Mumbaikars placed the highest order of french fries in a year: बटाटा आणि बटाट्याचे पदार्थ हे भारतीयांचे फेव्हरेट खाद्यांपैकी एक आहे. बेल्जियममध्ये उद्याला आलेला हा पदार्थ भारतात आणि विशेषत: अहमदाबादनंतर मुंबईत मोठ्या प्रमाणात खाल्ला, ऑर्डर केला जात आहे. स्विगी इंडियाच्या माहितीनुसार मुंबईत 2022 या वर्षात तब्बल 27 लाख 87 हजार 602 ग्राहकांनी फ्रेंच फ्राईज ऑर्डर केले. स्नॅकमधील सर्वाधिक ऑर्डर केला गेलेला पदार्थ म्हणून फ्रेंच फ्राईजची घोषणाच जणू स्विगीने केली आहे.
पोर्तुगीजांनी साधारण 1453 साली भारतात आणलेला बटाटा, भारताच्या पारंपरिक खाद्यसंस्कृतीचा भाग बनला. पुढे 1600 मध्ये य़ुरोपातील बेल्जियममध्ये जन्माला आलेल्या फिंगर चिप्सला भारतीयांनी आज डोक्यावर घेतले आहे. फिंगर चिप्सला ब्रिटीशांनी फ्रेंच फ्राईज हे नाव दिले असल्यामुळे फिंगर चिप्सला जगभरात फ्रेंच फ्राईज म्हणून ओळखले जाते. फ्रेंच फ्राईज खाण्यात भारतात अहमदाबाद आघाडीवर आहे, त्यानंतर मुंबईचा क्रमांक लागतो.
स्विगी इंडियाच्या रिपोर्टनुसार, मुंबईत 27 लाख 87 हजार 602 ग्राहकांनी फ्रेंच फ्राईजची ऑर्डर केली. मिनिटाला साधारण 7 फ्रेंच फ्राईजच्या ऑर्डर अॅपवर येतात. फ्रेंच फ्राईजमध्ये प्लेन सॉल्टेड फ्राईजनंतर चीझी फ्राईजला ग्राहकांची पसंती दिसून येते. सर्वाधिक फ्रेंच फ्राईज या मॅकडॉनल्ड, चाय सुट्टा बार, चाय पॉईंटमधून ऑर्डर केल्या जातात. तर फ्राईजचे विविध प्रकार ऑर्डर करण्याासठी ग्राहकांची पसंती जे फ्राईज या दुकानाला आहे. जे फ्राईज हे खास फ्राईज सर्व्ह करणारे पहिले रेस्टॉरंट चेन आहे.
मॅकडॉनल्ड हे ग्राहकांच्या आजही आवडीचे रेस्टॉरंट आहे, येथील बर्गरसह फ्रेंच फ्राईजही एवढेच लोकप्रिय आहेत. साधारण प्रत्येक मॅकडॉनल्डसाठी येणाऱ्या ऑर्डरमध्ये फ्रेंच फ्राईजची ऑर्डर असते, असे निरीक्षण स्विगी इंडियाने नोंदवले आहे.
मुंबईत सध्या बटाट्याच्या फ्रेंच फ्राईजसोबत रताळ्याच्या फ्रेंच फ्राईजचा ट्रेंड सुरू झाला आहे. सध्या महिन्याला 32 टक्के ऑर्डर रताळ्याच्या फ्राईजची येत आहे, असेही स्विगीच्या रिपोर्टमध्ये नमूद केलेले आहे.