताना पाहायला मिळतो. एका ऍड शूटसाठी वार्षिक आधारावर तो 7.5 ते 10 कोटी रुपये चार्ज करतो. त्यासोबतच ब्रँड एंडोसमेंटच्या माध्यमातून जवळपास 175 कोटींची कमाई करतो.
महत्त्वाचं म्हणजे विराटने अनेक स्टार्टअप बिजनेसमध्ये गुंतवणूक केली आहेत. ज्यामध्ये ब्ल्यू ट्राईब, युनिव्हर्सल स्पोर्टबीज, एमपीएल आणि स्पोर्ट्स कॉन्वोचा समावेश करण्यात आला आहे.
अलिशान घराचा मालक
विराटला महागड्या लक्झरी गाड्या आणि आलिशान घरांचा शौक आहे. त्याचे गुरुग्राममध्ये 2 आलिशान बंगले असून मुंबईत 1 घर आहे. तो एफसी गोवा क्लबचा (FC Goa Club) मालक आहे. तसेच त्याच्याकडे एक टेनिस आणि कुस्तीची टीम सुद्धा आहे. विराट क्रिकेटमधून जितकी कमाई करतो, त्यापेक्षा जास्त कमाई तो ब्रँड एंडोसमेंट आणि ऍड शूटमधून करतो.
Source: hindi.moneycontrol.com