आपल्या प्रत्येकाची वेगवेगळी स्वप्नं असतात. मात्र या सर्व स्वप्नांमध्ये स्वतःचं घर आणि दारात चारचाकी गाडी असावी, ही स्वप्नं कॉमन असतात. घर खरेदी करणे, हल्ली वाटते तेवढी सोपी गोष्ट राहिली नाही. मात्र कार खरेदी करणे, आता फारसे अवघड राहिले नाही. हल्ली बँका गाडी खरेदी करण्यासाठी कार लोन (Vehicle Loan) उपलब्ध करून देतात. जर तुमच्याकडे कार खरेदी करण्यासाठी एकरकमी पैसे नसतील, तर तुम्ही बँकेकडून कार लोन घेऊ शकता.
बँका कार लोन देताना ग्राहकांचा क्रेडिट स्कोअर तपासतात. प्रत्येक बँकेचा कार लोनवरील व्याजदर हा वेगवेगळा असतो. Bankbazar.com या वेबसाईटने 2023 मधील वेगवेगळ्या बँकांच्या कार लोनच्या व्याजदराची माहिती दिली आहे. तर त्यातील काही ठराविक बँकांचे कार लोनचे इंटरेस्ट रेट जाणून घेणार आहोत.
Table of contents [Show]
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)
देशातील सर्वात मोठी स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आपल्या ग्राहकांना कार लोन उपलब्ध करून देते. ज्यावर बँक 8.65% व्याजदर आकारत आहे. तुम्हालाही या बँकेकडून कार लोन घ्यायचे असेल, तर तुम्ही बँकेच्या वेबसाईटला भेट देऊन अर्ज करू शकता किंवा बँकेच्या शाखेत जाऊन या संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेऊ शकता.
आयडीबीआय बँक (IDBI Bank)
आयडीबीआय बँकेने आपल्या ग्राहकांसाठी कार लोनचा व्याजदर 8.80% ठेवला आहे. हा रेट फ्लोटिंग आहे. तर फिक्स रेटमध्ये बँक 9.20% वार्षिक व्याजदर आकारत आहे.
कॅनरा बँक (Canara Bank)
खाजगी क्षेत्रातील कॅनरा बँक देखील आपल्या ग्राहकांना वेगवेगळ्या स्वरूपातील कर्ज उपलब्ध करून देते. बँक आपल्या ग्राहकांना गाडी खरेदी करण्यासाठी कार लोनची सुविधा उपलब्ध करून देते. ज्यावर बँक वार्षिक 8.80% व्याजदर आकारात आहे.
पंजाब नॅशनल बँक (PNB)
खाजगी क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँक (PNB) आपल्या ग्राहकांना गाडी खरेदी करण्यासाठी कार लोनची सुविधा उपलब्ध करून देत आहे. ही बँक सध्या कार लोनवर वार्षिक 8.75% व्याजदर आकारत आहे. कार लोनसाठी ग्राहकांना बँकेच्या शाखेत किंवा ऑनलाईन वेबसाईटला भेट देऊन अर्ज करू शकतात.
वाहन कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
तुम्हालाही बँकेकडून वाहन कर्ज घ्यायचे असेल, तर त्यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करणे गरजेचे आहे. ती कागदपत्रे कोणती जाणून घेऊयात.
- आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, पॅन कार्ड आणि मतदार ओळखपत्र यापैकी कोणतेही एक कागदपत्र ओळखीचा पुरावा म्हणून सादर करावे लागेल.
- तसेच रहिवासी पुराव्यासाठी आधार कार्ड, पासपोर्ट, रेशन कार्ड, लाईट बिल किंवा ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणतेही एक कागदपत्र सादर करावे लागेल.
- नोकरदार वर्गाने सॅलरी स्लिप, गेल्या 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट, आयटीआर किंवा फॉर्म 16 उत्पन्न दाखला स्वरूपात सादर करणे गरजेचे आहे.