Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Indian railways: सीटवर 10 मिनिटांत पोहोचला नाहीत तर तिकीट रद्द होणार? काय आहे सत्य?

Indian railways: सीटवर 10 मिनिटांत पोहोचला नाहीत तर तिकीट रद्द होणार? काय आहे सत्य?

Train Ticket Cancellation Rule: ट्रेनचं तिकीट तुमच्याकडे आहे. मात्र तुम्ही तुमच्या आसनावर 10 मिनिटांत पोहोचला नाहीत, तर तुमचं तिकीट रद्द होतं का, असा प्रश्न अनेकांना असतो. भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी विविध नियम आणि योजना आणत असते. तिकिटासंबंधीही रेल्वेचे काही नियम आहेत. याविषयी माहिती घेऊ...

जेव्हा एखाद्याला लांबच्या प्रवासाला जायचं असतं तेव्हा रेल्वे (Railway) प्रवासालाच प्राधान्य दिलं जातं. कारण रेल्वे प्रवास सोयीचा आहे. तुम्हीही ट्रेननं प्रवास करत असाल तर तुम्हाला रेल्वेचा हा महत्त्वाचा नियम माहीत असणं गरजेचं आहे. तुमच्या सीटवर वेळेवर न पोहोचल्यामुळे टीटीई तुमचं तिकीट रद्द करू शकतो का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. 

नवा नियम की अफवा?

एका नवीन नियमानुसार, ट्रेन सुटल्यानंतर 10 मिनिटांतही तुम्ही तुमच्या सीटवर पोहोचला नाहीत, तर तुमचं तिकीट रद्द करण्याचा अधिकार टीटीईला आहे. बऱ्याचवेळा असं काही घडतं की उशीर होतो आणि मग ट्रेन पकडण्यासाठी अनेकजण पुढच्या स्टेशनवर जातात. अशा परिस्थितीत तिकिटांचा नियम (Train Ticket Cancellation Rule) माहीत असायला हवा.

सत्य काय?

रेल्वेनं आपल्या कर्मचाऱ्यांना हँडहोल्ड टर्मिनलचा पर्याय दिला आहे. ज्यामध्ये त्यांना लवकरात लवकर सर्व माहिती ऑनलाइन टाकायची असते. या नव्या नियमानुसार, जर एखादी व्यक्ती स्टेशनवरून ट्रेन सुटल्यानंतर दहा मिनिटांत त्याच्या सीटवर पोहोचली नाही, तर त्याची सीट रद्द केली जाऊ शकते. अशाप्रकारचा नियम रेल्वेनं केल्याचं सोशल मीडियावरूनही सांगितलं जात आहे. मात्र यात खरंच तथ्य आहे का?

रेल्वेचं निवेदन

रेल्वेकडून तिकिटांच्या संदर्भानं एक निवेदन जारी करण्यात आलं आहे. यामध्ये रेल्वेनं अद्याप असा कोणताही नियम केला नसल्याचं म्हटलं आहे. जर एखादा प्रवासी त्याच्या स्टेशनवरून ट्रेनमध्ये चढू शकला नाही किंवा त्याच्या सीटवर पोहोचू शकला नाही, तर त्याची सीट येत्या दोन-तीन स्टेशनपर्यंत इतर कोणालाही देता येणार नाही. म्हणजेच पहिल्या 10 मिनिटांचा असा कोणताही नियम करण्यात आलेला नाही, हे स्पष्ट होतं.

आसनावर बसण्याचा काय नियम?

तिकीट कन्फर्म असेल तर प्रवाशांनी आपल्या आसनावर बसायला हवं. मात्र दोन-तीन स्टेशनपर्यंत तुम्ही आसनावर बसला नाहीत, तर टीटीई संबंधित तिकीट रद्द करू शकतो. आणखी एक नियम आहे मिडल बर्थचा. रेल्वे प्रवासादरम्यान मधला बर्थ मिळू नये, असं अनेकांना वाटतं. पण जर तुम्हाला मधला बर्थ मिळाला, तर त्याच्याशी संबंधित नियमदेखील माहीत असायला हवा. भारतीय रेल्वेच्या नियमानुसार, मध्यभागी बर्थ घेणारा कोणताही प्रवासी रात्री 10नंतर आणि सकाळी 6वाजेपर्यंत आपला बर्थ उघडू शकतो. यासाठी तुम्हाला कोणीही मनाई करू शकत नाही.