Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Home Loan payment : गृहकर्जातून लवकर सुटका हवीय? 'या' सोप्या टिप्स कामी येतील

Home Loan payment : गृहकर्जातून लवकर सुटका हवीय? 'या' सोप्या टिप्स कामी येतील

Home Loan payment : गृहकर्जातून तुम्हाला लवकर सुटका हवी आहे का? यासाठी विविध मार्ग आहेत. ज्यायोगे तुम्ही मुदतीच्या आत कर्ज फेडू शकाल. स्वत:चं घर असावं, ते लवकरात लवकर पूर्णत्वास यावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. मात्र ते घेत असताना एकरकमी व्यवहार आपल्याला करता येत नाहीत. कर्ज काढून घर घेण्याचा पर्याय आपल्यासमोर असतो. अशावेळी काही टिप्स फॉलो केल्या, तर आपलं ओझं नक्कीच कमी होईल.

दर महिन्याला भाड्यापोटी मोठी रक्कम भरावी लागते. त्याचा त्रास जास्त असतो. कारण भाड्याच्या पैशांतून तुम्हाला कोणत्याही प्रकारचा परतावा मिळत नाही. फरक एवढाच असतो, की तुमच्या डोक्यावर छत असतं. हाच काय तो दिलासा. आपलं घर घेताना आपण गृहकर्जाकडे वळतो. घराचं स्वप्न पूर्ण झालं तरी नंतर गृह कर्ज हे त्रासदायक ठरतं. ही एक मोठी जबाबदारी असते. कर्जाचं व्याज भरून आपली मोलाची कमाई त्या व्याजात वाया जात असते. त्यामुळे हे कर्ज लवकर फेडणं हा एकमेव आपल्यासमोर असतो.

कमी वेळेत कर्जाची परतफेड

गृहकर्जाचं प्री-पेमेंट करण्याचा एक पर्याय आपल्यासमोर असतो. कर्जाची मुदत जरी 20 वर्षांची असली तरी तुम्ही कमी वेळेत कर्जाची परतफेड करून लाखो रुपयांची बचत करू शकता. तुमच्याकडे ज्याप्रकारचं कर्ज असेल त्या प्रकारानुसार, आपला मासिक हप्ता वाढवता येवू शकतो का, याची चाचपणी करावी. तुमच्याकडे फिक्स्ड रेटचं कर्ज असेल तर तुम्हाला मदत होईल. रिफायनान्स करण्याची सुविधा नसेल महिन्याचा हप्ता वाढवून तुम्ही कर्ज लवकर जमा करू शकता. यामुळे व्याज वाढण्याची शक्यता कमी होते. मूळ रक्कमदेखील कमी होत राहते. तुम्ही दरमहा एक हप्ता वाढवूनदेखील पैसे देऊ शकता.

व्याजदर कमी करून सवलत मिळेल?

कर्जाच्या कालावधीत व्याजदर कमी करून सवलत मिळू शकेल काय, याविषयी बँकेसोबत तुम्ही चर्चा करू शकता. समजा असं शक्य नसेल तर तुम्ही कमी व्याजानं कर्जाची परतफेड करावी लागेल अशा बँकेत तुमचं कर्ज हस्तांतरित करू शकता.

एकरकमी रक्कम भरून...

एकरकमी रक्कम भरूनदेखील गृहकर्जाचा कालावधी कमी करता येवू शकतो. नजीकच्या काळात गरज नसेल अशी जास्तीची रोकड तुमच्याकडे उपलब्ध असेल तर तुम्ही तुमच्या बँकेशी चर्चा करून अतिरिक्त पेमेंट करता येवू शकेल. कर्जाची मुदत कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या कर्जाचे रिपेमेंट करू शकता. दर महिन्याला वाढीव हप्ता देऊ शकता की नाही याची पूर्ण खात्री असेल तरच हा पर्याय निवडावा.

लमसम पेमेंट

एकरकमी अतिरिक्त हप्ता देऊन तुम्ही तुमचं कर्ज लवकर फेडू शकता. लमसम पेमेंट म्हणजे एकवेळचा हप्ता होय. यामध्ये तुम्ही बँकेत मोठी रक्कम भरता. यात तुमचं व्याज आणि मूळ रक्कम यांचा समावेश असतो. हा पर्याय अनेकजण वापरतात.

कर्ज एकत्रित करणं

गृहकर्जासोबतच इतर काही लहान कर्जाचा खर्चही तुम्हाला करावा लागत असेल तर तुम्ही तुमची कर्जे एकत्रित करू शकता. म्हणजेच अनेक कर्जे एकामध्ये विलीन केली जाऊ शकतात. त्याचप्रमाणे एकाच कर्जाप्रमाणं भरली जाऊ शकतात. यामुळे तुमच्यावरचा जास्तीच्या व्याजाचा बोजा कमी होण्यास मदत होईल.