Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

PM Kisan Subsidy: जर लाभार्थीचा मृत्यू झाला, तर 2 हजारच्या हप्त्यासाठी कोण असेल पात्र?

PM Kisan Subsidy

PM Kisan: जर एखादा शेतमालक पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत असेल आणि त्यांचा अचानक मृत्यू झाला असेल, तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोण पात्र असेल, याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.

  PM Kisan: पीएम किसान योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana)  ही 2019 मध्ये सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा मुळ हेतू शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या व शेतकऱ्यांची आर्थिक स्थितीत सुधारणे करणे हा आहे. या योजनेच्या अंर्तगत शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपयांची आर्थिक मदत देण्यात येते. मात्र ही रक्कम त्यांना 6000 रुपये 3 समान हप्त्यांमध्ये दिली जाते. 

शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर कोण पात्र (Who is Entitled After the Death of The Farmer)

 पीएम किसान योजनेच्या लाभार्थीचा मृत्यू झाल्यास, शेतजमीन असलेल्या शेतकऱ्याच्या वारसाला या योजनेचा लाभ मिळतो. मात्र, त्या शेतकऱ्याच्या वारसाला पोर्टलवर स्वतंत्रपणे नोंदणी करण्याची आवश्यकता आहे. याशिवाय या वारसदार शेतकऱ्यांनी सरकारच्या अटी पूर्ण केल्या आहेत की नाही याकडे ही पाहिले जाणार आहे. आता काही दिवसात पीएम किसान योजनेचा 13 वा हप्तादेखील मिळणार आहे, या कालावधीत शेतकऱ्याचा मृत्यू झाला, तर  ही रक्कम नक्कीच मिळेल. फक्त तुमची नोंद असणे आवश्यक आहे.  

नोंदणी कशी करावी (How to Register)

अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in वर जावे
'नवीन शेतकरी नोंदणी' या पर्यायावर क्लिक करावे.
शेतकऱ्याला त्यांचा आधार क्रमांक टाइप करावा लागेल.
कॅप्चा कोड लिहा आणि राज्याची निवड करा.

हप्त्याच्या लाभासाठी ई-केवायसी आवश्यक (E-KYC Required for Installment Availment)

पीएम किसान सन्मान योजनेअंतर्गत योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी करणे आवश्यक आहे. ई-केवायसी नसेल तर पीएम किसान सन्मान निधी योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार नाहीत. 

मदतीसाठी येथे करा संपर्क (Contact Here for Help)

पीएम किसान योजनेशी संबंधित प्रत्येक समस्या दूर करण्यासाठी केंद्र सरकारने काही नंबर दिले आहेत. जसे की, हेल्पलाइन क्रमांक-1555261 आणि 1800115526 किंवा 011-23381092 हे नंबर दिले आहेत. हे क्रमांक टोल फ्री आहेत. यासोबतच तुम्ही पीएम किसान योजनेच्या अधिकृत ईमेल आयडीवर pmkisan-ict@gov.in वर संपर्कदेखील करू शकता.