Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Income Tax Return: आर्थिक वर्षात टीडीएस 25 हजार रुपयांपेक्षा जास्त असेल तर आयकर अनिवार्य

Income Tax Return: आर्थिक वर्षात टीडीएस 25 हजार रुपयांपेक्षा जास्त असेल तर आयकर अनिवार्य

Image Source : www.naidunia.com

Income Tax Return: करदात्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. एका आर्थिक वर्षात जर टीडीएस 25 हजार रुपयांपेक्षा अधिक असेल तर तुम्हाला आयकर भरणं बंधनकारक असणार आहे. वैयक्तिक करदात्यांना आयकर रिटर्न भरणं सरकारनं बंधनकारक केलं आहे. ज्यांची टीडीएस किंवा टीसीएस मर्यादा 25 हजार रुपये किंवा त्याहून अधिक आहे, त्यांच्यासाठी हे बंधनकारक आहे.

व्यक्तीचं उत्पन्न (Income) मूळ सूट मर्यादेपेक्षा कमी नसले तरी अशा व्यक्तींना आयकर (Income tax) भरणं बंधनकारक आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत जेव्हा व्यक्तीचा एकूण टीडीएस (Tax Deducted at Source) किंवा टीसीएस (Tax collected at Source) वर्षभरात 50000 रुपये किंवा त्याहून जास्त असेल तेव्हा हा नियम लागू होणार आहे. याशिवाय ज्या व्यक्तीच्या बचत बँक खात्यात (Bank saving account) एका आर्थिक वर्षात 50 लाख रुपये किंवा त्याहून अधिक ठेवी असतील त्यांनादेखील अनिवार्यपणे आयकर भरावा लागणार आहे.

आयटीआर दाखल करण्याचे काय होते निकष?

वित्त कायदा 2019च्या कलम 139मधील सातवी तरतूद रिटर्न भरण्यासाठी काही निकष देते. जर उत्पन्न मर्यादेत बसत नसेल तर आयटीआर दाखल करणं यानुसार अनिवार्य आहे. अशा निकषांमध्ये चालू खात्यात 1 कोटी रुपये किंवा त्याहून अधिक रक्कम जमा करणं, परदेश प्रवासासाठी 2 लाखांपेक्षा जास्त खर्च करणं किंवा वर्षभरातल्या विजेच्या वापराची रक्कम 1 लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास आयटीआर दाखल करणं अशा काही बाबींचा यात समावेश आहे.

नवीन नियम

22 एप्रिल 2022च्या अधिसूचना क्रमांक 37/2022नुसार सीबीडीटीनं (CBDT) नवीन नियम 12AB अधिसूचित केला आहे. यात काही अतिरिक्त अटी आहेत. या अंतर्गत निकष मागच्या वर्षात व्यवसायातल्या निव्वळ उलाढाल 60 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, मागच्या वर्षात व्यवसायातून निव्वळ उत्पन्न 10 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. दुसरीकडे, आर्थिक वर्षात एकूण टीडीएस किंवा टीसीएस 25 हजारांपेक्षा जास्त असल्यास आटीआर भरणं अनिवार्य आहे. त्याचबरोबर बचत खात्यात 50 लाखांपेक्षा जास्त रक्कम जमा केल्यानंतरही आयटीआर भरावा लागेल.

नाही भरला तर...

ईटीनं यासंदर्भात एक अहवाल दिला आहे. या अहवालामध्ये दिलं आहे, की संबंधित नव्या नियमानुसार 25,000 रुपयांपेक्षा जास्त टीडीएसवर आयटीआर भरणं बंधनकारक असणार आहे. यामुळे अनेक करदाते या कक्षेत येणार आहेत. विशेषत: असे करदाते जे जास्त व्यवहार करतात मात्र टीडीएस भरत नाहीत. यामुळे कर भरण्यात पारदर्शकता येणार आहे. अशा करदात्यांना सरकार नोटीसदेखील पाठवू शकणार आहे, असं काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे.