वर्किंग टाइम अँड वर्क लाईफ' या शीर्षकाच्या अहवालानुसार भारत, चीन आणि ब्राझील या विकसित देशांमध्ये लोकांना जास्त तास काम करावे लागले.इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन (ILO) ने दर आठवड्याला सरासरी कामाच्या तासांचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. अहवालानुसार दक्षिण आणि पूर्व आशियामध्ये कामाचे तास सर्वाधिक आहेत. तर उत्तर अमेरिका, युरोप आणि मध्य आशियामध्ये कामाचे तास सर्वात कमी आहेत.वर्किंग टाइम अँड वर्क लाईफ' या शीर्षकाच्या अहवालानुसार भारत, चीन आणि ब्राझील या विकसित देशांमध्ये लोकांना जास्त तास काम करावे लागले, असे नोंदवण्यात आले आहे.
1970 च्या दशकात, ब्राझीलमध्ये कामाचे तास कमी करण्याचा ट्रेंड सुरू झाला.अहवालात म्हटले आहे की जागतिक स्तरावर 2019 मध्ये घाऊक आणि किरकोळ व्यापारात कामाचे तास सर्वाधिक होते. येथे लोकांना आठवड्यातून सरासरी 49.1 तास काम करावे लागत होते. याशिवाय वाहतूक आणि दळणवळणात 48.2 तास, उत्पादनात 47.6 तास काम करावे लागले. तसेच सर्वात कमी कामाचे तास कृषी क्षेत्रात होते, जेथे 37.9 तास आवश्यक होते. याशिवाय शिक्षणासाठी 39.3 तास आणि आरोग्य सेवेसाठी 39.8 तास काम करावे लागले.
सर्वात जास्त सरासरी कामाचे तास असलेले व्यावसायिक गट म्हणजे प्लांट आणि मशीन ऑपरेटर आणि असेंबलर. यांनी दर आठवड्याला सरासरी 48.2 तास काम केले, असे अहवालात म्हटले आहे. यानंतर सेवा आणि विक्री कर्मचारी दर आठवड्याला 47 तास काम करत होते, असे नोंदवण्यात आले आहे.