फर्निचर क्षेत्रातील कंपन्यांमध्ये जगातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या आइकिया, स्विडिश होम फर्निशिंग कंपनी (IKEA-Swedish Home Furnishing Company) भारतात आपले आपले आज (दि.22 जून) चौथे स्टोर सुरू करत आहे. बेंगळुरूमधील नागासंद्रा येथे हे स्टोअर (IKEA Bangalore) सुरू होणार असून भारतातील आतापर्यंतच्या स्टोअरपैकी हे सर्वांत मोठे स्टोअर असणार आहे.
नागासंद्रा स्टोअर हे IKEA चे भारतातील चौथे स्टोअर आहे. इतर तीन IKEA स्टोअर्स हैदराबाद, नवी मुंबई आणि वरळी येथे आहेत. आइकियाने कर्नाटकातील या स्टोअर्ससाठी 3 हजार कोटी रूपयांची गुंतवणूक केली आहे. तसेच यावर्षी बेंगळुरूमध्ये जवळपास 50 लाख व्हिजीटर्स या स्टोअरला भेट देतील, असा कंपनीचा विश्वास आहे. बंगळुरूमधील हे स्टोअर विविध रूपाने शहरातील एक प्रतिष्ठित स्टोअर ठरेल. जे प्रत्येक कुटुंबाच्या होम फर्निशिंगच्या विविध गरजा पूर्ण करणारं दालन ठरेल.
भारतात 2018 मध्ये हैदराबाद येथे पहिले IEKA स्टोर सुरू झाले होते. त्यानंतर 2020 मध्ये नवी मुंबई येथे दुसरे स्टोर सुरू झाले. त्यानंतर मुंबई शहरात वरळी येथे तिसरे आणि चौथे बंगळुरू येथे सुरू होत आहे. बंगळुरू येथील स्टोर भारतातील सर्वांत मोठे स्टोअर ठरणार आहे.
IKEA इंडिया एकूणच स्थानिक होम फर्निशिंग मार्केटला बढावा देण्यासाठी नक्कीच सकारात्मकदृष्ट्या हातभार लावेल. यामुळे रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील आणि एकूणच उद्योगवाढीसाठी, स्थानिकांच्या कला-कौशल्यांना वाव देण्यासाठी याचा फायदा होईल, असा विश्वास आइकिया इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अधिकारी सुस्सेन पूलव्हेरर यांनी व्यक्त केला.
नागासंद्रा आइकिया स्टोअर्सची वैशिष्ट्यं
बंगळुरू, नागासंद्रा येथील आइकिया स्टोअर (IKEA Nagasandra) 12.2 एकर जागेवर उभारले आहे. हे स्टोअर 4,60,000 चौ.फूट जागेमध्ये पसरलेले आहे. या स्टोअरमध्ये 7 हजारांहून अधिक होम फर्निशिंग उत्पादने असणार आहेत. तसेच इथे 65 असे रूम सेट केले आहेत. ज्यातून प्रत्यक्ष घराची सजावट कशी असावी, याचे प्रात्यक्षिक असणार आहे. या सेटमुळे ग्राहकांना आपल्या घरांचे सुशोभिकरण करण्यासाठी रेडिमेड आणि मोफत होम डेकोरच्या कल्पना मिळणार आहेत.
स्थानिक कामगार, उत्पादनांना प्राधान्य!
आइकिया कर्नाटकमधील स्थानिक पुरवठादारांकडून 25 ते 27 टक्के उत्पादने घेणार आहे. तसेच येत्या काळात किमान 50 टक्के उत्पादने स्थानिक पातळीवरून घेण्याचे उद्दिष्ट कंपनीने ठेवले आहे. IKEA ने 72 टक्के स्थानिक भागीदारीसह 1 हजार कामगारांना काम दिले आहे. आणखी स्थानिक लोकांना कामावर घेण्याची कंपनीची योजना आहे.
या स्टोअरमध्ये लहान मुलांच्या खेळण्यासाठी एक स्वतंत्र जागा असणार आहे. तसेच किमान 1 हजार खुर्च्यांचे स्वीडीश आणि भारतीय पदार्थ मिळणारे ‘स्मालॅण्ड’ रेस्टॉरंट असेल. तसेच शाकाहारी आणि मांसाहरी खाद्यपदार्थांचे विविध स्टॉल्स असणार आहेत.