सणासुदीच्या काळात बॅंकेने फिक्स्ड डिपाॅझिटच्या व्याजदरात वाढ करताना, स्पेशल FD ची मुदत वाढवली. त्यामुळे ग्राहकांना आता या अमृत महोत्सव FD योजनेद्वारे 31 ऑक्टोंबर 2023 पर्यंत एफडी करता येणार आहे. आधी या योजनेची मुदत 30 सप्टेंबर ठरवण्यात आली होती.
Table of contents [Show]
स्पेशल एफडीचे नवे व्याजदर
बॅंक 375 दिवसांच्या स्पेशल मुदतीच्या एफडीवर सामान्यांसाठी 7.10 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.60% व्याजदर देत आहे. नवीन व्याजदर 15 सप्टेंबरपासून लागू असल्याची माहिती बॅंकेने वेबसाईटवर दिली आहे. तर बॅंक 444 दिवस मुदतीच्या एफडीवर सामान्यांसाठी 7.15 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.65 टक्के व्याजदर देत आहे.
स्पेशल एफडी नाॅन काॅलेबल (Non-Callable)
स्पेशल मुदतीच्या या नाॅन काॅलेबल एफडीमध्ये म्हणजेच 444 दिवसांच्या एफडीमध्ये सामान्यांना 7.25 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.75 टक्के व्याजदर दिल्या जात आहे. या योजनेत पैसे टाकल्यानंतर तुम्हाला मुदत संपल्याशिवाय पैसे काढता येणार नाहीत. त्यामुळे एकदा पैसे टाकल्यावर 444 दिवसांसाठी ते लाॅक होणार आहेत. या योजनेद्वारे 15,00,001 रुपये आणि जास्तीतजास्त 2 कोटी रुपयांपेक्षा कमी रक्कम गुंतवावी लागणार आहे.
एफडीच्या दरात केला बदल
बॅंकेने फिक्स्ड डिपाॅझिटच्या व्याजदरात बदल केला आहे. बॅंक आता सात दिवस ते पाच वर्षांच्या एफडीवर 3 टक्के ते 6.8 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 3.5 टक्के ते 7.3 टक्के व्याजदर देत आहे. हे नवे दर 15 सप्टेंबर 2023 पासून लागू आहेत. बॅंक वेगवेगळ्या योजनांनुसार फिक्स्ड डिपाॅझिटवर व्याज देत असते.
तसेच, व्याजदरात वेळोवेळी बदल केले जातात आणि ते लोकांना कळवले जाते. याशिवाय बदल केलेले व्याजदर फक्त रिन्यूव्हल आणि फ्रेश डिपाॅझिटसाठीच लागू आहेत. तसेच, सध्या फिक्स्ड डिपाॅझिटचा लाभ घेत असणाऱ्यांना आधीच्या करारानुसार व्याज मिळत राहणार आहे.
IDBI बॅंकेचे लेटेस्ट एफडी दर
बॅंक दोन कोटींपेक्षा कमी रकमेवर 7 दिवस ते 30 दिवसाच्या एफडीवर 3 टक्के व्याजदर देत आहे. तर 31 दिवस ते 45 दिवसांच्या एफडीवर 3.25 टक्के व्याज देत आहे. तसेच, 46 दिवस ते 90 दिवसाच्या एफडीवर 4 टक्के व्याज मिळत आहे. बॅंक 6 महिने एक दिवस ते 270 दिवसांच्या एफडीवर 5.75 टक्के व्याज देत आहे. तर 1 वर्ष ते 2 वर्ष मुदतीच्या एफडीवर (375 दिवस आणि 444 दिवस वगळून) 6.8 टक्के व्याज दिल्या जात आहे.
याशिवाय 5 वर्षांपेक्षा जास्त आणि 10 वर्षांपर्यंतच्या एफडीवर 6.25 टक्के व्याज मिळत आहे. तसेच, 10 वर्षांपेक्षा जास्त आणि 20 वर्षांपर्यंतच्या एफडीवर 4.8 टक्के व्याज बॅंक देत आहेत. याचबरोबर तुम्ही टॅक्सची बचत करायला टॅक्स सेव्हिंग एफडीमध्ये गुंतवणूक करणार असल्यास, तुम्हाला पाच वर्षांसाठी एफडी करावी लागेल, यासाठी तुम्हाला 6.5 टक्के व्याज मिळणार आहे.