Lost Your Property Papers: तुम्हाला प्रॉपर्टीवर कायदेशीर अधिकार सिध्द करण्यासाठी ओरिजिनल कागदपत्रे (Original Documents) आवश्यक आहे. जर तुमची कागदपत्रे हरवली किंवा चोरीला गेली असेल तर तुम्हाला पुन्हा ओरिजिनल कागदपत्रांची डुप्लीकेट प्रमाणपत्र मिळविण्यासाठी दीर्घकाळ लागतो. अशाच वेळेस नेमकी एखादा खरेदी-विक्रीचा व्यवहार चालू असेल तर ही कागदपत्रे अनिवार्य आहे. ती पुन्हा मिळविण्यासाठी खाली गोष्टी करा म्हणजे तुमच्या कामात अडथळा येणार नाही.
एफआयआर करा दाखल (File an FIR)
जर तुमचा प्रॉपर्टीशी संबंधित एखादा व्यवहार सुरू असेल, तर तुम्हाला त्या प्रॉपर्टीवर कायदेशीर अधिकार सिध्द करण्यासाठी ओरिजिनल कागदपत्रे दाखविणे आवश्यक आहे. त्यात ते हरविले किंवा चोरीला गेले असेल तर तुम्ही त्यावर अधिकार सिध्द करण्यासाठी ‘डुप्लीकेट प्रमाणपत्र’ (Duplicate Certificate) मिळवावे लागते, यासाठी सर्वप्रथम तुम्हाला जवळच्या पोलीस चौकीत जाऊन प्रॉपर्टी कागदपत्रे हरविल्याची किंवा चोरीला गेल्यासंबंधित एफआयआर (FIR) किंवा एनसीआर (NCR)दाखल करावा लागणार आहे. देशात कोणत्याही पोलिस ठाण्यात तुम्ही यासंबंधी तक्रार करू शकता.
नॉन-ट्रेसेबल सर्टिफिकेट (Non-Traceable Certificate)
पोलिस चौकीत तक्रार केल्यानंतर पोलिस ते शोधण्याचा प्रयत्न करतील. पण तरी ही कागदपत्रांचा शोध नाही लागला, तर ते तुम्हाला नॉन-ट्रेसेबल सर्टिफिकेट देतील. हे कागदपत्र तुम्हाला तुमच्या प्रॉपर्टीवर कायदेशीर हक्क सिध्द करण्यासाठी मिळालेले महत्वाचे कागदपत्र असणार आहे. त्यामुळे तुमची होणारी जी फसवणुक आहे, ती रोखण्यास मदत होईल.
नोंदणीकृत प्रतिज्ञापत्र (Registered Affidavit)
तुम्ही जवळच्या पोलिस चौकीत यासंबंधी तक्रार नोंदविल्यानंतर, कागदपत्रे हरविल्याची व चोरीला गेल्याची बातमी किमान दोन वृत्तपत्रात येणे आवश्यक आहे. एक इंग्रजी भाषेत व दुसरी स्थानिक भाषेत. या बातमीमध्ये तुमच्या प्रॉपर्टीसंबंधी माहिती, हरविलेली कागपत्रे व तुमचा मोबाईल क्रमांक यामध्ये असणे महत्वाचे आहे. जेणेकरून तुमचे प्रॉपर्टीची कागदपत्रे कोणाला सापडल्यास, ते तुमच्याशी संपर्क करतील. तसेच बातमी प्रसिध्द झाल्यापासून कोणाला काही तक्रार असल्यास ते पंधरा दिवसांच्या आत सुचना देतील. त्यामुळे याची वकिलाव्दारे स्पष्ट करणारी नोटरीकृत प्रतिज्ञापत्र जवळ असणे महत्वपूर्ण आहे.