केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी अर्थसंकल्पाच्या भाषणात डिजिटल रुपीची घोषणा केली होती. त्यानंतर अखेर रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने रिटेल डिजिटल रुपीचे 1 डिसेंबर, 2022 ला अधिकृतरीत्या ओपनिंग केले. सध्या प्रायोगिक तत्त्वावर रिटेल डिजिटल रुपीचा प्रयोग 4 बॅंकांपुरताच मर्यादित असणार आहे. त्याचबरोबर तुम्ही होम लोन किंवा इतरप्रकारचे लोन घेतले असेल किंवा घेण्याचा विचार करत असाल तर किंवा तुमच्याकडे क्रेडिट कार्ड आहे; किंवा बॅंकेच्या खात्यातील माहिती मिळावी म्हणून तुम्ही Bank SMSसाठी सब्स्क्राईब केले आहे, तर तुमच्यासाठी डिसेंबर महिना खूपच महत्त्वाचा असणार आहे. कारण डिसेंबर महिन्यात बॅंकेशी (Bank) संबंधित महत्त्वाच्या गोष्टींमध्ये बदल होणार आहेत आणि हे बदल तुम्हाला माहित असणे खूप गरजेचे आहे.
Table of contents [Show]
रिटेल डिजिटल रुपी लॉन्च!
रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने प्रायोगिक तत्त्वावर रिटेल डिजिटल रुपीचे 1 डिसेंबरपासून सुरू केला आहे. सध्या रिटेल डिजिटल रुपीचा व्यवहार हा ठराविक ग्रुप आणि ठराविक 4 बॅंकांपुरताच मर्यादित असणार आहे. कालांतराने याची व्याप्ती आणि बॅंकांची संख्या वाढवली जाणार आहे. सध्या आरबीआयने या प्रयोगासाठी 8 बॅंकांची यासाठी निवड केली. पहिल्या टप्प्यामध्ये स्टेट बॅंक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय बॅंक, येस बॅंक आणि आयडीएफसी फर्स्ट बॅंक या बॅंकांमध्ये आणि मुंबई, नवी दिल्ली, बंगळुरु आणि भुवनेश्वर या शहरांमध्ये याचा वापर करता येणार आहे.
डिजिटल रुपी हा डिजिटल टोकनमध्ये उपलब्ध झाला असून ते कायदेशीर चलन आहे आणि याचे वाटप बॅंकांद्रवारे जसे नोटा आणि कॉईनस दिले जातात. तसेच होणार आहे. डिजिटल रुपीचा वापर (How To Use Digital Rupee) करण्यासाठी ग्राहकांना डिजिटल वॉलेट वापरावे लागणार आहे. जे तुम्हाला तुमच्या बॅंकेकडून दिले जाईल. ते तुम्ही मोबाईल किंवा इतर डिव्हाईसमधून वापरू शकता. याचे व्यवहार पर्सन टू पर्सन (P2P) आणि पर्सन टू मर्चंट (P2M) करता येणार आहे. व्यापाऱ्यांना पेमेंट करताना QR कोडचा वापर करता येणार आहे.
आणखी एक दरवाढ?
रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाची मॉनेटरी पॉलिसी संदर्भातील पुढील बैठक 7 डिसेंबरला आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत मॉनेटरी पॉलिसी समिती महागाई दर आटोक्यात आणण्यासाठी रेपो दरामध्ये (Repo Rate) वाढ करण्याची शक्यता आहे. सध्या आरबीआयचा रेपो दर 5.90 टक्के आहे. आरबीआयने 2022 या आर्थिक वर्षांत मे महिन्यापासून आतापर्यंत 190 बेसिस पॉईंटने वाढ केली आहे. पण तरीही महागाई कमी होण्याचे लक्षण दिसत नाही. परिणामी या बैठकीत सुद्धा आरबीआय रेपो दरामध्ये 25-50 बीपीएस पॉईंटने वाढ करेल, असे अर्थतज्ज्ञांचे म्हणणे आहे. मॉनेटरी पॉलिसी समितीने महागाई दर 6 टक्क्यांपर्यंत स्थिर ठेवण्याचे लक्ष्य ठेवले होते. पण गेल्या 3 तिमाहीपासून आरबीआयला यात अपयश येत आहे.
कर्ज सुद्धा महागणार?
आरबीआयने रेपो दरात वाढ केली की, सार्वजनिक आणि खासगी बॅंका कर्जाच्या व्याजदरातही वाढ करण्याची शक्यता आहे. परिणामी, होम लोन, कार लोन आणि इतर प्रकारची लोन्स महाग होऊ शकतात. तर ज्यांचे अगोदरपासून लोन सुरू आहे; त्यांचे ईएमआय वाढतील किंवा लोन कालावधी वाढेल.
क्रेडिट कार्डची बिले मुदतीत भरावी लागणार!
आरबीआयने ऑक्टोबर महिन्यात क्रेडिट कार्ड (Credit Card) इश्यू करणाऱ्या बॅंक आणि नॉन-बॅंकिंग वित्तीय सेवांना क्रेडिट कार्डधारकांना बर्डन होईल अशापद्धतीने त्यांच्याकडून वसुली करू नये. तसेच क्रेडिट कार्डची बिले भरण्यासाठी संबंधितांना छोट्या-छोट्या रकमेमध्ये बिल भरण्याची मुभा देण्याचे म्हटले होते. पण आता नवीन नियमानुसार, क्रेडिट कार्डधारकांना बिलाचे पैसे ठराविक मुदतीत भरावे लागणार आहेत.
क्रेडिट लिमिटपेक्षा जास्तीच्या खरेदीवर प्रति महिना 500 रुपये!
HDFC बॅंकेने आपल्या क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये 1 डिसेंबरपासून बदल केले आहेत. एचडीएफसीच्या क्रेडिट कार्डच्या बिलावर एकूण पेमेंटच्या 5 टक्के रक्कम स्वीकारली जाणार आहे. तसेच कार्डधारकाला दिलेल्या मुदतीपेक्षा कार्डधारकाने जास्तीची खरेदी केल्यास त्यावर फी आकारली जाणार आहे. तर HSBC बॅंकेने क्रेडिट लिमिटपेक्षा जास्तीची खरेदी केल्यावर प्रत्येक महिन्याला 500 रुपये फी आकारली जाणार आहे.
No SMS for Balance Alert!
Yes Bank ने 1 डिसेंबरपासून बॅंक खात्याची माहिती देणाऱ्या एसएमएस सेवेमध्ये बदल केला आहे. बॅंक यापूर्वी पैसे भरून खात्यातील शिल्लक रक्कम, खात्यात वेगवेगळ्या पद्धतीने क्रेडिट झालेल्या पैशांचा आणि पगार जमा झाल्याचा एसएमएस पाठवत होती. पण बॅंकेने ही सेवा 1 डिसेंबरपासून बंद केली. एसएमएस अलर्टमुळे फ्रॉड होण्याचा धोका असल्याने बॅंकेनी ही सेवा बंद केली.
पण ज्या ग्राहकांना अशी सेवा हवी आहे. त्यांनी बॅंकेला तसे कळवून सेवा सुरू ठेवण्याबाबत कळवणे गरजेचे आहे किंवा ते ऑनलाईन बॅंकिंगद्वारे खात्यातील व्यवहारांची माहिती घेऊ शकतात.