Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Home Loan: नवीन घरासाठी Home Loan घ्यायचे असेल, तर 'या' चुका कधीही करू नका

Home Loan

Home Loan: गृहकर्जाच्या मदतीने अनेकजण स्वतःच्या स्वप्नातील घराची खरेदी करतात. मात्र बऱ्याच वेळा अनेकांचे गृहकर्ज बँकेकडून किंवा वित्तीय संस्थांकडून रद्द केले जाते. अर्जदाराच्या छोट्या छोट्या चुकांमुळे बँका गृहकर्ज मंजूर करत नाहीत. त्या चुका कोणत्या जाणून घेऊयात.

घर खरेदी करणे ही आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात मोठी आर्थिक गुंतवणूक (Financial Investment) आहे. या गुंतवणुकीमध्ये प्रचंड मेहनत, वेळ आणि पैसा समाविष्ट असतो. गृहकर्जाच्या (Home Loan) मदतीने अनेकजण स्वतःच्या घराचे स्वप्न साकार करतात. हे कर्ज दीर्घ मुदतीचे आणि मोठ्या रकमेचे असल्याने ते देताना बँका अर्जदाराची कसून चौकशी करतात.

अर्जदाराची कर्ज फेडण्याची क्षमता, कर्ज फेडण्यासंदर्भातील पूर्व इतिहास, नोकरी, कुटुंबातील अवलंबित लोकांची संख्या यासारख्या अनेक गोष्टींचा विचार यामध्ये केला जातो. अर्जदाराच्या सर्व कागदपत्रांची छाननी आणि पडताळणी केल्यानंतरच बँका किंवा वित्तीय संस्था कर्ज उपलब्ध करून देतात. यामध्ये कोणतीही चूक आढळली तर बँक त्वरित कर्ज रद्द करते. त्यामुळे नवीन घरासाठी गृहकर्ज घ्यायचे असेल, तर कोणत्या चुका करू नयेत याबद्दल जाणून घेऊयात.

गृहकर्ज हवे असेल, तर 'या' चुका टाळा

क्रेडिट स्कोअर कमी असणे (Low Credit Score)

गृहकर्ज घ्यायचे असेल, तर सर्वप्रथम बँका तुमचा क्रेडिट स्कोअर (Credit Score) तपासतात. गृहकर्जासाठी 750 किंवा त्याहून अधिकचा क्रेडिट स्कोअर चांगला मानला जातो. या क्रेडिट स्कोअरवर विश्वास ठेवून बँका तुम्हाला मोठ्या रकमेचे कर्ज उपलब्ध करून देतात. मात्र जर तुमचा क्रेडिट स्कोअर त्याहून कमी असेल, तर तुम्हाला गृहकर्ज मिळण्यास अडचण निर्माण होते. किंवा कर्ज मिळालेच तर त्याचा व्याजदर जास्त असू शकतो. त्यामुळे चांगला क्रेडिट स्कोअर मेंटेन करणे गरजेचे आहे. कमी क्रेडिट स्कोअर असणाऱ्यांना बँका गृहकर्जासाठी नकार देऊ शकतात.

निश्चित क्रेडिट मर्यादा (Fixed Credit Limit)

वित्तीय संस्था किंवा बँका तुम्हाला ठराविक मर्यादेचे कर्ज उपलब्ध करून देतात. म्हणजे जर तुमच्या मालमत्तेची किंमत 30 लाख रुपये असेल, तर एकूण रकमेच्या 80%  कर्ज बँकेकडून किंवा वित्तीय संस्थेकडून उपलब्ध करून दिले जाते. मात्र उर्वरित 20% रकमेची तरतूद तुम्हाला स्वतः करावी लागते. याच रकमेला डाऊनपेमेंट (Down Payment) असं म्हणतात. तसेच तुमच्या नावावर अगोदर पासूनच कर्ज असेल, तर तुम्हाला बँका मोठ्या रकमेचे कर्ज देण्यास नकार देऊ शकतात.

कर्ज परतफेडीची क्षमता तपासणे (Checking The Loan Repayment Capacity)

अर्जदार ज्यावेळी गृहकर्जासाठी अर्ज करतो त्यावेळी बँका अर्जदाराचे मासिक आणि वार्षिक (Monthly & Yearly Income) उत्पन्न तपासतात. अर्जदार घेतलेले कर्ज खरंच फेडू शकतो का? याची पडताळणी बँका किंवा वित्तीय संस्था करतात. जर अर्जदाराची कर्ज फेडण्याची क्षमता नसेल किंवा त्याचे उत्पन्न कमी असेल, तर बँका कर्ज देण्यासाठी नकार देऊ शकतात.

अर्जदाराचे वय (Age of Applicant)

बँका किंवा वित्तीय संस्था गृहकर्ज देताना अर्जदाराच्या वयाचा देखील विचार करतात. कर्जासाठी अर्जदाराचे वय अगदीच कमी असल्यास किंवा निवृत्तीचे वय जवळ आल्यास कर्ज देण्यासाठी बँका धजावतात. या वयामधील लोक कर्ज फेडू शकतात की नाही यावर बँकेला साशंकता असते.तसेच या गटातील लोकांचे उत्पन्न नुकतेच सुरु झालेले असते, किंवा उत्पन्न थांबण्याच्या मार्गावर असते. अशा परिस्थितीमध्ये गृहकर्जासारखी मोठी रक्कम बँका सहजासहजी देत नाहीत. त्यामुळे योग्य वयात गृहकर्जासाठी अप्लाय करावा.

सतत नोकरी बदलणे (Constantly Changing Jobs)

जे लोक 6 महिन्यांमध्ये किंवा 8 महिन्यांच्या आत वारंवार नोकरी बदलतात त्यांच्या नोकरीची विश्वासार्हता बँकेला किंवा वित्तीय संस्थेला सहसा पटत नाही. अशा लोकांना दिलेले कर्ज रद्द होण्याची देखील शक्यता असते. एकाच ठिकाणी ठराविक वर्ष केलेली नोकरी विश्वासार्हता निर्माण करते आणि सहज कर्ज उपलब्ध करून देण्यास मदत करते. त्यामुळे सतत नोकरी बदल्यापूर्वी या गोष्टीचा नक्की विचार करा. 

(Source: hindi.news18.com )